कळत नाही कधी ........

Submitted by संजय४५ on 19 January, 2013 - 10:29

कळत नाही कधी ........

कळत नाही कधी

मन कसं गुंतत जातं

कुणी असं मनास

वेड कसं लावतं

कुणा मागे मन

कसं फरफटत जातं

कुणा मध्ये मन

कसं गुरफटत जातं ....

कळत नाही कधी

कोण आयुष्यात येतं

काहीच ओळख नसतांना

आयुष्य बदलून जातं

काहीतरी नातं

मनी उमलून जातं

तोच गंध श्वासात

मन घेऊन फिरतं ....

कळत नाही कधी

कसं मन अडकतं

हलकेच हातातन

निसटून कसं जातं

असं कसं कुणी

काळजात शिरून जातं

भेट होता त्याची

हृदय धकधक करतं ....

कळत नाही कधी

जगणं बदलून जातं

आपलं मन त्याचं

गुलाम होऊन होतं

हे प्रेम असंच

जीवनात येत असतं

त्या गंधान मन

स्वतःलाच विसरत असतं .

संजय एम निकुंभ , वसई

दि . १९.०१.२०१३ वेळ : ८.१५ रा .

Group content visibility: 
Public - accessible to all site users