नांव माझे

Submitted by मिलन टोपकर on 18 January, 2013 - 05:31

घेतले नाही कुणीही नांव माझे
आठवेना का मलाही नांव माझे?

दु:ख आणि भोग माझे तेच सारे
द्रौपदी, सीता नसूनी नांव माझे ..

शोधणे सोपेच आहे तू मला
कोरले थडग्यावरी मी नांव माझे ..

सभ्य तो, अपशब्द सारे टाळतो,
घेत नाही तो म्हणुनी नांव माझे ..

ठेव आता खड्ग ते, दमलास तू,
मी न उरले, संपलेही नांव माझे ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही वृत्तातील तर काही र्‍हस्वदीर्घातील बदल आवश्यक आहेत. कृ गै न. मतल्यात अलामतीचेही काही केल्यास चांगले होईल.

द्रौपदी, सीता या शेरातील विचार आवडला.

धन्यवाद.

सीता, द्रौपदीचा शेर आवडलाच.

या शेरात...
ठेव आता खड्ग ते, दमलास तू, बघ...
मी न उरले, संपलेही नांव माझे ..
असे करता येईल. अर्थात निर्णय तुमचाच.
पुलेशु.