इतकच लागतं जगायला

Submitted by कविन on 17 January, 2013 - 02:25

तू म्हणालास,
"जपून ग!
घाटातली वाट, त्यात धुकं दाट"

मी म्हंटलं,
"असुदे रे!
तू सोबत आहेस ना?
मग कसलं धुकं आणि कसला घाट
सोबतीने करु की पार ही वाट"

तू म्हणालास,
"जपून ग!
जगणं म्हणजे नुसती,
अडथळ्यांची शर्यत आहे"

मी म्हंटलं,
"असुदे रे!
सोबत असण्याचं महत्व
म्हणून ना कळत आहे?"

तू म्हणालास,
"आणि मी खचलो तर?"

मी म्हंटलं,
"मी आहे की"

जोड विजोड, रुप अनुरुपता
कळत नाहीत रे मला

अवघड वाटेवर
सोबतीने चालण्याचं वाण
मनापासून निभावतोय

हेच काय ते
ठावूक आहे मला

आणि विश्वास ठेव,
इतकच लागतं जगायला
बाकी काहीच नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि विश्वास ठेव,
इतकच लागतं जगायला
बाकी काहीच नाही......

अगदी खरयं !

....पण हे सहसा दोघांनाही कळत नाही...

हातातून वेळ निसटून जाते अन आपण 'जोड विजोड, रुप अनुरुपता' यावरच घुटमळत रहातो!

खुप भावली Happy

-सुप्रिया.