भावनांचा खेळ

Submitted by संजय४५ on 16 January, 2013 - 11:28

भावनांचा खेळ

तू म्हणालीस
यापुढे तुला
भेटले नाही तर
तुला काय वाटेल
मी दूर गेल्यावर
तुला नाही दिसल्यावर
खरचं रे तुला
मी कां आठवेल ?
काय उत्तर देऊ
मी तुझ्या या प्रश्नाचं
तू साद घातल्यावर
मला गुंतवल्यावर
अन अशी विजेसारखी
तू नाहीशी झाल्यावर
माझं मन किती जळेल
हे तुला सांगायलाच हव कां ?
इतकंच सांगतो
एकदा मन जुळल्यावर
नातं फुलल्यावर
असं कुणी सोडून जातं कां ?
न सोडून जायचच असेलं तर
हा भावनांचा खेळ
मांडायचाच का ?
याचं उत्तर तू मला
देऊ शकशील का ?

संजय एम निकुंभ , वसई
दि . १५.०१.२०१३ वेळ : ९.४५ रा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users