आठवणींची कचरापेटी भरून वाहत आहे

Submitted by बेफ़िकीर on 14 January, 2013 - 01:22

आठवणींची कचरापेटी भरून वाहत आहे
घंटागाडी येतच नाही मुळी पुनर्जन्माची
दुर्गंधाने त्रस्त होत मी काडी लावत आहे
आणि धुराला कविता माने गर्दी प्रकाशकांची

धूर कसा पकडीत यायचा धूर कुठेही उडतो
आठवणी जेव्हाच्या, जिथल्या होत्या, तेथे जातो
इकडे माझा काळ संपतो, मीही धूरच बनतो
धुरामधे मिसळून धूर मग मी सर्वत्रच उरतो

विरळ धुराला सामावाया कोणी अधीर मिळते
जेथे घनता जास्त धुराची तेथे शरीर मिळते
तेथे होते नवीन कचरापेटी नावावरती
'बेफिकीर'च्या मुक्त रुपाला फिरुनी फिकीर मिळते

असे मला क्षण दे की ज्यांची स्मृतीच राहत नाही
अशी वाट दे ज्यावर कोणी मागे पाहत नाही
असा देह दे जो जळताना मुळीच दाहत नाही
आणि अशी कचरापेटी जी भरुनी वाहत नाही

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है!!

उत्तम कविता.

असा देह दे जो जळताना मुळीच दाहत नाही
आणि अशी कचरापेटी जी भरुनी वाहत नाही

ह्या ओळींपुढे नतमस्तक.

असे मला क्षण दे की ज्यांची स्मृतीच राहत नाही
अशी वाट दे ज्यावर कोणी मागे पाहत नाही>> वा.. वा! खास वाटल्या ह्या ओळी...

कचरापेटी नाव देऊन वैताग यथायोग्य पोहोचवलात....

कविता आवडलीच!

विरळ धुराला सामावाया कोणी अधीर मिळते
जेथे घनता जास्त धुराची तेथे शरीर मिळते

असे मला क्षण दे की ज्यांची स्मृतीच राहत नाही

ह्या ओळी विशेष आवडल्या.

असे मला क्षण दे की ज्यांची स्मृतीच राहत नाही
अशी वाट दे ज्यावर कोणी मागे पाहत नाही
असा देह दे जो जळताना मुळीच दाहत नाही
आणि अशी कचरापेटी जी भरुनी वाहत नाही

वाह! चारही ओळी भिडल्या.

असे मला क्षण दे की ज्यांची स्मृतीच राहत नाही
अशी वाट दे ज्यावर कोणी मागे पाहत नाही
असा देह दे जो जळताना मुळीच दाहत नाही
आणि अशी कचरापेटी जी भरुनी वाहत नाही

इहलोकीचा बेफिकीर मोक्ष! अटिट्यूडवाली निर्वाणीची सुंदर कविता.

विरळ धुराला सामावाया कोणी अधीर मिळते
जेथे घनता जास्त धुराची तेथे शरीर मिळते>> या २ ओळी सर्वाधिक आवडल्या

शेवटची दोन कडवी भन्नाट !!!

पहिले कडवे वाचताना "उर्मी विझली कचरा जाळू" ही ओळ आठवली

असे मला क्षण दे की ज्यांची स्मृतीच राहत नाही
अशी वाट दे ज्यावर कोणी मागे पाहत नाही
असा देह दे जो जळताना मुळीच दाहत नाही
आणि अशी कचरापेटी जी भरुनी वाहत नाही

पहिल्या तीन ओळींत प्रचंड मोठे, पराकोटीचे तत्वज्ञान......... आणि चौथ्या ओळीत 'कचरापेटी' मधून व्यक्त होणारा उद्वेग, प्रतीत होणारी निराशा........

जबरदस्त!

बेफिकीर,

तीव्रपणा म्हणजे काय हे तुमच्या कवितांतून पाहायला मिळतं. वैफल्याचा निखारा तात्त्विक चिमटीत नेमकेपणे उचलण्याच्या तुमच्या कौशल्यास मानाचा मुजरा!

आ.न.,
-गा.पै.

mast Happy

असे मला क्षण दे की ज्यांची स्मृतीच राहत नाही
अशी वाट दे ज्यावर कोणी मागे पाहत नाही
असा देह दे जो जळताना मुळीच दाहत नाही
आणि अशी कचरापेटी जी भरुनी वाहत नाही वा......

असे मला क्षण दे की ज्यांची स्मृतीच राहत नाही
अशी वाट दे ज्यावर कोणी मागे पाहत नाही
असा देह दे जो जळताना मुळीच दाहत नाही
आणि अशी कचरापेटी जी भरुनी वाहत नाही

सुन्दर!!!

असे मला क्षण दे की ज्यांची स्मृतीच राहत नाही
अशी वाट दे ज्यावर कोणी मागे पाहत नाही

कवितेचा शेवट एकदम जबरदस्त.........

विरळ धुराला सामावाया कोणी अधीर मिळते
जेथे घनता जास्त धुराची तेथे शरीर मिळते

व्वा..!

आवडली कविता..!

असे मला क्षण दे की ज्यांची स्मृतीच राहत नाही
अशी वाट दे ज्यावर कोणी मागे पाहत नाही
असा देह दे जो जळताना मुळीच दाहत नाही
आणि अशी कचरापेटी जी भरुनी वाहत नाही

आवडलं!