लहान मुलांसाठीची पुस्तके

Submitted by सायली on 11 January, 2013 - 09:57

माझी मुलगी २ महिन्यांनी ८ वर्षांची होईल. तिला मी सध्या रात्री तोत्तोचान वाचुन दाखवत आहे. रोज एक गोष्ट याप्रमाणे. ती आणि मी ते खुप एन्जॉय करतोय. आणि मला जे तिला त्यातुन सांगायचे आहे ते पण तिला समजतयं, पण आता ते संपत आलयं.
अकबर बिरबल , तेनालीराम किंवा तत्सम वाचतच असतो आम्ही. ती आंग्ल माध्यमाच्या शाळेत जाते. आणि जे काही तिला वाचता येईल ते ती वाचतेच. अजुन थोडी मोठी झाली की मला तिला 'लंपन'(चारही पुस्तकं) वाचुन दाखवायला आवडेल.
पण आता तिला वाचुन दाखवावं असं काहीतरी वेगळं सुचवावं यासाठी हा धागा.
तसंही आपण वेगवेगळ्या वयोगटाच्या मुलांना काय वाचुन दाखवु शकतो याबद्दलही चर्चा करता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायली www.maayboli.com/node/6911 हा बाफ पाहिलात का? तुम्हाला हवी ती माहिती आहे इथे. तसेच मेधाच्या रंगीबेरंगी पानावर सुद्धा तिने वयोगटाप्रमाणे इंग्रजी पुस्तकांची यादी दिलीये.

धन्स बिल्वा.
हा धागा डिलिट कसा करायचा ? मला कोठेही डिलिट करा किंवा अप्रकाशित करा असा ऑपशन सापडत नाहीये.

असांसदीय भाषेत वैयक्तिक उखाळ्यापाखाळ्या सुरू करायच्या. होईल डिलीट. Proud

सॉरी, अगदीच राहवलं नाही. मदत समितीला किंवा प्रशासकांना सांगा. Happy