रहस्य भाग २

Submitted by बेधुंद on 10 January, 2013 - 09:07

भाग १ वरुन

ईन्स्पेक्टर शिन्दे म्हणाले ,"सर,खरा प्रोब्लेम तो नाहीये ,त्या बॉडीची ओळ्ख पटवणं खुपच जिकरीचे काम आहे त्या साठी फोरेन्सिक चाचण्या कराव्या लागतील,आता हे काम आम्ही तुमच्या ज्युनियर एक्स्पर्ट कडुन करुन घेतले असते पण या केस मध्ये कुठलीही रिस्क मला घ्यायची नाहीये कारण आम्ही जेव्हा या संबधात तपास सुरु केला व त्या वर्णनाशी कुणी मिळती जुळती मुलगी बेपत्ता आहे का हे बघीतले तेव्हा अशा वर्णनाच्या ३ मुली बेपत्ता असल्याचे आढळले व त्यातील १ मुलगी ग्रुहमंत्र्यांच्या खाजगी सचिवाची आहे .त्यामुळे या प्रकरणात आम्ही कुठलीही रिस्क घेउ शकत नाही,तसा ऑफीशीयली आम्ही अजुन कोणाला या बाबतची माहीती दिलेली नाही,पण जास्त वेळ आम्ही ही माहीती लपवुन ठेवु शकत नाही"

शिन्देंनी आपली परिस्थीती देसाईंना सांगितली

तसे देसाई म्हणाले "म्हणजे मी या केस वर फोरेन्सिक ओपिनिओन द्याव असे आपल्याला वाटते,आनी तेही ऑफ द रेकॉर्ड ?"

तसे शिन्दे व राऊत दोघे एकदम म्हणाले "यस सर"!!!!!

आता पुढे..............................

इन्स्पेक्टर शिन्दे व रा‌उत यांच्या कडे एकदा रोखुन बघत डॉ.देसा‌ई म्हणाले...

"हे बघा,मित्रांनो,!कुठल्याही केसच्या तपासाला सुरुवात करण्या‌आधी तुम्ही तुमच्यावर असलेले द्ड्पण आधी बाजुला ठेवा,आणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सचिव साहेबांना तुम्ही या सर्व घटनेची कल्पना द्या.उद्या काही अप्रिय सत्य बाहेर आले तर प्रकरण जास्त महागात पडेल,आणी सर्वांनाच याचा त्रास हो‌इल."
"आणखी एक ,तुम्ही म्हणालात की,त्या वर्णनाशी मिळत्या जुळत्या ३ व्यक्ती गायब आहेत त्या कोणत्या?"

तसे ईन्स्पेक्टर शिन्दे म्हणाले "सर, यातील १ मुलगी सचिवांची मुलगी आहे ,दुसरी मुलगी कॉलेजात जाणारी १ स्टुडेन्ट आहे ,तर ३ री मुलगी एका प्रायव्हेट कंपनीत सेल्स्गर्ल म्हणुन काम करते व वुमेन्स होस्टेल मध्ये राहते म्हणजे रहायची" "सर्वांचे नाव, पत्ते फोटोग्राफ्स या फा‌इल मध्ये आहेत सर"

असे म्हणुन त्यांनी एक फा‌इल देसा‌ईंसमोर ठेवली..

देसा‌ईनी फा‌इल् हातात् घेतली व् म्हणाले"शिन्दे,मला वाटते,कि,मला पुन्हा एकदा बॉडी नीट् चेक् करावी लागेल्,पण् त्यासाठी तुम्हाला सर्व् गोष्टी अगदी ऑफीशियली कराव्या लागतील्‌,सर्व् लेखी परवानग्या घे‌उन् तुम्ही बॉडी इथे जमा करा मग् आपण् बघु."

तसे दोघेही जराश्या निराशेने उठले,त्याना तसे बघुन् देसा‌ई म्हणाले

" हे बघा,निराश् व्हायची गरज् नाही,मी तुम्हाला सर्व् मदत् करायला तयार् आहे,पण् जर् आपन् फक्त् व्ही.आय्‌.पी.केसेस् सोडवण्यातच् ईन्टरेस्ट् दाखवला तर् मग् इतरांच् काय् ? आपण् या केसचा छडा नक्की लावु मग् ती मुलगी कोणीही असु,कायद्याच्या चौकटीत् राहुन् काम् करणं जास्त् सोपं असते शिन्दे!!!"
"तुम्ही लवकरात् लवकर् सर्व् प्रोसेस् पुर्ण् करुन् बॉडी जमा करा ,या आता"

तसे दोघेही समाधानाने तेथुन् बाहेर् पडले...

सगळ्यात् पहीली गोष्ट् शिन्देनी चांगली केली ती म्हणजे या सर्व् प्रकरणाची माहीती सचिव् साहेबांना दिली,ते जरी सुरुवातीला थोडेसे विचारात् पडले पण् नंतर् त्यांनीही या प्रकरणात् सर्व् मदत् देण्याचे आश्वासन् दिले ,यामूळे शिन्देंना बराचसा धीर् आला,आता कमीशनर् साहेब् देखील् त्यांच्या सोबत् होते..आता त्यांनी सर्व् सोपस्कार् पुर्ण् करुन् बॉडी तिथे जमा केली ,व् बेपत्ता मुलींच्या नातेवा‌इकांना चौकशी साठी बोलावणे पाठविले.......

त्यातील् पहिली मुलगी सचिवांची होती, दुसरी मुलगी जी कॉलेजात जात होती ती गेल्या १० दिवसांपासुन बेपता असल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी जवळच्या पोलीस स्टेशनात ८ दिवसापुर्वी दीली होती त्यांना आधी चौकशीसाठी बोलवण्यात आले व ईन्स्पे. शिन्देंसमोर त्यांना बसविण्यात आले
ईन्स्पे.शिन्दे त्या माणसाकडे बघुन म्हणाले ..

"काका ,तुमच्या बद्दल आधी माहीती सांगा,व तुमची मुलगी कधी व कशी बेपता झाली ते सांगा,"

तसा तो माणुस म्हणाला" साहेब,माझे नाव दामले मी ला‌ईफ इन्शुरन्स एजंट आहे ,माझी मुलगी प्रेरणा १० दिवसांपासुन गायब झालीये ,त्या दिवशी तिच्या कॉलेजला सुट्टी होती म्हणुन ती माझ्या बहीणीकडे अंधेरी ला तिला भेटायला गेली ,तशी ती नेहमी लोकल ने एकटी प्रवास करते,त्यामुळे आम्हाला काळजी नव्हती,दुसर्या दिवशी लगेचच परतणार होती.संध्याकाळी तिचा फोन देखील आला होता त्यामुळे काही चिंता नव्हती,ती बहिणीकडॅ पोहोचल्याचेही तिने तेव्हा सांगितले ,मीही लोकल मधे होतो त्या मुळे बहीणीशी बोललो नाही,पण दुसर्या दिवशी जेव्हा ती परत आली नाही तेव्हा मी बहिणीला फोन केला होता .ती म्हणाली की प्रेरणा तिथे गेलीच नाही, आम्हाला काही कळेनासं झालं ,मग तिच्या सगळ्या मित्र मैत्रीणींकडे तपास केला पण कुणालाही काहीही माहीती नव्हती.शेवटी पोलीसांत फिर्याद दिली"......एवढे बोलुन दामले हमसाहमशी रडु लागले

ईन्स्पे.शिन्दे त्याना धीर देत म्हणाले " दामले,असे रडु नका,धीर धरा,आणी आम्हाला तपासात मदत करा,मला सांगा प्रेरणा या आधी कधी अशी घराबाहेर राहीली होती?"

तसे स्वतला सावरत दामले म्हणाले "नाही साहेब ,कधीच नाही,आणी कधी तशी वेळ आली तर ती नक्कि फोन करायची"

थोडा विचार करुन शिन्दे म्हणाले "प्रेरणाचे कॉलेजात कुणाशी भांड्ण किंवा प्रेम वैगेरे?"

तसे दामले म्हणाले ” नाही साहेब भांड्ण गंमत म्हणुन सुद्धा ती कुणाशी करणार नाही,आणी प्रेम वैगेरे बद्दल आम्हाला काही कल्पना नाही,पण घरात मला नाही तर तिच्या आ‌ईला तरी निदान तसे काही असते तर तिने सांगितले असते"

ईन्स्पे.शिन्दे :"ठिकेय्‌,दामले ,काळजी करु नका आम्ही तपास करतो आहोतच पण काही गरज लागली तर तुम्हाला पुन्हा इथे यावं लागेल्‌,तो पर्यंत संयम ठेवा!!"

दामलेंना घरी पाठ्वुन ईन्स्पे. शिन्दे आपल्या खुर्चीत विचार करीत बसले..आता त्यांनी शेवटच्या बेपत्ता मुलीच्या नातेवा‌इकांना भेटायचे ठरवले व तिच्या नावाची फा‌इल उघडुन एकदा त्यावर नजर फिरवली ,शांती भोसले नावाची २७ वर्षांची तरुणी मिसींग असल्याची तक्रार ४ दिवसांपुर्वी पोलीसात नोंदवली गेली होती,या तरुणीचे वडील हयात नव्हते,फक्त आ‌ई आणी एक १४-१५ वर्षांचा भा‌ऊ दोघेच होते,ही तरुणी एका महीलांच्या होस्टल मध्ये राहत होती ,तिच्या कमा‌ईवरच घर चालत होते,ती एका खाजगी कंपनीत सेल्स गर्ल चे काम करत होती.ती एका‌एकी गायब झाली होती

शिन्देनी कॉन्स्टेबल भदाणेंना त्या नातेवा‌ईकांना आत पाठवायला सांगितले
त्याबरोबर एक म्हातारी स्त्री व एक पोरसवदा मुलगा आत आले
शिन्देनी त्याना बसायला सांगितले,दोघही बसले,शिन्दे त्याना म्हणाले,

"बा‌ई,हरवलेली मुलगी शांती ,कधी पासुन बेपत्ता आहे ?"

तशी ती म्हातारी स्त्री म्हणाली. "साहेब आम्ही दुर गावाकडे राहतो,शांतीचे बाबा वारल्यापासुन ती ईथे काम करते,झाली आसतील २ते ३ वर्र्ष ,होस्टेलला राहायची ,तिचा अधुन मधुन फोन यायचा ,वर्षातुन १-२ वेळा घरी यायची,दर महिन्याला मनी‌ऑर्डर यायची ,पण या महिन्यात तिचा फोन ही आला नाही किंवा मनी‌ऑर्डर ही आली नाही तसा आम्ही त्या होस्टेल ला फोन केला तर ती लोक म्हणाली की शांती ने मागच्या महीन्यातच ती जागा सोड्ली व दुसरी कडे राहायला गेली,आणी नवीन जागेचा पत्ता किंवा फोन नंबर त्यांच्याकडे नाहीये असे ती लोकं सांगतात, साहेब माझ्या पोरीला शोधुन काढा हो, "

व ती रडु लागली,शिन्देनी तिलाही आश्वस्त केले की तिची मुलगी ऩक्की सापडेल
यावेळी शिन्देंनी या बा‌ईला ही दामलें प्रमाणे बरेच प्रश्न विचारले पण ठोस असे काही समोर आले नाही ,त्यानाही जायला सांगुन शिन्दे विचार करत बसले कि या सर्व मुली कश्या गायब झाल्या असाव्या,तो मिळालेला म्रुतदेह वरील ३ मुलीं पैकी नक्की कुणाचा हे एक रहस्य होते आणी ते फोरेन्सीक अहवाला नंतरच कळणार होते पण त्या‌आधी सचिव साहेबांकडुन त्यांच्या मुलीची माहीती घ्यावी लागणार होती.

शिन्देनी खिशातुन आपला मोबा‌इल काढला तेव्हड्यात त्यांच्या मोबा‌ईल वर सचिव साहेबांचाच फोन आला शिन्देनी फोन ऑन करुन कानाला लावला सचिव स्वत फोन वर होते

"हा,इन्स्पे.शिन्दे,मी बोलतोय्‌,तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती,माझी मुलगी घरी परत आलीये,ती सुखरुप आहे ,ती आमच्यावर रागावुन निघुन गेली होती,एकदा छोट्याश्या कारणावरुन मी तिला रागावलो तर आम्हाला अद्दल शिकवण्यासाठी म्हणून तिने घरात कोणालाच न सांगता शिमला जायचा बेत केला ,तुम्ही मी आपण तिला ईथेच शोधत बसलो,आता जीवात जीव आला ,अगदी हाताबाहेर गेलीय कार्टी ,ती तिकडे कॉलेज ग्रुप सोबत मजा करत होती आणी आपण ईथे नसत्या शंका घेत बसलो, न जाने कशी तिला बुद्धी सुचली आणी परत आली,अहो तिचे सगळ्या मैत्रीणी ही बघा कशा खोट्या बोलल्या ..हा हा हा "

सचिव साहेब बराच वेळ आपल्या लाडक्या कन्येचे प्रताप सांगत बसले ,व शेवटी ईन्स्पे.शिन्देकडे सगळ्या प्रकरणाची माफी मागत त्यांनी फोन ठेवला...आता शिन्दे ही खुप खुश झाले,एकदाचे टेन्शन थोड कमी झाले होते ...

पण खरे प्रकरण अजुन संपले नव्हते,त्यानी कॉन्स्टेबल भदाणेंना दोन्ही मुलींच्या मोबा‌ईल चे कॉल डिटेल्स काढायला सांगितले.आणी चहाची ऑर्डर द्यायला सांगुन थोडे रिलॉक्स बसले...
तेव्हड्यात सब इन्स्पे.रा‌ऊत एका युवकाला घे‌उन तिथे आले ,शिन्देना जय हिन्द सल्युट करुन म्हणाले,

"साहेब् हा मुलगा तुम्हाला भेटायचे म्हणतोय् तो सांगतोय् की तो आपली या केस् मधे मदत् करु शकतो"

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

छान

तुम्हाला जर कथा पुर्ण करता येत नसेल तर कथा क्रमशः लिहित जाऊ नका.

अश्या खुप कथा अपुर्ण राहिल्या आहेत.

सर्वांचे आभार ,अम्बाबाई खुप रागावल्यात ,माफ करा पण काही कारणांमुळे भाग नाही टाकता आले आता लवकरच पोस्ट करतो ,धन्यवाद

"सर्वांचे आभार ,अम्बाबाई खुप रागावल्यात ,माफ करा पण काही कारणांमुळे भाग नाही टाकता आले आता लवकरच पोस्ट करतो ,धन्यवाद"
तुम्हि हे २१/०२/२०१३ sangital ani aata February 2017 yeil ho so please lavkar taka bhag

Where is nxt part?????????????