बरंच काही सांगायचं आहे

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

बर्‍याच काळापूर्वी, माझ्या ब्लॉगवर ही कविता पोस्टली होती. अपूर्ण होती म्हणून. आता ती पूर्ण झाली असं म्हणता येणार नाही. पण इतक्या दिवसात त्यात काही नवीन भर पडलेली नाही आणि काही फारसे बदलही केले गेले नाहीत. काहीशी पाल्हाळ लागली आहे हा दोष खराच, पण पर्याय सापडला नाही. असो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मला तसं बरंच काही सांगायचं आहे
काहीबाहीच असेल कदाचित ..
पण बर्‍याच गोष्टींबद्दल सांगायचं आहे ...

'एवढं कशाबद्दल सांगायचं आहे?'
कशाबद्दलही .. उदाहरणार्थ ..
आईच्या हातच्या ओरपलेल्या आमटीबद्दल
मला न जमणार्‍या चहाबद्दल
आजीला आवडणार्‍या आईस्क्रीमबद्दल,
आठवणीने तिच्यासाठी ते आणणार्‍या आजोबांबद्दल ...
साखरझोपेतल्या केशरी स्वप्नाबद्दल
ओझरत्याच भेटीत झालेल्या नजरबंदीबद्दल ...

झालंच तर ,
जागतिक बाजारातल्या मंदीबद्दल
वाढत जाणार्‍या सामाजिक दरीच्या रुंदीबद्दल
लबाड राजकारणी आणि लाचार जनतेबद्दल
खर्‍याखुर्‍या संत महात्म्यांच्या कल्पनेतल्या समतेबद्दल
जगभरातल्या मनुष्यप्राण्यांच्या स्वातंत्र्यादि हक्कांबद्दल
आफ़्रिकेतल्या genocide बद्दल
पर्यावरणाच्या रोज होणार्‍या र्‍हासाबद्दल
विश्वाच्या उदय-अस्ताच्या प्रमेयांबद्दल ...
... आणि ...
त्यातल्या माझ्या जन्माच्या प्रयोजनाबद्दल !

'कुणाला सांगायचंय?'
कुणालाही ... हो ... अगदी कुणालाही ..
कौतुकाने ऐकणार्‍या आईला
वर्तमानपत्रामागे उत्सुकता लपवून निर्विकारपणे ऐकणार्‍या वडिलांना
पहाटेच्या टपोर प्राजक्तसड्याला
नदीकाठच्या शुचिर्भूत कातळाला
त्या कातळापुढे जुळणार्‍या सुरकुतलेल्या भेगाळ हातांना
विश्वविजयाची इच्छा बाळगणार्‍या सिकंदराच्या वंशजांना
क्रांतीची फक्त गीतेच गात फिरणार्‍या मोकाट भाटांना

रस्त्यावरच्या ओळखीच्या वाटणार्‍या अनोळखी गर्दीला
याला, त्याला, तुम्हाला .....
एवढंच काय ... पण अगदी मला स्वत:लादेखील!

बरंच काही सांगायचं आहे ...
बघू योग कधी येतो ते.

प्रकार: 

आवडली. Happy
एवढंच सांगायचं आहे.

छान पीके.. सांगून मोकळा झालास Happy

कविता चांगली आहे.

अजून काही सांगितलस तरी ऐकू आम्ही परागा. असे कण वेचण्यात आनंदच.

मस्त रे. छान रुपके वापरली आहेस.. Happy
--
सांज अबोला अबोला, सांज कल्लोळ कल्लोळ-
सांज जोगिणी विराणी, सांज साजिरी वेल्हाळ..!

आयला? ही कविता हे होय? Proud
मला तर हे खुपस छानस "स्वगत" वाटल! Happy
चान्गल हे! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

सगळंच तर सांगुन गेलास रे. मस्त Happy

खरंय असं खूप काय काय सांगत बसावंसं वाटतं नाही का कधी कधी?
मस्त वाटलं वाचून.
~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

धन्यवाद!
LT: कविता आणि स्वगत मधला फरक सांग बघू स्पष्ट करून. Proud

परागकण

प.क.
मस्त कविता... Happy
जब बहोत कुछ केहने को जी चाहता है
तब कुछ भी केहने को जी नही चाहता...

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

मस्त आहे.....

पहाटेच्या टपोर प्राजक्तसड्याला
नदीकाठच्या शुचिर्भूत कातळाला
व्वा... क्या बात है!.... या दोन ओळी वाचताना फार छान वाटले Happy