व्हॉट्स-अ‍ॅपच्या पलिकडले......

Submitted by भुंगा on 9 January, 2013 - 22:24

मंगेश पाडगावकर (कवी), पु.ल. देशपांडे (संगीतकार) आणि पं जितेंद्र अभिषेकी (गायक) यांना स्मरून.....
(चु.भू.द्या.घ्या.)

शब्दावाचून कळले सारे
व्हॉट्स-अ‍ॅपच्या पलिकडले.....
प्रथम तुला पिंग केले आणि
घडू नये ते घडले,
व्हॉट्स-अ‍ॅपच्या पलिकडले.

छंद नवा बोटांस मिळाला
मेसेज नवे, स्टेटसही निराळा
त्या दिवशी का प्रथमच माझे
काम जरा गडबडले......
व्हॉट्स-अ‍ॅपच्या पलिकडले.

भर दिवसा अन मध्यान्ह राती
फोन सदा घेऊनी हाती
प्रोफाईलमध्ये तुझ्या स्टेटस पाहूनी
तिथेच मन घुटमळले.....
व्हॉट्स-अ‍ॅपच्या पलिकडले.

शब्दावाचून कळले सारे
व्हॉट्स-अ‍ॅपच्या पलिकडले.....
प्रथम तुला पिंग केले आणि
घडू नये ते घडले,
व्हॉट्स-अ‍ॅपच्या पलिकडले...........!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"व्हॉट्स-अ‍ॅपच्या पलिन्हान्साफो"
हे मुद्दाम आहे का भुंगा?? की टायपो?

हाहा

व्हॉटस-अ‍ॅप पलिकडले >>>>

भुंग्स, वानरांच्या पलिकडले काय शोधतोयस ? Proud