तुला पाहून मदिरेचा रिकामा झिंगला प्याला!

Submitted by सतीश देवपूरकर on 2 January, 2013 - 23:15

गझल
तुला पाहून मदिरेचा रिकामा झिंगला प्याला!
पिण्याआधीच बोभाटा पिण्याचा केवढा झाला!!

कुणाची चाल ती होती? कुणाचा खेळ तो होता?
असो काही, अता माझा, जिण्याचा फैसला झाला!

बहरण्याचा तुम्हाला घ्यायला लागेल परवाना....
तसा बागेत ह्या यंदा फुलांनो कायदा झाला!

उगवला सूर्य ह्या अंधारल्या वस्तीतही अंती!
कुणाचा त्यामधे तोटा, कुणाचा फायदा झाला!!

कधी मी शोधले त्याला, कधी मज शोधले त्याने....
कधी परक्यापरी माझा किनारा चालता झाला!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला पाहून मदिरेचा रिकामा झिंगला प्याला!
पिण्याआधीच बोभाटा पिण्याचा केवढा झाला!!<<< वा

बहरण्याचा तुम्हाला घ्यायला लागेल परवाना..<<< चांगली ओळ

उगवला सूर्य ह्या अंधारल्या वस्तीतही अंती!
कुणाचा त्यामधे तोटा, कुणाचा फायदा झाला!!<<< आवडला शेर

कधी मी शोधले त्याला, कधी मज शोधले त्याने....
कधी परक्यापरी माझा किनारा चालता झाला!<<< व्वा वा

गझल आवडली.

तुला पाहून मदिरेचा रिकामा झिंगला प्याला!
पिण्याआधीच बोभाटा पिण्याचा केवढा झाला!!............. क्या बात है!!!! एकदम नशीला मतला.

बाकीचे शेर इतके नाही आवडले.

भूषणराव! कैलासराव! धन्यवाद!
आमच्यावरचा राग गेलेला पाहून मनस्वी आनंद झाला!
आपली दाद (अनुकूल/प्रतिकूल) आमच्या दृष्टीने फार मोलाची आहे!
भूषणराव! मध्यंतरी प्रतिसाद लिहिताना आमचा संयम ढळला याबद्दल क्षमस्व!
आपल्याबद्दलचा मनातील आदर तसूभरही कमी झालेला नाही!
गझलक्षेत्रात जर काही नवे प्रवाह येत असतील तर आम्हासही जाणीवपूर्वक त्या दिशेने जायला आवडेल!
वरील गझल आमच्या रानफुले संग्रहातील आहे, जशी होती तशी दिली आहे!
ज्या वेळी रदीफ म्हणजे काय? काफिया म्हणजे काय? हेही जाणीवेत आले नव्हते तेव्हाच्या काळात लिहिलेली ही रचना!
प्रा.सुरेशचंद्र नाडकरणी सरांनी या रचनेची खूपच तारीफ केली होती. ते आमचे वळचणीचे, हक्काचे, शेजारी,प्रथमश्रोते, सहकारी व गुरू होते! भूशास्त्र व जीवशस्त्र विभाग शेजारी शेजारीच आहेत आमच्या महाविद्यालयात...एकाच मजल्यावर!
असाच लोभ कायम ठेवावा!
प्रा.सतीश देवपूरकर

तुला पाहून मदिरेचा रिकामा झिंगला प्याला!
पिण्याआधीच बोभाटा पिण्याचा केवढा झाला!!>>> क्या बात है मास्तर!!!!!!!! एकदम भारी.

तुला पाहून मदिरेचा रिकामा झिंगला प्याला!
पिण्याआधीच बोभाटा पिण्याचा केवढा झाला!!

>>> वाह वाह , क्या बात है !!

चीअर्स सर !!

( अवांतर : ह्या वरुन आठवले , मदिरापानाचा धागा बरेच दिवस वर दिसला नाही ...रसिकांनी मद्यपान सोदले की कॉय :अओ:)

प्रसादपंत!
आम्ही फक्त गझलमदिरापानच करतो!
बाकी, आमचा सगळ्याचाच कोटा संपला आहे!

खूप आवडली गझल सर्व शेर छान आहेत

<<<<तसा बागेमधे यंदा फुलांनो कायदा झाला >>>> असा बदल करून , भरीचा वाटणारा ह्या हा शब्द (वै म्) काढून शेर वाचला (हा पर्याय वगैरे नाही आहे कृ गै न)

कधी परक्यापरी माझा किनारा चालता झाला!>>>>ही ओळ अजिबात समजली नाही अर्थ लागला नाही शाब्दिक अर्थ समजला पण भाषिक अंगाने विचार करता त्या वाक्याची काव्यात्मकता समजली नाही उर्दू वगैरे शेरावरून हा लिहिला आहे का व अनुवादाच्या नादात असे झाले असावे वगैरे ...कृपया कळवा(थोडक्यात!!!)

तस्वीर तेरी लेकिन लिये मै कर आया सबसे किनारा>>> अशी एक ओळ एका गाण्यात आहे त्यावरून तसे वाटले

चू भू द्या घ्या