मी काढलेल्या संस्कारभारतीच्या रांगोळ्या...

Submitted by अर्चना पुराणिक on 2 January, 2013 - 05:32

मी काढलेल्या संस्कारभारतीच्या रांगोळ्या...आवडल्या असतील तर नक्की सांगा Happy

rangoli.jpgSAM_2968.jpgnumber 2.jpgabb.jpgDiwali 12.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच आहेत...
या तंत्राबद्दल पण एकदा सविस्तर लिहिणार का ?>>> खरंच लिहा... Happy काढता येत नसल्या तरी तंत्र जाणून घ्यायला आवडेल!

अर्चना ------- छा गई !!!! मा बो वर ......:) Happy अजुन ही आहेत ग तुझ्या मस्त मस्त रान्गोळ्या ...त्या पण टाक इथे.......

४ थी मस्तच...........दोन्ही रंग गडद असुन ही एकमेकांविरुद्ध आहेत....... छान इफेक्ट दिसतो

सुरेखच काढतेस अर्चना रांगोळ्या.

दिनेश हो.....ह्याचं वेगळं तंत्र असतं. अर्चना इथे कुवेतमधे ह्या रांगोळ्या काढायला शिकवते.

कमी वेळात, सुंदर आणि आकाराने मोठ्या रांगोळ्या काढलेल्या फक्त बघितल्या आहेत. पण काढताना कधी बघितले नाही.
अर्थात नुसते तंत्र नाही, यात हाताचे वळण पण तितकेच महत्वाचे आहे. ( आणि ते काही शिकवून येणारे नाही Happy ) तरी पण जरा सविस्तर वाचायचे आहे.

छानच

दिनेशदा ही रांगोळी काढताना जरा जाडसर पांढरी रांगोळी निवडावी लागते. मग हाताची पाच ही बोटे चंबु टाईप एकत्र करुन त्यातुन ही रांगोळी सरसर सोडावी. या रांगोळीचे बेसिक चिन्ह आहेत जसे बिंदु, गोपद्म, रेष, चकली, ई.
ते आधी सराव करुन घ्यायचा. मग मोठी रांगोळी काढता येते.

माझ्याकडे काही रांगोळीच्या क्लिप्स आहेत त्यापण इथे टाकायचा प्रयत्न करते Happy
ही पाच बोटांनी काढायची रांगोळी आहे.काही लोक ही रांगोळी मुठीने काढतात पण ते माझ्यामते तरी बरोबर नाही.ही रांगोळी आगदी खरबरीत असते जेणेकरून ती टाकायला सोपी जाते.या रांगोळीत रंग आधी टाकून त्यावर रांगोळी काढायची असते.

रांगोळीची बेसिक चिन्ह-बिंदू,सरळ रेष,आर्ध गोल,गोल (वर्तुळ),केंद्रवर्धिनी(चकली),उभी केंद्रवर्धिनी,गोपद्म,शृंखला,सर्प रेषा,बाण ई...या गोष्टी आल्या की,संस्कारभारतीची रांगोळी काढायला आलीच
म्हणुन समजा... Happy

मग त्या आकाराखालचे रंग कसे भरतात. चाळणी / गाळणी वापरता का ?
माझ्याकडे एक रांगोळी पेन होते ( कोल्हापूरला मिळाले होते ) त्याला पाच छिद्रे होती. त्यापैकी सर्वच स्वतंत्रपणे झाकण लावून उघडबंद करता येत असत. त्याने छान रेघा आणि आकार काढता येत पण असे त्रिमिती ( उठावदार ) आकार जमत नसत.

आणि तरीही असे समोरासमोरचे आकार नेमके एकरुप काढायचे कौशल्य, जमायला खुप सराव हवा नाही का ?

इथे आफ्रिकेत रंग क्वचितच मिळतात आणि तेदेखील खुप महाग असतात. मग ते पाण्यात भिजवून, इयरबड्स वापरुन ( तामिळ लोक करतात तसे ) आकृती काढत असतो आम्ही.

मस्त!

हो चाळणी/गाळणी वापरतात...जर भरपूर रंग असतील आणि मोठी रांगोळी काढायची असेल तर चाळणी वापरायची...छोटी रांगोळी व कमी रंग असतील तर गाळणी वापरायची...पेन बद्दल,ज्यांना ही
रांगोळी हाताने जमत नाही त्यांच्या करता ठिक आहे...पण हाताने काढलेली रांगोळी छानच.. Happy

Pages