मला ओरबाडून तो काळ गेला!

Submitted by सतीश देवपूरकर on 1 January, 2013 - 00:38

गझल
मला ओरबाडून तो काळ गेला!
हिरावून सर्वस्व तो काळ गेला!!

न आले कुणीही मला हात द्याया.....
लुबाडून अस्तित्व तो काळ गेला!

किती फोडला जीवघेणाच टाहो!
झुगारून आकांत तो काळ गेला!!

किती हिंस्र होता पशूंचा गराडा.....
मला त्यात सोडून तो काळ गेला!

किती झुंजले जीवना! मी तुझ्यास्तव....
मला मात देवून तो काळ गेला!

अता पेटल्या मेणबत्त्या, मशाली!
कळ्या मात्र तोडून तो काळ गेला!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान !!
.रचना मुसल्सल आहे.. सत्य घटनेचा सन्दर्भही आहे या बाबी विषेश आवडल्या
अ ह्या अलामतीचा स्वरकाफिया आहे तो अधिकृतपणे चालत नसला तरी माझ्यासाठी ही गझलच आहे

मस्त

सर्व रसिकांचे आभार!
स्वरकाफिया वापरण्याचा एक प्रयत्न होता!

जर हे झेंगाट आहे तर ते गझलेत घेतले कशाला आणि ते काय आहे हे जर मान्यवरांनी सांगणे अपेक्षित आहे तर आपण काय करत आहोत हेच कळालेले नाही असे मानावे का?