स्त्रीची ’प्रतिज्ञा’

Submitted by उमेश कोठीकर on 29 December, 2012 - 04:37

हा माझा बलात्का-यांचा देश आहे
सारे माझे बांधव बलात्कारी आहेत
तरीही माझ्या बलात्कारी देशावर माझे प्रेम आहे
माझ्या बलात्कारी देशातल्या बलात्काराने समृद्ध आणि त्या ’कले’तील
विविधतेने नटलेल्या पशुवत परंपरांचा मला अभिमान आहे
त्या बलात्कारी परंपरांची बळी होण्याची पात्रता
माझ्या ’अंगी’ यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन
मी येथील लहानांपासून ते
वडीलधार्‍या सर्व पुरूषांच्या बलात्कारी प्रवृत्तींचा मान ठेवीन
आणि बलात्कारावेळी प्रत्येकाशी सौजन्याने आणि नंतर आयुष्यभर भिउन वागेन
माझा बलात्कारी देश आणि माझे बलात्कारी देश ’बांधव’
यांच्याशी एक मादी म्हणून निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे
त्यांचे बलाक्तारानंतरचे होणारे ’कल्याण’ आणि
त्यांची हिंस्त्र वासनांध समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झणझणीत उपहासाने भरलेल्या प्रतिज्ञेतील भावना पोहोचल्या. संताप व कळकळ पटण्यासारखीच.

मात्र सर्वच पुरुष असे असतात हे (उपरोधानेही) म्हणणे धाडसाचे वाटते.