लागली आताच मजला ठेच, हे झाले बरे!

Submitted by सतीश देवपूरकर on 28 December, 2012 - 10:51

गझल
लागली आताच मजला ठेच, हे झाले बरे!
व्हायच्या आधीच सुटला पेच, हे झाले बरे!!

गंध ती उधळीत होती, भानही नव्हते मला.....
ती इशा-याने म्हणाली वेच, हे झाले बरे!

निसरडा रस्ता, बघ्यांचा घोळका, चंचल हृदय.....
संपली वेळेत रस्सीखेच, हे झाले बरे!

एवढे घोकूनही आले न जे मज सांगता;
आज ती बोलून गेली तेच, हे झाले बरे!

रोज दिसतो निरनिराळा रंग दुनियेचा मला!
चित्र माझे राहिले अर्धेच, हे झाले बरे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोज दिसतो निरनिराळा रंग दुनियेचा मला!
चित्र माझे राहिले अर्धेच, हे झाले बरे!

उत्तम शेर !

टुकार शेरांची मालिका.

>>>निसरडा रस्ता, बघ्यांचा घोळका, चंचल हृदय.....
संपली वेळेत रस्सीखेच, हे झाले बरे!<<<

ही कसली रस्सीखेच होती म्हणे? ती वेळेत संपली नसती तर काय होणार होते? हे बघे कोण होते? हृदय चंचल असल्याने काय होणार होते? शब्दांची चपखलता कुठे मार खाऊन बसली आहे?

>>>रोज दिसतो निरनिराळा रंग दुनियेचा मला!
चित्र माझे राहिले अर्धेच, हे झाले बरे!
<<<

म्हणजे काय ब्वॉ? रोज दुनियेचा निरनिराळा रंग कवीला दिसत आहे व (त्यामुळे / तरीसुद्धा / त्याशिवाय इत्यादी) कवीचे चित्र अर्धेच राहणे हे बरे झाले आहे म्हणजे काय?

आशय अचूकपणे, चपखलपणे शब्दांत बसायला हवा ही किमान अट न पाळणारी गझलतंत्रातील रचना!

-'बेफिकीर'!

बेफिकीर,
आता मात्र तुम्ही आगाऊपणा करताय. तुम्ही चांगले गझलकार आहात ते मान्य. पण एखाद्याच्या मागे लागून जास्तीचा शहाणपणा जो चालविला आहे ते थांबवाल तर बरे होइल.
तुम्ही जे काही चालविले आहे तो केवळ मुर्खपणा आहे.

जंगलात माकडे गुन्जेच्या लालबुंद फळाना विस्तव समजून शे़कोटी पेटवत असतात
एक सुंदर गाणारा पक्षी झाडाच्या टो़काच्या फांदीवर(अतिशय उच्च पदावर) बसून हे पाहत असतो अन त्या माकडाना समजावत असतो की ती फळे आहेत म्हणून तो पक्षी गाणारा असल्याने गावून सांगत असतो अन माकडानात्यातले काही समजत नसल्याने /आवडतही नसल्याने ते वैतागतात अन एकजण जावून त्या पक्षाच्या नरड्याचा घोट घेतो

शेवटी काय मूर्खाना काही सांगणे म्हणजे आत्मनाश होय !!!!

अश्या स्टोरीलाईनचे एक संस्कृत सुभाषित आहे

देवपूरकर म्ह्जणजे तेच नाठाळ माकड आहेत तर तुम्ही गझल गणारा तो सुंदर पक्षी आहात बेफीजी जो गझलेच्या झाडावर अत्युच्च स्थानी विराजमान आहे !!!

तेव्हा असे काही करून आत्मनाश करवून घेवू नये ही विनंती

नवाच एक कुणीतरी.....
मला असं वाटतंय की तुम्ही शिष्टाचाराची मर्यादा सोडून बोलताय....
एकाला झाडावर चढवणं आणि दुसर्‍याला पाडणं हे एकवेळ समजू शकतो मी..पण भलतीसलती विशेषणं कृपा करून वापरू नका....एकाने केले म्हणून दुसर्‍याने,मग तिसर्‍याने...असे करून इथे जंगलातले असले नसलेले प्राणी गोळा होतील....
सुज्ञांस अधिक सांगणे न लगे!

>>>बेफिकीर,
आता मात्र तुम्ही आगाऊपणा करताय. तुम्ही चांगले गझलकार आहात ते मान्य. पण एखाद्याच्या मागे लागून जास्तीचा शहाणपणा जो चालविला आहे ते थांबवाल तर बरे होइल.
तुम्ही जे काही चालविले आहे तो केवळ मुर्खपणा आहे.<<<

श्रीयुत लालशाह,

तोंड जरा सांभाळून वागत चला. तुम्ही येथे काय उजेड पाडलेला आहेत हे माहीत नाही. मात्र प्रोफेसरांनी यच्चयावत गझलकारांशी पराकोटीचे वाद घालून 'आपण किती चिंतन करून गझललेखन करतो' याचे धादांत ढोंगी प्रदर्शन नित्य चालवलेले आहे. काही येऊ घातलेले व मायबोलीबाह्य गझलकार आता येथे गझल लेखन करताना बिचकत आहेत. हेही एकवेळ समजण्यासारखे होते, पण काल प्रोफेसरांनी अनंत आणि समीर यांना अप्रत्यक्षपणे उद्देशून जी विशेषणे जोडली (स्वरकाफियाच्या चर्चेत - घिसाडघाई, गझलउतावीळ आणि इतर अनेक) ती पाहता या माणसाच्या गझलेवर यापेक्षा सबुरीने प्रतिसाद देणे हे मुळात मराठी गझलेलाच मारक आहे हे माझे स्पष्ट मत आहे. तसेही, आगाऊपणा व मूर्खपणा वाटल्यास प्रतिसाद उडवण्यास प्रशासन समर्थ आहे. आपण नाक खुपसून स्वतःचा सौंदर्यबोध येथे प्रदर्शीत नाही केलात तरी चालेल.

सदर गझल सामान्य आहे हे मी सोदाहरण स्पष्ट करू शकतो. काही वेळाने किंवा उद्यापरवा करेनही.

-'बेफिकीर'!

प्राध्यापकमहाशय,

मला गझलेतलं काही कळंत नाही. तुमच्यापुढे मी बापडा काय बोलणार. एव्हढंच म्हणू इच्छितो :

स्वप्नात बांधलेले, भव्यदिव्य बंगले मी !
उडाली झोप हलकेच, हे झाले बरे !!

आ.न.,
-गा.पै.

नावाचा एक कुणीतरी!
ज्याला आपण कोण आहोत तेच माहीत नाही, स्वत:चे खरे नाव लावायची हिम्मत नाही, जो कोणती तरी झूल पांघरण्यात धन्यता मानतो, जो भाटगिरी करण्यात अग्रेसर असतो, ज्याच्या स्वत:च्या पात्रतेचा पत्ता नाही, अशाने कुठल्यातरी बालिश दंतकथा सांगून कुणालाही काहीही संबोधावे याला काय म्हणावे?
कुणाला माकड, कुणाला अत्युच्च स्थानावर बसलेला गाणारा पक्षी म्हणताना आपले स्वत:चे जीवशास्त्रीय स्थानही जाहीर करावे! आपण कुठे उभे आहोत हे पहावे माणसाने नेहमी! दुस-यांच्या स्थाननिश्चितीचा आगंतुक खटाटोप करून आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करू नये! अशाने हसू येण्यापेक्षा हसेच होते!
निदान ख-या नावने वावरायला तरी शिकावे माणसाने मुखवटे काढून!
आणि हिम्मत असेल तर तर्कशुद्ध चर्चा करावी!

गामा पैलवान!
छान खयाल!
मला गझलेतलं काही कळंत नाही. तुमच्यापुढे मी बापडा काय बोलणार.<<<<<<
गामाजी! गझलेतले आम्हास तरी कुठे कळते? गझलेतले ज्यांना कळते, जे सध्या तारे तोडत आहेत, त्यांच्यापुढे काय बोलणार असे म्हणा! आम्हीही बापडेच आहोत! कुणीही सोम्यागोम्या आता आपले ज्ञानविज्ञान गझलेवर मुक्तपणे पाजळत आहे! आम्ही देखिल आपणाइतकेच बापडे आहोत! बाप समजणा-यांचे बरळणे ऐकून सोडून देणे यापलिकडे कुठलीही दखल आता आम्ही घेणार नाही, कारण नंगेसे खुदाभी डरता है, असे खरे जाणकार(स्वयंघोषित नव्हे) म्हणतात!
कालाय तस्मै नम:!
प्रा.सतीश देवपूरकर

धन्यवाद प्रमोदजी!
अडाण्यांना सूज्ञांची भाषा कशी कळणार हो?
टीप: दुस-याची पिसे काढण्याच्या दांभिक खटाटोपाने स्वत:च्या टोपीत पिसे खोचली जात नाहीत!

लालशाह!
आहो कुठल्या अतीसामान्य गझल/गझलकार कैवारी पिसाटाच्या नादी लागताय? त्यांच्या नसलेल्या लखलखाटापुढे सगळे जग दिपल्याचा त्यांना भास होताना स्पष्ट दिसत आहे! स्वत: तोंडाला येईल ते बेताल बोलून दुस-यांना तोंड सांभाळायला सांगणा-याच्या नादी लागून कशाला आपली वाणी विटाळून घ्यायची?
आपल्या वेळेचा आपण सदुपयोग करावा! ज्याच्या नासासात दंभ भरले आहे त्याला दंभाशिवाय दुसरे काय दिसणार? जशी दृष्टी तशी सृष्टी!
प्रा.सतीश देवपूरकर

टुकार, निर्बुद्ध, अरसिक, असंबद्ध, पोरकट, लिंबूटिंबू, द्वेष्मूलक व अदखलपात्र प्रतिसादाची दखल कशास घ्यावी?

धन्यवाद प्रसादपंत!
पण मायबोलीचे ठेकेदार तर काही वेगळेच बरळत सुटलेत! पाहिलेत ना वर उधळलेले रंग?
प्रा.सतीश देवपूरकर

धन्यवाद अरविंदराव आपल्या प्रांजळ प्रतिसादाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल!
कुठलीच ठेकेदारी कधीही कायमची नसते!
प्रा.सतीश देवपूरकर
टीप: पुढील गझलेत काळजी घेतली जाईल! यावेळेस क्षमस्व!

सतीशजी,
मला वाटते की, "हे झाले बरे.." हा रदीफ व्यवस्थित बसला नाहीये.

रोज दिसतो निरनिराळा रंग दुनियेचा मला!
चित्र माझे राहिले अर्धेच, हे झाले बरे!!

या शेरात "हे झाले बरे" हे काडून टाकले तर शेर कुठच्या कुठे वर जातो. पण, "हे झाले बरे" यामुळे तो फार खाली येतो आहे. मुळामध्ये रोज दुनियेचा रंग बदलत असल्याने मी काढत असलेले चित्र कधीच पूर्ण होत नाही असे तुम्हाला म्हणायचे असावे. पण, चित्र अर्धे राहिले आहे ते बरे आहे, असे म्हणणे योग्य वाटत नाही. कारण, त्यामुळे चित्र काढणारा कमी ताकदीचा आहे असे रडतराऊपणाचे वाटते. जवळपास सगळ्याच शेरात असे झाले आहे. दुनियेला रंग बदलत राहू दे, मी चित्र काढत राहणार - असे असते तर चांगले वाटले असते.
असो.
शेवटी निर्णय गझलकाराचाच.

अ.अ. जोशी!
रोज दिसतो निरनिराळा रंग दुनियेचा मला!
चित्र माझे राहिले अर्धेच, हे झाले बरे!<<<<<<<<<<<<<

या शेरात उपहास आहे! दुनिया (एखद्या सरड्याप्रमाणे) साखा रंग बदलत आहे, असे सूचीत केले आहे. इथे सरडा अव्यक्त आहे, कारण रंगपालट हा सरड्याचा गुणधर्म आहे असे आपण मानतो!
माझे चित्र दररोज अर्धेच राहते हे बरे झाले असे आम्ही म्हणतो कारण परत परत कुठल्या न कुठल्या रंगाची चित्रात कमतरताच भासत आहे, जी मला पुरी करायास आता वाव आहे! या अर्थाने मी म्हणतो की, हे झाले बरे!

बेफिकीर,

प्रकाश दिसायला स्वतः उजेड पाडायची आवश्यकता असते?

तुम्ही टीका केली नाहीत तर सतीश यान्च्या रचना मराठी गझलेला मारक ठरतील हे लिहून आपण आपल्यावर आणि सतीशजीन्वर खूप मोठी जबाबदारी घेताय. ती आपल्याला पेलू दे ही प्रार्थना.

गझल काही खास वाटली नाही. मला गझलेतले काही कळत नाही. पण काय कमी असावे याचा विचार करत होते. बेफिकिर यांची सांगण्याची पद्धत चुकीची असली तरी मुद्दे पटतायत. ते 'हे झाले बरे' ही अटॅचमेंट थोडी अवघडच आहे. आणि ती पहिल्यापासून शेवटपर्यंत एकाही ठिकाणि सणसणीत्पणे फिट होत नाहीये.
>> या शेरात "हे झाले बरे" हे काडून टाकले तर शेर कुठच्या कुठे वर जातो. पण, "हे झाले बरे" यामुळे तो फार खाली येतो आहे.
अ.अ. जोशी यांनी सांगितल्यावर अगदी जाणवले.
त्यावर तुम्ही लिहीलेले उत्तर विचित्र वाटते आहे. सरड्याचा काय संबंध? चित्र दररोज अर्धे रहाते असे तुम्ही शेरात कुठे म्हणलेय? उलट आता तुमचे उत्तर वाचून अजून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे पहिल्या आणि दुसर्या ओळीत काळ पण सेम नाहीये.
anyway,
>> गंध ती उधळीत होती, भानही नव्हते मला.....
ती इशा-याने म्हणाली वेच, हे झाले बरे!

हा शेर चांगला आहे.

Pages