प्रतापगड दुर्गदर्शन मोहीम - २५/१२/२०१२

Submitted by मी दुर्गवीर on 26 December, 2012 - 09:05

जय शिवराय
दि. २५/१२/२०१२ रोजी दुर्गवीर परिवार(प्रतिष्ठान) व स्वराज्य मित्रमंडळ, विलेपार्ले यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले प्रतापगड दुर्गदर्शन व शैक्षणिक सहल याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोहिमेत तब्बल ७५ शिवभक्तांनी सहभाग नोंदविला होता. यात शालेय-महाविद्यालयीन मुले-मुलीं पासुन वयस्क गृहस्था पर्यंत सर्व शिवप्रेमींचा सहभाग होता. या मोहिमेत दुर्गवीरच्या काही मावळ्यांनी सर्वाना गडदर्शन, दुर्गवीरचे कार्य, श्रमदान या विषयी माहिती दिली. तसेच दुर्गवीर संस्थापक संतोष हसुरकर यांनी सर्वाना ऐतिहासिक गोष्टींबद्दल अचूक माहिती सांगितली. दुर्गवीर चे जुने मावळे राजेश सावंत यांनी दुर्गवीर प्रतिष्ठान व स्वराज्य मित्र मंडळ यांच्यातील हा योग घडवून आणला..
जय शिवराय
asasa.jpgss22212121.jpga2222.jpg

मुंबई च्या शिवभक्तांना मार्गदर्शन करताना दुर्गवीर.....

111.jpg
"शिवप्रतापभूमी" असे या फलकावर लिहिले आहे. "शिवप्रतापभूमी" म्हणजेच प्रतापगड च्या पायथ्याची ती जागा जिथे महराजांनी क्रूर अफजल खानास संपवले... एवढा मोठा प्रताप दाखवूनही त्याचा फलक मात्र या दयनीय अवस्थेत आहे....... हि आपली उदासीनता आपल्या इतिहासाबाबत...

212.jpgeee.jpg

प्रतापगडावर दुर्गदर्शन करतान दुर्गवीर च्या मावळ्यांना काही ठिकाणी कचरा पसरलेला दिसला.. आणि नेहमी प्रमाणे दुर्गवीरां नि आपल्या कर्तव्याला जागून कचरा उचलून परिसर स्वच्छ केला
ddd.jpg
गडावरील तोफा ...
rrr_0.jpg
हीच ती महाराजांची पंचधातूची भव्य मूर्ती इथे शिवकाळात बालेकिल्ला किंवा राजांचे बसण्याचे ठिकाण होते...

eeeeeeeeeeeeeeee.jpg
महाराजांची पंचधातूची भव्य मूर्ती असलेल्या ठिकाणी दुर्गवीर मावळ्यांनी आरोळी देऊन महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर दणाणून सोडला..

8.jpg
महाराजांची पंचधातूची भव्य मूर्ती असलेल्या ठिकाणी दुर्गवीर मावळ्यांनी आरोळी देऊन दुर्गवीर ते थांबले नाहीत तर त्या परिसरात सुकलेल्या फुलांचा कचरा झाला होता तोहि स्वच्छ केला
7.jpg9.jpg89.jpg66.jpg
महाराजांची पंचधातूची भव्य मूर्ती असलेल्या ठिकाणी दुर्गवीर मावळ्यांनी आरोळी देऊन दुर्गवीर ते थांबले नाहीत तर त्या परिसरात सुकलेल्या फुलांचा कचरा झाला होता तोहि स्वच्छ केला
89_0.jpg34.jpg56.jpg4545.jpg45.jpg
जमा केलेला कचरा तिथे असलेल्या कचऱ्याच्या दालनात टाकण्यात आले ...

4444.jpg
महाराजांची पंचधातूची भव्य मूर्ती असलेल्या ठिकाणी दुर्गवीर मावळ्यांनी साफसफाई केल्यानंतर त्या परिसराचे दृश्य...

dddddddddddddddddddddddddddd.jpg
नाही दंभ नाही अहंकार
आम्ही शिवरायांचे करितो कार्य !
दुर्गवीरचे मावळे आम्ही
रक्तात आमच्या शिवकार्य !!

kkkkkkkkkkkkkkk.jpg655.jpg
गडावरील जात

qwq.jpg
प्रतापगडाचे एक विलोभनीय दृश्य...

दुर्गवीर नेहमीच वेगवेगळ्या कार्यातून गडजनजागृती करत असतात .....
येणाऱ्या पिढीला या गडाचे महत्व व शिवरायांनी स्वराज्य उभे केले ,म्हणजे नेमके काय केले ..याची संपूर्ण
जाणीव या आलेल्या शिवभक्तांना होवो या साठी केलेला एक प्रयत्न ....

जय शिवशंभूछत्रपती
धन्यवाद "दुर्गवीर" नितीन पाटोळे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकांना नेमके झालयं तरी काय? जिथे जाईल तिथे कचरा? सेवेत ठेवलेले शासकिय सेवकही कामचुकार आहेत. त्यांना देखील कसली खंत असताना दिसत नाही.. Sad

दुर्गवीर सारख्या अनेक संस्था सर्वत्र जाउन जमेल तशी साफ-सफाइ करत आहेत. तट-बुरुज साफ कर्त आहेत. निधीची चण-चण आहे नाहीतर ह्या संस्थांनी गड-किल्ले पुर्णवेळ दत्तक घेउन अधिक जोमाने आणि अधिक परिणामकारक काम करून दाखवले असते.

सरकार तर अक्षरशः दणिद्री आहे.... आणि लोकं त्याहून मला दणिद्री... Angry

मस्त रे मित्रा....शासनाकडून अपेक्षा ठेवणे मूर्खपणा आहे....त्त्यापेक्षा आपल्या बाजूने जमेल तेवढे,जमेल तितके शिवकार्य करण्याचा उपक्रम आवडला !
आपल्याकडून जमेल तिथे माहिती फलक लावणेही जरुरीचे आहे.मागील वेळी सोनोरी वर शिवकार्य केलं होतं आणि तेथील माळरानावर सुमारे २५० रोपे लावलेली.१-२ महिन्यांनी त्याच किल्ल्यावर काही हौशी आयटीयन्स किल्ले सफाईसाठी आले आणि माजलेले तण समजून सगळी रोपं साफ करून गेले.

अतिशय चांगला उपक्रम.
कालचे दोन दिवस रायगडावरचा अगदी महाराजांच्या समाधीच्या इथला आणि गडावर इतरत्र कागदबोळ्यांचा कचरा मी स्वतः साफ केला आहे, पाणी, शीतपेयांच्या बाटल्या कचरापेटींमध्ये टाकल्या आहेत. लोकांना समजावायला गेले तरी त्यांना आवडत नाही. टिंगल टवाळीही करतात, ह्यात अगदी कुटुंबवत्सल लोकही आले. जर पुढची पिढी हेच बघत आणि अनुभवत मोठी होणार, मग त्यांच्याकडून तरी काय अपेक्षा करता येईल?

माळरानावर सुमारे २५० रोपे लावलेली.१-२ महिन्यांनी त्याच किल्ल्यावर काही हौशी आयटीयन्स किल्ले सफाईसाठी आले आणि माजलेले तण समजून सगळी रोपं साफ करून गेले.

>>> अरेरे.. मालोजीराव.. पुढच्यावेळी ते क्षेत्र संरक्षित करण्याच्या दृष्टीने काहीतरी पावले उचला. नाम फलक वगैरे.

शैलजा... पिनॅकल बरोबर रॅपलिंगसाठी गेली होतीस की काय? की सहजच?

माणुस बघून शिकतो ना दा. वडिलधारी मंडळीच ते अंगी बाळगत नाहीत तर मुलं कुठुन शिकणार.... हे चक्र चालुच आहे.