दत्त दत्त दत्त

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 26 December, 2012 - 06:43

दत्त दत्त दत्त
मुग्ध झाले चित्त
सदोदित गात
तेच नाम ll १ll
आणि आठवत
कृपाळू ते स्मित
आनंदे व्यापत
तनमन ll २ll
तया कळे सारे
काय माझे हित
असे जीवनात
सत्ता त्याची ll ३ll
हसतो सुखात
रडतो दु:खात
असे कर्मगत
हे तो सारे ll ४ll
परी सर्व काळ
असे त्याची साथ
डोईवरी हात
वाहतो मी ll५ ll

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली !

धन्यवाद शशांक ,विभाग्रज,,बेफिकीर ,मा.पै.,मुक्तेश्वर