बलात्कार माणुसकीचा

Submitted by प्रसाद पासे on 20 December, 2012 - 05:48

(आताच्या परिस्थिती बघता बलात्काराची संख्या वाढलेली आहे, त्याचा निषेध म्हणून हे काव्य)

बलात्कार माणुसकीचा

जन्मला जेथून, उद्धार केला त्यांचा
नसे संयम ज्यास तो मर्द न खरा
धिक्कार असो या अश्लाघ्य वर्तनाचा
हा तर बलात्कार माणुसकीचा

ह्यांच्या परिस जनावरे बरी
कुठे हरवली आज माणुसकी?
धिक्कार असो ह्या षंढांचा
हा तर बलात्कार माणुसकीचा

कामुकतेच्या अधिरतेची मनोविकृती
मर्द नाही जो करे अशी हि कृती
धिक्कार असो ह्या नामर्दतेचा
हा तर बलात्कार माणुसकीचा

जनावरांहून बत्थर हि वृत्ती
सदैव असे वासना हि चित्ती
धिक्कार असो ह्या नपुंसकांचा
हा तर बलात्कार माणुसकीचा

प्र. रा. पासे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवितेचा बलात्कार
( अवांतर : बर्‍याच जागी घोळ आहे हो
ह्यांच्या परिस जनावरे बरी >>> ते कसे बुवा ? उलट जनावरात जो स्ट्रॉन्ग असतो...तो इतर दुबळ्यांन्ना चेपतो अन पाहिजे ते मिळवतो .
धिक्कार असो ह्या षंढांचा /धिक्कार असो ह्या नपुंसकांचा >>>> परत घोळ , अहो हे जर षंढ / नपुंसक असते तर बलात्कार करुच शकले नसते .)

प्रत्येक प्रसंगावर कविता झालीच पाहिजे असा काही आग्रह आहे का ?

असो . ज्याचे त्याचे व्यक्त होणे वेगवेगळे !!

पुढील लेखना साठी शुभेछा

कविता समजण्यासाठी पहिले कवितेचा मतितार्थ समजुन घेणे गरजेचे आहे. बहुतेक तो आपल्याला समजला नसेल.

१) कवितेत जनावरांचा संदर्भ ह्यासाठी दिलेला आहे कि जनावरांचा समागमनाचा काही काळ असतो त्याच काळात जनावरे समागम करतात. माणसांमध्ये असा कुठलाही काळ ठरलेला नसतो. कदाचित हे आपल्यास ठाऊक नसेल.

२)षंढ आणि नपुंसक ह्या उपमा हे त्यांच्या कृत्याबद्दल उपहासात्मकरित्या लिहिलेल्या आहेत.

कविता समजावी लागते. असो ज्याचे त्याचे विचार