जुनी नाणी.

Submitted by शोभा१ on 17 December, 2012 - 03:32
juni nani

दिनांक ११.१२.१२ ते १३.१२.१२ , संतोष हॉल, कर्वे रोड, पुणे, येथ जुन्या नाण्यांच प्रदर्शन होत. अस्मादिकांनी त्याला भेट दिली.

कुणाला सर्व फ़ोटो पहायचे असतील तर ही लिंक पहा.

http://www.flickr.com/photos/57204115@N08/

त्यातील काही फ़ोटो तुमच्यासाठी. Happy
१.
DSCN4800

२.
DSCN4799

३.
DSCN4798

४.
DSCN4797

५.
DSCN4796

६.
DSCN4760

७.
DSCN4745

८.
DSCN4792

९.
DSCN4790

१०.
DSCN4763

११.
DSCN4744

१२.
DSCN4739

१३.
DSCN4735

१४.
DSCN4734

१५.
DSCN4729

१६.
DSCN4726

१७.
DSCN4725

१८.
DSCN4724

१९.
DSCN4723

२०.एकाच नंबराच्या नोटा.
DSCN4736

२१.
DSCN4773

२२.ही आपली नाणी.
DSCN4777

२३.एक पैश्याचे नाणे.
DSCN4780

२४.हत्यारे.
DSCN4807

२५.
DSCN4803

२६.जुनी घड्याळे.
DSCN4750

२७.
DSCN4753

२८.
DSCN4761

२९.
DSCN4769

३०.
DSCN4731

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवव्या फोटोतलं मधे छिद्र असलेलं पण होतं.>>>>>>>>.माझ्या आईने त्यावर रूमाल विणलाय. त्याच वय आता फ़क्त ६० वर्षे असेल. Happy

श्री.नरेन्द्र गोळे....

तुम्ही सादर केलेला खजिना पाहून डोळे अगदी निवले. आज 'कॉईन्स' म्हटले की मुलांना एक-दोन-पाच रुपयांचीच नाणी समजतात [निदान समजत असावी असे म्हणतो.....हल्ली त्याना पॉकेट मनी म्हणून नोटाच मिळत असतील]. पावली तर शासनानेच बंद करून टाकली तर अधेली कशीबशी तग धरून आहे.

गोकुळ दूध १ लिटरला [इथे कोल्हापूरात] ३७ रुपये आहे. अर्धा लिटरला १८.५०. पण २० ची नोट दिल्यावर कोणताही दूध विक्रेता १.५० परत न देता १ चे कॉईन आणि कुत्राही ज्याला तोंड लावत नाही असले उल्हासनगर मेड कॅडबरी (?) चॉकोलेट देतो. वाद घातला तर म्हणतो तुम्हीच वरचे आठ आणे द्या.

तुमच्या आणि शोभा यांच्या फोटोतील विविध दर्शनी किंमतीच्या नाण्यांचा ढीग पाहिल्यावर ते जुने दिवस आठवले. धाकटे माडगुळकर, गाडगीळ मोकाशी, गोखले, भावे यांच्या कथांतून '.....नुकताच पगार झाल्याने त्याचा खिसाही खुळखुळत होता.." असे हमखास एखादे वाक्य असे. हे वाक्यच सूचित करते की त्या काळात नाण्यांना किती महत्व आणि किंमतही होती.

फोटोत एक 'भोकाचा पैसा' आहे. 'नया पैसा' चलनात आल्यावर या भोकाच्या पैशाचे महत्व कमी झाले पण काही मेस्त्री लोकांनी असे भोकाचे पैसे ढीगाने एकत्र केले आणि गृहबांधणीच्या वेळी पत्र्यांचे शेड मारताना नटबोलट फिक्स करताना या पैशाचा त्यानी 'वायसर' म्हणून खूबीने उपयोग करून घेतला होता.

अशोक पाटील

मुंबईला मुंबादेवीच्या देवळात पण असे पैसे ठोकलेले होते.

आई मला तिरकी या नाण्याची आठवण सांगते. तीन तिरकी म्हणजे एक पैसा. पुर्वी मुंबईत घरी दूध वगैरे आणून
ठेवायची पद्धत नव्हती. पाहुणा आला कि बिल्डींगखालच्या दुकानातून तिरकीचे दूध , तिरकीची साखर आणि तिरकीची चहा पावडर आणायचे. हि साधारण १९५२/५३ ची गोष्ट असणार. वरच्या फोटोत आहे का ते नाणे ?

२० ची नोट दिल्यावर कोणताही दूध विक्रेता १.५० परत न देता १ चे कॉईन आणि कुत्राही ज्याला तोंड लावत नाही असले उल्हासनगर मेड कॅडबरी (?) चॉकोलेट देतो. वाद घातला तर म्हणतो तुम्हीच वरचे आठ आणे द्या.
>>>> दा. यावर आमच्या वाण्याने नामी उपाय काढला आहे. एकदा तो १ रुपया परत देतो तर पुढच्यावेळी २ रुपये. सर्व ठिकाणी बहुदा असेच करत असावेत.

वाह!! नरेन्द्र काका.. संग्रह खूपच उत्तम आहे तुमच्याकडचा..

एक २० पैशांचं नाणं आठवलं. छान सोनेरी रंगाचं. त्यावर एक कमळ. हळूहळू बाजारातून गायबच झालं. दुकानदार ते वितळवून , प्युअर पितळ काढून घेत होते असं काही ऐकायला येई.. Uhoh

शोभा, नरेन्द्र, धन्यवाद Happy
जुनी नाणी/मेडल्/वस्तू बघुन गतकाळाबद्दलची/व्यक्तींबद्दलची हुरहुर दाटून आली. अन खुप काही गमावले गेल्याचीही जाणीव झाली. असो.
माझ्याकडे जुन्यातली फक्त शिवराई आहे.

रोहन....तुमच्या वाण्याने लढविलेली शक्कल दोन्ही पक्षाच्या दृष्टीने उपयुक्त अशीच आहे. पण आमचे कोल्हापुरी वाणी !!!!! डेव्हिल टेक देम यार. वॉलमार्टचे बापच आहेत झाडून सारे.

mast photo

मस्तच गं... थँक्स फॉर शेअरींग... त्यामुळे अनेक न बघितलेली नाणी , नोटा दिसल्या Happy

मुंबई ला PM road वर RBI चे Monetary Museum आहे. तीथे भारतीय तसेच परदेशी जुनी नाणी, नाण्यांचा इतिहास यांचा सुंदर डिस्प्ले आहे, जुनी नोट काऊंटींग मशीन्स, RBI ची जुनी हस्तलिखित रजिस्टर्स ई. पण आहेत

Reserve Bank of India Monetary Museum
Amar Building (Ground Floor)
Opposite Apna Bazar
Sir Pherozesha Mehta Marg,
Fort, Mumbai - 400 001

http://www.rbi.org.in/scripts/ic_museum.aspx

शोभा, मस्तच .

माझ्या आईकडे आहे १० रुपये चं चांदी चं नाणं, लक्ष्मीपुजनाच्या / धनत्र्योदशी च्या दिवशी १ रुपया च्या पुष्कळ नाण्यांसोबत आम्ही त्याचे पुजा करतो.

Pages