शीड नाही, ना सुकाणू!

Submitted by सतीश देवपूरकर on 14 December, 2012 - 09:56

गझल
शीड नाही, ना सुकाणू!
बळ, तटा! कोठून आणू?

वाबरा हा पिंड माझा....
सांग कैसी शिस्त बाणू?

मान्य, मी लवचीक आहे!
पण, नका भलतेच ताणू!!

रोज पोखरती मनाला.....
दुर्विचारांचे किटाणू!

जिंदगी का ठप्प होते?
कोणते शिरती विषाणू?

भीड ना आम्हा कुणाची;
शांततेमध्ये खणाणू!

बोलल्या भिंती सभेच्या.....
वेळ आली की, दणाणू!

शेर गझलेचे म्हणाले....
आमचे आम्ही भणाणू!

चेहरे बुरख्यातले हे.....
काय वाचू? काय जाणू?

जेवढी होईल टीका;
तेवढे आम्ही उधाणू!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा वा सहीच की .....मस्तच ...........भलतीच आवडली बुवा मलातरी !!! अख्खी गझल आवडली

नाही म्हटले तरी विषाणू मधे राबता लक्षात आला नाही ...माझी समज-उमज कमी पडली असेल बहुधा

अरविंदराव, वैभवा, धन्यावाद! काल लिहिलेली गझल होती ती!
टीप:
जेवढी होईल टीका;
तेवढे आम्ही उधाणू!


...........प्रा.सतीश देवपूरकर

वैभवा!
शेर असा आहे......
जिंदगी का ठप्प होते?
कोणते शिरती विषाणू?

शेराचा गद्य अर्थ:
आमचे जीवन/ जिंदगी (एखाद्या संगणकासारखी) ठप्प (haन्ग) का होते अशी?
कोणते बरे विषाणू(व्हायरस) जिंदगीरूपी (संगणकात) शिरत असावेत? संगणकाची संकल्पना अव्यक्त!

...............प्रा.सतीश देवपूरकर

अरविंदराव!
अभिव्यक्ती सरावाने/रियाजाने व चिंतनाने विकसित करता येते! विषय/आशय महसूस करण्याची पराकाष्ठा मात्र करायला हवी!
प्रा.सतीश देवपूरकर!

<<< अभिव्यक्ती सरावाने/रियाजाने व चिंतनाने विकसित करता येते! >>>

सर खरे आहे...अभिव्यक्ती चिंतनाने विकसित करता येते!

धन्यवाद विजयराव!
आताच एक नवीन गझल पोस्ट केली आहे, जी १५ शेरांची आहे व आज दिवसभरात महाविद्यालयात गुणगुणताना हातावेगळी झाली. पहा पहिल्या वाफेची ही गझल कशी वाटते ती! तिचे वय आहे अवघे ३ तास!
आपला विस्तृत प्रतिसाद वाचायला आवडेल!
...........प्रा.सतीश देवपूरकर

जेवढी होईल टीका;
तेवढे आम्ही उधाणू!

<<<

छान!

भीड ना आम्हा कुणाची;
शांततेमध्ये खणाणू!

बोलल्या भिंती सभेच्या.....
वेळ आली की, दणाणू!<<< हेही आवडले

धन्यवाद