वो कौन थी? अर्थात बा. रा. ए. वे. ए. ठि.

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सिंडरेला यांच्या एका पोस्ट मध्ये हे वाक्य सापडलं.. जे एका पुर्वी पार पडलेल्या ए. वे. ए. ठि बद्दल आहे..

त्यात एक भडक make up केलेल्या बाई होत्या, त्यांची जोडी जूळत नाहीये

(सिंडरेला आणि यात उल्लेखलेल्या सर्व मायबोलीकरांची क्षमा मागून),

पहिली: त्या फोटोत आम्ही दोघी होतो. त्यातली कुठली?

शिंडः तू.. (त.. त. प.. प..) तुला नाही म्हणाले मी..

दुसरी: भडक वाटला का माझा मेकप... (स्वगतः वाटलंच मला... जरा कुठे लिपस्टिक लावली वेगळी, तेही ए. वे. ए. ठि. ला जायचं म्हणून तर भडक म्हणे मेकप.. आपण कसलं पांढरंढोण घालून आलीय ते नाही वाटतं भडक.. काय ते काचेचे बूट आणि काय ते भोपळ्यातून येणं, समजते काय स्वतःला?)...

शिंडः (अजून त... त.. प.. प..) तू नाही.. ती एक जाडी मुलगी होती ना..

पहिली: अय्या म्हणजे मी.. (स्वगतः खाण्यावर कविता करत २५ पाऊंड वजन कमी केलं मी त्याचं हिला काही नाहीच.. बुटाचे तुकडे पडतील, काचा रुततील पायात, काटा मोडेल वजनाचा).

शिंडः तू नाही म्हटलं ना मी?

दुसरी: मग कोण? आम्ही दोघीच तर होतो..

शिंडः मग झक्कीच असतील.. मफलर घालून आले होते का? (त्यांच्याच नावावर खपवल्याशिवाय सुटका नाही)..

पहिली: मफलर कुठला, ते तर झब्बा घालून होते... आणि ते मुलगी कसे वाटतील?

शिंड: मग नयनीश आला होता का? (मैत्रिणीबरोबर नंतर मिटवता येईल.. नाहीतरी बालपणापासून आहे, आणि नवर्‍यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेवते).

दुसरी: नयनीश?.. अगं टक्कल पडलेला माणूस तुला मुलगी वाटला? म्हणजे तो 'टक्कल आहे' म्हणाला म्हणून कळलं मला.

शिंडः ( त.. त.. प.. प...) बारात बारा वाजले. मला पळायलाच हवे.. (नवीन कारण न येण्याचे).

पहिली: नाही.. नाही असं कसं, ती कोण होती ते कळायलाच हवं.. म्हणजे तुला नाही पकडायचंय आम्हाला (खरं तर झिंज्या उपटल्या असत्या हिच्या, पण माझा मेकप कुठे भडक असतो? या दुसरीचाच मेकप नेहमी भडक.. हे पण म्हणाले 'तीच असणार म्हणून'.. कुठे गेली तरी भडक कपडे भडक लिपस्टीक... घाटी मेली)

दुसरी: तर काय? ए. वे. ए. ठि. ला कुणीही येतं ग आजकाल? म्हणजे तुला नाहीय म्हणत मी.. पण समजा व्हर्जिनीयाहून आलेली असली.. ( ही पहीली तरी किती शहाणी.. सरळ विचारुन टाकायचं ना मला असं का म्हणालीस तर वळणं घेत बसलीय.. लिहिताना वळणं, बोलताना वळणं सरळ कधी जाईल तर शप्पथ).

शिंडः ला.. ला... लालू आली आहे का? (देवा, आता ती नको येऊ देत एवढ्यात समोर)... की रुनी.. (अजून कोण कोण असतात त्या बाफवर.. ऐनवेळी आठवेल तर शप्पथ.. उगाच या बाराकरांच्या बाफवर वेळ घालवते, त्यापेक्षा बाकीच्या माहीती असत्या तर... करशील? करशील असं पुन्हा?).

पहिली: लालू कशी असेल? ती आली नव्हती माणसाने फोटो काढले तेव्हा.. आणि ती तर हल्ली दिसतच नाही. कोणी पाहिली आहे म्हणा..

दुसरी: आणि रुनी तरी कोणाला माहीत...?

शिंड: नसेल, म्हणजे त्या दोघी नसतील.. कसले कसले ID घेतात ना हे लोक (आता विषयांतर वाचवतं का बघते).

पहिली: तर काय? सरळ नांव टाकायचं आयडी म्हणून ते नाही... म्हणजे तुला नाही म्हणत मी (सिंडरेला म्हणे...)

शिंडः मग तुझा आयडि काय?

दुसरी: म्हणजे माझ्या माहेरच्या नावातली दोन अक्षरं बरं का. मग माझ्या आवडत्या टेनीस प्लेयरच्या नावाचं आद्याक्षर.

शिंड: (मनात वाचले बहुतेक: बोलत रहा बोलत रहा).. म्हणजे फेडरेशन का ग?

पहिली: इश्श.. फेडरेशन नाही फेडरर...

शिंड: तोच तोच (जमतंय बहुतेक.. का अजून चुका करू?)

दुसरी: फेडररचा 'र' नाही (रॉजर आठवा), आ (आगासी) मधला..

दुसरी: मग कार्टुन क्यारॅक्टरचं शेवटचं नांव..

शिंड: तुझा आयडि काय शेवटी..

दुसरी: तो आता तू ओ़ळखायचा...

शिंडः मी माणूस बद्दल म्हणत होते. (आता तो/ती इथे आला असला/असली तर वाट लागणार माझी)..

पहिली: (आणि म्हणे सोप्पा आयडी घेतला हिने...)

तिसरी: (जमेल तेवढ्या वेगात धावत येते) आयडीचा खेळ खेळताय? अजून ए. वे. ए. ठि. कुठे सुरू झालंय..?

दुसरी: म्हणजे शिंग बिंग फुंकणार आहे का विनय? सुरुवात करायला?

पहिली: शिंग? कसलं शिंग?

तिसरी: म्हणजे ट्रंपेट ग.. तुतारी?

पहिली: म्हला वाटलं 'शिंग' नावाचं वाद्य आहे की काय?

शिंडः विनय ट्रंपेट वाजवतो (विषयांतर जमलेलं दिसतंय मला..)?

तिसरी: जाऊदे.. उगाच कुणाबद्दल कशाला वाईट बोला.. (नाक मुरडत).

शिंड: मग फोटो कोण काढणार आज? (विषयांतर विषयांतर)....

पहिली: अय्या.. ती बाई ओळखायची राहीलीच की?

तिसरी: कोणती बाई?

दुसरी: अगं वाचलंस नाही का? हिला म्हणे कोणी भडक मेकप, लिपस्टीकवाली दिसली फोटोत.

शिंडः (आज मार खावाच लागणार बहुतेक.. परत फोटोचं नांव काढल.. करशील? करशील असं ).. अगं पण मी लिपस्टीक नाही म्हणाले..

तिसरी: पण भडक मेकप म्हणजे लिपस्टीक, कपडे भडक हे आलंच की..

शिंडः (आता पळण्याची वाट शोधतेय...) तसा भडक म्हणजे इतका काही भडक नव्हता मेकप..

पहीली: तर काय? फोटोमुळे वाटला असेल (चुकून मीच निघाले तर.. कध्धी मेला फोटो माझ्यासारखा येत नाही).

तिसरी: जाडी होती का? (मी नव्हते तेव्हा मग विचारायला काय हरकत आहे).

दुसरी: तसं काही लिहिलं नव्हतं तिने (पहीलीच. तीच असणार.. अडकली बरोब्बर)..

शिंडः (आता काय करू? देवा काय करू? कसल्या विषयावर बोलू)... मला वाटतंय माझाच काहीतरी घोटाळा झाला. तुम्ही तिघी नव्हतात त्या फोटोत, बहुतेक.. दुसराच कुठला तरी फोटो आठवतोय.. हळदीकुंकू होतं का त्या दिवशी? (हो म्हणाली तरी वाट सापडेल नाही म्हणाली तरी.. याला म्हणतात मुत्सद्दीपणा)...

तिघी: (हळदिकुंकू? ए. वे. ए. ठि. होतं ना? येडचापच आहे ही. भर दुपारी कुणी हळदकुंकू पितं का?).

समाप्त...

विषय: 
प्रकार: 

Lol

आता क्षमा कोण (हीच वाट्टे ती भडक मेक अप वाली) ?

शिंडी (क्रॉफ्रर्डांची नव्हे),
बुटं हर्विल्यावर अन बारा वाजल्यावर तुला पळायची सवय है, हे चांगलं है.
तवा, पळ आता लवकर हितनं.

अन घरी जाऊन मिरासदारांची 'फोटो' नावाची कथा वाचून टाक.. Proud

--
आठवांच्या पारूंबीला, बांधू एक झुला गं..
माझा झुला तुला घे, तुझा झुला मला!!

वो कदाचित मृ की तोतया होगी Happy

आता पुढच्या ए.वि.ठे.वी. ला येवुन बघायलाच हव भडक मेकअप कसा असतो ते (आणि कोणाचा असतो) Proud

विनय पुढच्यावेळी हे स्किट बसवलत जीटीजीला तर मजा येईल.

ठरलं तर.. आता पात्र शोधावी लागतील...

पहिली: ......?
दुसरी: ......?
तिसरी: ......?
शिंडः .......? (हे काम स्वतः करणार का?)

विनय

शिंडः .......? (हे काम स्वतः करणार का?)>>> करेन की (घाबरते की काय भ मे वालीला Proud )

चला आता फक्त भ.मे. साठी कोणी तरी शोधले पाहीजे की मग बाकीचे तयार होतील Happy

अगदी काहीच जमत नसेल तर तो भ. मे. वाली टोणगा ' होता असं सांगून टाका. आपलं काही आब्जेक्शन न्हाय.

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....