कॉर्न चावडर

Submitted by मृण्मयी on 5 December, 2012 - 21:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा टेबलस्पून लोणी + अर्धा चमचा कॉर्न तेल
१ तमालपत्र
चवीला मीठ
१ लहान कांदा, बारिक चिरून.
१ लहान बटाटा, मध्यम आकाराच्या काचर्‍या.
पाव कप गाजर, बारिक तुकडे करून.
पाव कप सेलरी, बारिक चिरलेली.
पाव कप लाल सिमला मिरची, बारके चौकोनी तुकडे करून.
२ मोठे कप भरून मक्याचे ताजे दाणे / फ्रोजन असल्यास थॉ करून.
अर्धा टीस्पून सेज. ताजी / वाळवलेली पूड चालेल.
चवीनुसार मिरंपूड.
३ कप दूध. (फुल फॅट घेतलं तर चवदार लागतं, पण २% चालेल.)
(मकादाणे गोड नसतील तर) चमचाभर साखर.

क्रमवार पाककृती: 

-लोणी-तेल नॉनस्टिक भांड्यात वितळवून त्यात तमालपत्र घालावं.
- यात आता कांदा परतून घ्यावा. मंद आचेवर, ब्राउन न होऊ देता शिजवावा.
-इतर भाज्या घालून मंद आचेवर ५-६ मिनिटं परतून सेज घालावं.
- उकळी आलेलं दूध भाज्यांवर ओतून ढवळून घ्यावं.
-झाकण ठेवून, मंद आचेवर बटाटा शिजेपर्यंत (साधारण अर्धा तास) ठेवावं. तोवर इतर भाज्या शिजल्या असतील.
-सगळ्या भाज्या व्यवस्थीत शिजल्यावर आता यात मीठ, मिरपूड घालून सतत ढवळावं.
- मीठ घातल्यावर दूध फाटू नये म्हणून ढवळणं अत्यावश्यक.
-या वेळी चावडरमधलं दूध फार पातळ वाटल्यास लहान चमचा मैदा / कॉर्नपीठी पाव कप गार पाण्यात मिसळून, हे मिश्रण चावडरमधे घालावं.
-गरम गरम खावं.

corn-chowder-maayboli.jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४ जण. बरोबर पाव, टोस्ट आणि तत्सम घेऊन.
अधिक टिपा: 

*मूळ पाककृतीतलं बेकन गाळलं आहे.
*मूळ पाककृतीत मक्याचे दाणे शेवटी घातलेत. इतर भाज्यांबरोबर घातल्यावर जास्त चांगले शिजतात.
*फ्रोझन असतील तर ३-४ मिनिटं मायक्रोवेव्हमधून काढून किंवा गरम पाण्यात बुडवून, गाळून घ्यावे.

माहितीचा स्रोत: 
http://www.simplyrecipes.com/recipes/corn_chowder/
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृ: लई भारी फोटू..आत्ता करून खावसं वाटतय..
वरच्या सा हित्यातल सेज न सेलरी सोडून सगळे पदार्थ घरी आहेत....
ते न वापरता केलं तर खूप फरक पडेल का चवीत?

लाजो, बिनू, धन्यवाद!

बिनू, सेजची वेगळी अशी चव मला तरी कळली नाही. सेलरीचीदेखिल नाही. काही फरक पडत नसावा चवीत. (दुसरं कुठलं इटालियन हर्ब चालेल का?)

मस्त दिसतंय. गार्लिक ब्रेडबरोबर भारी लागेल गरमागरम खायला. ओरेगानो मस्त लागेल.

आमच्या शॉपराइट मध्ये ह्या सर्व भाज्यांचे एकत्रित पॅकेट मिळते. आता आणून करून बघेन. प्रॉन्स पण घालतात ना? मिक्स हर्ब्स घालणार.

सेज न सेलरी न वापरता केलं....
पोट भरीचं झालं ..छान क्रीमी ..
फारच सौम्य लागत होतं चवीला..
तिखट्पणासाठी वरून थोडे चिली फ्लेक्स घातले.

आज केलं ह्या पद्धतीने. मस्त झालं.

सेलरी घातली नाही आणि सेजच्या ऐवजी (गलतीसे) बेसिल टाकलं. तेवढं चालवुन घ्या Wink

आणि मी काल केलं. मस्त झालं होतं. माझ्याकडे सेलेरी नव्हती म्हणून ती नाही घातली आणि सेजच्या ऐवजी ओरेगनो घातलं.