मोजके

Submitted by कौतुक शिरोडकर on 4 December, 2012 - 12:35

पुरवणीला जीवना, गंडलेली कोष्टके
मोडलेल्या बेरजा, साचलेली देयके

आरशाने दाविता, सल, उसासे अंतरी
फाडले ते मुखवटे, बिंब ज्यांचे बोलके

शब्द पडता संभ्रमी, वागती वेडेपिसे
हो भिकारी भाव अन, अर्थ होती पोरके

गलबताचा आव तो, शीड ना लावून ये
राहते रे नेहमी, होडके हे होडके

वास्तवाच्या विस्तवी, राख सार्‍या कल्पना
भेटती काव्यातुनी, चांदण्याचे पुंजके

वैभवाची साक्ष मुक, जीर्णसा वाडा उभा
आडवे वासे अता, सरपणाचे ओंडके

देह नाही दार की, लोटले... मन कोंडले
त्या हवे सारेच ते, जे तयाचे लाडके

थरथरे विश्वास पण, माणसांच्या चाहुली
ओघळे तोही तसा, पान जैसे वाळके

खोल डोही मी दडे, ना तरंगी ना तळी
प्राक्तनाला चारतो, श्वास उरले मोजके

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कौतूक...

तुझी ही कविता वाचल्यावर, मी इतरांना कसं सांगू?, की तू 'फू-बा-फू', 'डब्बा-गुल्ल' साठी 'स्कीट्स' लिहिलेली आहेत म्हणून....

काही असो, मनापासून आवडली...

गझल आहे ही !!
रचना उत्तमच आहे

कौतुक सर नमस्ते !! मी वैभव वसंतराव कुलकर्णी मी कविता /गझल करतो
सर मला तुमचा फोन नंबर हवा होता हे मी मागे एकदा प्रतिसादातून विचरले होते सर पण माझ्यासरख्या अतिसामान्याकडे दुर्लक्ष करणे व्यावहारिकच आहे व समर्थनीयही
पण मला गरज आहे सर मी तुम्हाला कही मागणी / विनवणी करण्यासाठी फोन करत नाहीये सर मला फक्त थोडी महीती हवीय सर फारफार तर २-३ मिनिटे हवी आहेत सर बस
विपूतून कळवाल का सर नन्तर मी ती लगेच डिलीट करेन सर
धन्यवाद सर
अपला नम्र
-वै. व. कु.

वैभवाची साक्ष मुक, जीर्णसा वाडा उभा
आडवे वासे अता, सरपणाचे ओंडके

मस्त अवाडला हा शेर !!माझी गझल होती एक त्यात मतला होता

हा वाडा पडणार उद्या
मी नाही रडणार उद्या

...................तो आठवला !!धन्स
गझल विभागात हलवायचे बघा सर

एक आवडती ओळ कोट करणं अशक्य!
अतिशय सुंदर कौतुक दादा!
पुन्हा पुन्हा वाचली Happy

वाह ! केवढी सुंदर कविता. कोणत्या ओळी विशेष आवडल्या सांगायचं तर आख्खी कविता कॉपी करायला लागेल. आशय जबरी !

कौतुका
तू असं का लिहीतोहेस हल्ली ? पण उदासवाणी संध्याकाळही सुंदर वाटावी तशी वाटली कविता

गलबताचा आव...तो
तो चं काही तरी कर जमल्यास

एका त्या अनामिक उदास, हताश भावनेला कितीक प्रकारे सुरेख व्यक्त केलेय..!!
देह नाही दार की, लोटले... मन कोंडले
त्या हवे सारेच ते, जे तयाचे लाडके >> सो ट्रू