मायबोलीच्या वाचकांची संख्या ११ लाखावर

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

मायबोलीवर येणार्‍या वाचकांची संख्या एका वर्षात ११ लाख (११, ४३, १२४) इतकी झाली आहे.
मायबोलीने नेहमीच "आधी केले, मग सांगितले" हे धोरण आखून घेतले आहे. गेल्या वर्षातही आपण १० लाखावर मजल गाठली होती, पण हा केवळ योगायोग नाही याची यावर्षीही खात्री करून घेतल्यावर हे जाहीर करतो आहोत.

या संख्येत एक व्यक्ती कितीही वेळेस आली तरी एकदाच धरली जाते ( Unique Visitor). त्या व्यक्तीच्या भेटींची संख्या ( Visits) प्रत्येक भेटीबरोबर वाढते. मायबोलीच्या वाचकांनी गेल्या १ वर्षात मायबोलीला
३२, १०, ९८४ इतक्या वेळा भेट दिली.

या संख्येत मायबोलीकर आणि मायबोलीवर येणारे अतिथी या दोघांचाही समावेश आहे.

Nov-2012-yearly-maayboli.jpg

तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद !

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

>>व्हिझिटर्स ११ लाख +तर व्हिजिट्स मात्र ३२ लाख हे प्रमाण कमी नाही का? <<
याचं स्पष्टीकरण भाऊसाहेबांनी अगदि खुबीने व्यंगचित्रात पकडलंय.

या ११ लाखांपैकी बरेच जण माबोची विंडो उघडीच ठेवतात; काहिसं "हॉटेल कॅलिफोर्निया" त म्हटल्यासारखं - यु कॅन चेक आउट एनी टाइम यु लाइक, बट यु कॅन नेव्हर लिव्ह... Happy

अभिनंदन! नक्कीच अभिनंदन! त्रिवार अभिनंदन सर्वांचेच!

आयडींच्या मृत्युंचे मोठे प्रमाण असूनही ११ लाख? बापरे!
इतक्या रंगणार्‍या चर्चा, उखाळ्यापाखाळ्या, गझला यांची रेलचेल असतांना प्रत्येकाची वर्षाची सरासरी तीनच? देव साहेबांच्या विचाराशी सहमत.
विचार करायला हवा सर्वांनीच!

अभिनंदन.
दहा कोटी लोकसंखेच्या महाराष्ट्रात तिनेक कोटी तर इतर भाषियच आहेत. म्हणजे तसे पाहिल्यास मराठी सातेक कोटी. त्यातल्या त्यात नेट वापरणारे फार फार तर एखाद कोटी. त्यातली अकरा लाख माबोवर म्ह्णजे ११% टक्के मराठी तुमच्याकडे येतात व्हय.....

हे गणित एखाद्या राजकारण्याला समजल्यास त्याला माबो म्हणजे एक वोट बँक वाटावी... नै.

बघा हं... करोडो कमवायची संधी आहे... ११ लाखाची वर्दळ काही गंमत नाहे बरं.....

एक वोटला एक हजार जरी म्हटलं तर गणित जातं एक अब्ज दहा कोटी. बार्गेनिंग वगैरे करुन करुन कितीही खाली आणलं तर कोटीच्या कोटी की वो............

माबोप्रशासन.... शेअर वगैरे विकायला काढणार असल्यास सांगा आम्ही स्वतात घेऊन ठेवू.
आत्ताच संधी आहे.

Pages