मायबोलीच्या वाचकांची संख्या ११ लाखावर

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

मायबोलीवर येणार्‍या वाचकांची संख्या एका वर्षात ११ लाख (११, ४३, १२४) इतकी झाली आहे.
मायबोलीने नेहमीच "आधी केले, मग सांगितले" हे धोरण आखून घेतले आहे. गेल्या वर्षातही आपण १० लाखावर मजल गाठली होती, पण हा केवळ योगायोग नाही याची यावर्षीही खात्री करून घेतल्यावर हे जाहीर करतो आहोत.

या संख्येत एक व्यक्ती कितीही वेळेस आली तरी एकदाच धरली जाते ( Unique Visitor). त्या व्यक्तीच्या भेटींची संख्या ( Visits) प्रत्येक भेटीबरोबर वाढते. मायबोलीच्या वाचकांनी गेल्या १ वर्षात मायबोलीला
३२, १०, ९८४ इतक्या वेळा भेट दिली.

या संख्येत मायबोलीकर आणि मायबोलीवर येणारे अतिथी या दोघांचाही समावेश आहे.

Nov-2012-yearly-maayboli.jpg

तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद !

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

ये ब्बात! मायबोली "परिवाराचे" हार्दिक अभिनंदन!

(ईस बात पे एक अखिल भारतीय वा जागतिक असे काही माबो संमेलन व्हायला हवे!... मागे एकदा २००३ मला वाटते, असा प्रयत्न आपण केला होता फक्त ऊसगावसाठी..... पण त्यावेळी मनुष्यबळ, लॉजिस्टीक वगैरे सर्वच अवघड होते... आता मात्र मायबोली सर्वार्थाने शक्तीमान झाली आहे तेव्हा हे "अशक्य" नाही..
साहित्य संमेलनासरखे वार्षिक माबो संमेलन देखिल आता भरायलाच हवे...)

वार्षिक ११ लाख+ वाचकांनी माबोला भेट दिली हे निश्चितच अभिनंदनीय आहे.... Happy
पण ह्याच अकरा लाख वाचकांनी एका वर्षात सरासरी ३ वेळाच..एकूण ३२ लाख+ भेट दिली असेही दिसतेय...हे प्रकरण काही नीटसे कळले नाही...इतक्या कमी भेटी? Sad

ही एका अर्थाने दिवाळीची चमचमणारी फुलझडीसम बातमी म्हटली पाहिजे.

'अतिथी' चा उल्लेख वर झाला आहे. मला असे कित्येक अतिथी माहीत आहेत जे नित्यनेमाने मायबोलीवर {मायबोलीवरच} त्या रुपात येऊन 'वाचनमात्र' राहून मायबोलीकरांच्या वैचारिक देवाणघेवाणीचा आनंद लुटतात. यापैकी कित्येकाना मी 'मायबोलीचे सदस्यत्व' घेण्यास सांगितले असता त्यातील बर्‍याच अतिथींनी 'मराठी टंकलेखनाची भीती वाटते' असे उत्तर दिले.

हे कारण या मागोव्यातील नोंद म्हणून मायबोली प्रशासनाने स्वीकारावे असे वाटते. भीती घालविण्यासाठी टंकन 'फ्रेन्डली' कसे व्हावे याचाही विचार होऊ शकेल का ?

~ बाकी ११ लाखाच्या दणदणीत आकड्याबद्दल मायबोलीचे अभिनंदन.

अशोक पाटील

अजय, समीर, इतर प्रशासक आणि सर्व मायबोलीकर आणि अतिथींचे अभिनंदन!
ही अभिमानास्पद माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद. Happy जय मायबोली!!!

Bounce rate आणि % New Visits जवळजवळ सारखंच आहे. याचा अर्थ अतिथी एकतर लगेच मायबोलीकर होतात किंवा फारसं रेंगाळत नाहीत असा आहे का?

दिवाळी अंकाच्या / गणपतीच्या सुमारास अतिथींच्या संख्येत लक्षणीय वाढ होते का?

वावा... मनापासून आनंद झाला!!!!

एव्हढ्या भरघोस यशाच्या वाट्यात आमच्या खारीइतक्या सहभागाचाही आवर्जून उल्लेख करणार्‍या सदैव जागृत,

उत्साही प्रशासक टीम चं भरभरून कौतुक!!!

मायबोली बहुश्रुत झाली |
अतिथींत बहुप्रिय झाली ||
भावली लोकांस सगळ्या |
लाखांस ती उद्यान झाली ||

मायबोलीस, तिच्या चालक, मालक, प्रशासक, नेमस्तक, वाचक, लेखक,
जाहिरातदार व सर्वच हितचिंतकांस हार्दिक शुभेच्छा!

ग्रेट गोईंग....... शुभेच्छा...!!!!

आम्ही जमेल तसा प्रसार आणि प्रचार करायला हातभार लावूच.... Happy

सर्व मायबोलीकरांचे अभिनंदन...!!!

अरे बापरे , इतके लोक अ‍ॅडिक्टेड आहेत? Wink
अभिनंदन!!! माबो प्रशासक आणि आपण सगळे सुद्धा! Happy

मस्त!

गेल्याच आठवड्यात मायबोलीवर काही डेटा मायनींग करावे असा विचार आला होता. मायबोलीकरांची नावे (आणि इतर आयडेंटीफाएबल माहिती) गाळून असा डेटाबेस उपलब्ध होऊ शकेल का?

अरे व्वा! अभिनंदन Happy

या संख्येत एक व्यक्ती कितीही वेळेस आली तरी एकदाच धरली जाते ( Unique Visitor).>>>>>>> आणि त्या व्यक्तीचे डुआयडी?? Proud

डेटा माइनिंग >> मला पण तेच सुचले.
मला आवडेल असे काम ़करायला.

मायबोलिकर असल्याचा अभिमान आणि आनंद वाटतो.

Pages