दीपोत्सव : त्रिपुरी पौर्णिमा

Submitted by शोभा१ on 29 November, 2012 - 05:29

त्रिपुरी पौर्णिमेला बहुतेक मंदीरात दीपोत्सव करतात. काल मी असाच एका मंदिरातला दीपोत्सव पाहिला. तो म्हणजे, शिवतीर्थनगर गणेश मंदीर येथील. तिथे एक छान चित्र काढलं आहे, ते आहे महिषासूरमर्दिनीचं. अंदाजे १५ फूट लांबीच हे चित्र आहे. सोमवार पासून हे चित्र काढायला सुरुवात झाली. मंगळवारी दुपारपासून रात्री १ वाजेपर्यंत चित्र रंगवणे चालू होते. आणि बुधवारी फुलांच्या पाकळ्यांची सजावट करून, संध्याकाळी ७ वाजता, दीपोत्सव करण्यात आला. मी काही फोटो आधीच काढून घेतले. Happy
१. फोटो खूप मोठा आणि माझा कॅमेरा छोटा, त्यामुळे आणि फोटो नीट काढाता येत नसल्यामुळे हा नीट दिसत नाही. त्याबद्दल क्षमस्व.
DSCN4695

२.हा जरा जवळून काढला.
DSCN4696

३.दीपोत्सव केल्यानंतर.
DSCN4716

४.DSCN4714

****. कुणाला पहायचं असेल हे चित्र तर अजूनही ते तसच ठेवल आहे. Happy

हे तास् न तास बसून चित्र काढणे, रंगवणे, आणि फुलांच्या पाकळ्यांची सजावट करणे हे सर्व एका उत्साही तरूणाने केले आहे. ज्यांचे वय आहे फक्त ७१ वर्षे. Happy आणि त्यांचे नाव आहे, श्री. गोरे काका. त्यांनी हेच चित्र १९६७ साली काढले होते व रंगवले होते, त्याचा फोटो मी मंगळवारी पाहिला. त्यात देवी उभी आहे. पण इथे जागेअभावी त्यानी तिला सिंहावर बसवले. Proud

५. हेच ते सदा हसतमुख असणारे आमचे गोरे काका.
DSCN4713

हे दर वर्षी, येथे चित्र काढतात आणि रंगवतात. त्यांनी गेल्या वर्षी, संत तुकारामांचे चित्र काढले होते.
हे पहा.

६.DSCN1312

७.DSCN1309

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.. अप्रतिम...श्री. गोरेकाकांचे अभिनंदन...
प्रत्यक्ष बघायला अजून छान वाटले असेल ना!>>>>आवडल असत..

काय अप्रतिम काढलिये गं रांगोळी!! खूप सुंदर! आणि श्री. गोरेकाकांचा फोटो इथे दिलास हे छान केलंस! कारण बहुधा हे कलाकार लोकांपुढे आणले जात नाहीत किंवा ते येत नाहीत...
तुला खूप खूप धन्यवाद. तुझ्यामुळे इतकी सुंदर रांगोळी आणि तिचे निर्माते यांचं दर्शन झालं.

शोभा, छान काढलायस ग फोटो ! सॉरी, त्या दिवशी मी हे पाहायला येऊ शकले नाही.
गोरेकाका स्वत: इंजिनिअर होते. रिटायर्ड झाल्यावर ते ही आपली कला स्वतःपुरती न ठेवता, इतर लहान मुलांना गेले कित्येक वर्षे त्यांच्या घरी चित्रकला शिकवतात, आणि ते सुद्धा चकटफू ! माझा मुलगा सुद्धा त्यांच्याकडे काही दिवस जात होता. ईतके तन्मयतेने शिकवतात. आणि सगळ्या वयोगटातील मुले असतात. आणि मुख्य म्हणजे कुठेही ह्याची ते वाच्यता करत नाहीत. Happy

खरच शोभा, खुपच अप्रतिम चित्र आहे.....
गोरेकाकांकडे बघुन वाटत नाही की त्यांचे वय ८० आहे म्हणून.....
या वयात ईतका उत्चाह, स्वताची लाज वाटायला लागते....

आता गोरेकाकांना नक्कीच सांग, आमच्या माबोकरांना रांगोळी फार आवडली म्हणून स्मित>>>>>>>>>.विनिता, नक्कीच सांगेन. Happy
स्मि, शांकली, प्रज्ञा, प्रिती, धन्यवाद! Happy

शोभा, छान काढलायस ग फोटो ! सॉरी, त्या दिवशी मी हे पाहायला येऊ शकले नाही.>>>>>मला माहित होत, तू येणार नाही ते. पण कालपर्यंत ते चित्र तसच ठेवल होतं. आजचं माहीत नाही. Happy

Pages