हजला लिहावयाचा आता सराव झाला!

Submitted by सतीश देवपूरकर on 28 November, 2012 - 10:00

तमाम हजलकारांना/विडंबनकारांना/विटंबनाकारांना
सविनय अर्पण......
गझल

हजला लिहावयाचा आता सराव झाला!
गझला विटंबण्याचा आता सराव झाला!!

चिल्लर असेल, पण मी, लिहितोच चार ओळी....
संक्षिप्त खरडण्याचा आता सराव झाला!

करतो युती कुणाशी, तर भांडणे कुणाशी;
दंगल करावयाचा आता सराव झाला!

कोणी लिहो कितीही सुंदर, कुरूप काही!
शिमगा करावयाचा आता सराव झाला!!

लिहितो स्वत:च अन् ते फाडून टाकतो मी.....
गझलेस गाडण्याचा आता सराव झाला!

परखड लिहावयाला आहेत शब्द कोठे?
हांजी करावयाचा आता सराव झाला!

शोकीन आंबटाचा, त्याला कशात गोडी?
चरबट लिहावयाचा आता सराव झाला!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर ही गझल माझ्यासारख्या उपेक्षिताना अर्पण केल्याबद्दल Wink
सगळे शेर झक्कास झालेत

शोकीन आंबटाचा, त्याला कशात गोडी?
चरबट लिहावयाचा आता सराव झाला!>>हासिलेगझल् ..........सॉरी! हासिलेहझल Lol

कोणी लिहो कितीही सुंदर, कुरूप काही!
शिमगा करावयाचा आता सराव झाला!!>>>'स्व' शोधन की काय असते त्याचा शेर !! स्वत:शी अत्यन्त प्रामाणिक शायर आहात वा वा !!

उद्यपासून तुम्ही गझले-हझले ऐवजी नुसते स्माईलीज जरी प्रकाशित केलेत तरी धागा सुपर्हिट्ट होईल इतके ते भारी असतात
असो !
अरेरे साधे दोन मच्छरही हातास लागत नाही आहेत तुमच्या खर्‍या "शेरान्ची" शिकार कधी करणार??? Sad

(शेरान्ची=श्लेष !!..खरेतर तीन अर्थ आहेत या शब्दास पण त्यास काय म्हणायचे माहीत नाही)

टीप :आमचे स्माईलीज माबोबाह्य नसतात याची प्लीज नोन्द घ्यावी

जमातीतले >>>>कृपया असले शब्द टाळावेत
चेष्टा-मस्करी करताना इतकेही सीरीयस होवू नये
आत्ता मी चेष्टा करत नाही आहे ..कारण आता मी जरी गम्भीर नसलो तरी मुद्दा गम्भीर आहे

असो
वरील प्रतिसादातील स्माईली छान आहे

बिग-बॉस मधे तो इमाम की कुणीतरी माणुस आहे तुम्ही मा.बो.वरती हल्ली जराजरा तसे वर्तन करता आहात असे मला व्यक्तीशः जाणवू लागले आहे