मी म्हणालो, आहे यंदा पंचवीसावे लागते (कैच्याकै हज़ल?)

Submitted by A M I T on 28 November, 2012 - 07:21

बेफींच्या पंधराव्या लागलेल्या शोडषेवर माबोवर जी विडंबनांची लाट आली, त्याच लाटेवर स्वार होऊन...

ती जुन्या गोष्टी उकरूनी मजसंगे भांडते
कालचेच कारण मजला आठवावे लागते !

मी तिच्या पश्चात चोरूनी सिगरेटी फुंकतो
मेन्टॉसने तोंडाला मग बाटवावे लागते

फासतेस तोंडास जेव्हा तू पावडर नि फावडर
उगाचच माझ्या जिभेला साखरावे लागते

डझनाने येतात तुझिया मैत्रिणी जेव्हा घरी
माझ्याच घरी मला अनोळखी वावरावे लागते

काय सांगू मालिकांनी काव कित्ती आणिला !
रोज सायंकाळी रिमोट लपवावे लागते

केस नसले म्हणूनी का बाळगू नये कंगवा?
केव्हातरी गुपचुप मिशीला विंचरावे लागते

शेजारच्या शालूने माझे वय मजला पुसता
मी म्हणालो, आहे यंदा पंचवीसावे लागते

हाय ! इतुके टणक कैसे लाडू तू बनविले
ते खाण्यासाठी दात मजला पाजवावे लागते

* * *
http://kolaantudya.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users