बाळासाहेबांना माझी श्रद्धांजली

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 18 November, 2012 - 04:30

बाळ ठाकरे नावाच तुफान
आता शांत झाले आहे
त्या निरवतेत प्रत्येक मन
आज गहिवरून आले आहे
शब्दांच्या कडकडाटात उसळणारे
भावनांच्या झंझावातात गदगदणारे
प्रत्येक लढाऊ गलबत आज
सुन्न होऊन बसले आहे
तो आवाज चिंधड्या उडवणारा
तो स्वर मित्र मिळवणारा
तो स्पष्ट घट्ट रोकठोक
टणत्कार गांडीव धनुष्याचा
आता विराम पावला आहे
हे माझ्या विद्ध मराठी मना !
तुटला जरी दोर तरीही
लढणे तुला प्राप्त आहे
चल उचल तो भगवा
तख्त दिल्लीचे, जिंकायचे आहे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाळासाहेबांचा अंत्यदर्शन सोहळा याची देही याची डोळा पाहणायचा योग आला.
आतिशय भावपूर्ण, हृदय-द्रावक, शोकाकुल शिवसैनिक . निरोप देण्यासही लोटला अलोट जनसागर.
असा नेता होणे आता शक्य नाही " न भूतो न भविष्यति".
तो आवाज पुन्हा नाही,
ती सभा पुन्हा नाही,
ते विचार पुन्हा नाहीत,
कारण तो नेताच आता नाही.
मराठी माणसाला मान ताठ ठेऊन जगायला शिकवणारा नेता काळाच्या पडदयाआड.
प्रत्येक मराठी मन दुखावून आज झालाय एका तळपत्या सूर्याचा अस्त.
एक पर्व संपले.

अनुप अनिल साळगावकर.
(सेना भवन-दादर पश्चिम )

महाराष्ट्राच वैभव आज खर्‍या अर्थाने हरपल. आता महाराष्ट्र कोणाचा आदेश पाळणार? कोणाचा एकच हुकुम मुंबईला सुरक्षित ठेवणार?

धगधगत्या सूर्याला अखेरचा सलाम. बाळासाहेबांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.