श्रद्धांजली

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

येका युगाचा अंत. त्यांच्या विचारसरणीशी अनेकांचे मतभेत असतील मात्र एक व्यंगचित्रकार ते जनाधार असलेला महत्वाचा राजकिय नेता हा प्रवास नक्किच खुप मोठा . श्रद्धांजली
IMG-20121117-00335.jpg

विषय: 

त्यांच्या विचारसरणीशी अनेकांचे मतभेत असतील मात्र एक व्यंगचित्रकार ते जनाधार असलेला महत्वाचा राजकिय नेता हा प्रवास नक्किच खुप मोठा >> +१. , ह्याबाबत काहीच दुमत नसावे.

सेनेकडे एखादा कुशल administrative असता तर काय झाले असते ह्याचा विचार केल्याशिवाय पुढे जाववत नाहि. Sad

ढाण्या वाघ गेला Sad
बाळासाहेबांचा मला आवडलेला सर्वात मोठा गुण म्हणजे त्यानी जे केले ते ठणकावून केले . Politically Correct वगैरे व्हायच्या भानगडीत ते कधीच पडले नाहीत . आणी मी असे म्हणालोच नाही किंवा माझ्या विधानाचा विपर्यास केला म्हणून कोलांट्या उड्याही मारल्या नाहीत .

इतका जिगरबाज, जबरदस्त नेतृत्व-वक्तृत्व असलेला, पक्षाची आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र प्रदीर्घ काळ घट्ट पकडून राखू शकलेला, ज्याच्या एका शब्दाखातर हजारो शिवसैनिक एका क्षणात महाराष्ट्र बंद पाडू शकत.. असा वाघासारखा नेता गेलाय आणि सगळे मराठी (हिंदीकडून अपेक्षाच नव्हती) चॅनेल्सच्या कसल्या मिळमिळीत प्रतिक्रिया आणि बाइट्स.. देशाचे नुकसान झाले कधी न भरुनयेणारे/ दु:खाचा डोंगर कोसळला, पोकळी निर्माण झाली...अरे जरा काही वेगळेपणा दाखवा की या वाघाकरता तरी.

बाळासाहेबांचे साहित्यरसिक, कलावंत मन आणि त्यांची झंझावाती स्फोटक, अ‍ॅग्रेसिव्ह राजकारणी प्रतिमा हे रसायन इतके जबरदस्त आणि दुर्मिळ होते.

शर्मिला +१

~ एखाददुसरा अपवाद सोडल्यास झाडून सार्‍या 'मराठी चॅनेल्स' चे बाप हिंदी असल्यामुळे त्या त्या चॅनेल्सच्या अ‍ॅडमिनला काय बिशाद आहे 'पॉलिसी' बाहेर जाऊन काही वेगळ्या आणि अस्सल उत्स्फूर्त प्रतिक्रिया दाखविण्याची ?

गृहमंत्री म्हटल्या जाणार्‍या सुशीलकुमार शिंदे याना धड बोलताही येत नाही या श्रद्धांजली विषयावर असे दिसत आहेच. धड इंग्रजी नाही, धड हिंदी नाही आणि कुणीतरी 'मराठीमध्ये बोला' अशी विनंती केल्यावर शिंदे वदले, "एक सामान्य व्यंगचित्रकार ते शिवसेना प्रमुख असा त्यांचा प्रवास मी पाहिला आहे...." ~~ अरेच्या !! कसली ही बटबटीत प्रतिक्रिया ? बाळासाहेब ठाकरे म्हणजे 'सामान्य व्यंगचित्रकार' होते ? कधी ?...... शिवसेना स्थापनेच्यापूर्वी कित्येक वर्षे जी व्यक्ती महाराष्ट्रच नव्हे तर देशात अग्रगण्य कार्टूनिस्टांच्या यादीत आहे, ज्या क्षेत्रात या व्यक्तीचे नाव आणि कार्य सर्वतोमुखी झाल्यावर त्याच्या आधारेच मराठी माणसाच्या कल्याणासाठी ज्याने 'शिवसेना' स्थापनेचा निर्णय घेतला....त्या व्यक्तीच्या कलेला शिंद्यांनी 'सामान्य' म्हणावे यापरते दुसरे दुर्दैव नाही.

या नेतेमंडळींना तसेच यांच्याभोवती अन्नावर घोंघावणार्‍या माशासारखे फिरणार्‍या सल्लागारांना हे कसे समजत नसेल की अशा प्रसंगी चॅनेल्सवाले आपली प्रतिक्रिया मागणार आणि मग आपण किती उचित भाष्य केले पाहिजे. भाषेत काहीतरी तारतम्य ठेवणे गरजेचे आहे, असे यानी का मानू नये ? काहीही बकवास चालू आहे या चॅनेल्सवरून.

तरी असो.....ज्याचे नावच या मातीतील प्रत्येकाला स्फूर्ती देणारे वाटते, त्या व्यक्तीविषयी कुणी काही आणि कसेही बोलले तरी आपल्या मनातील प्रतिमेला किंचितही तडा जाऊ शकणार नाही.

या नेत्यांपे़क्षा अनेक सामान्य शिवसैनिकांची प्रतिक्रिया यायला हवी मग यांना कळेल

काही व्यक्तिमत्व अशी असतात की जी सदैव आपल्यासोबत असतीलच असा एक विश्वास असतो. बाळासाहेब हे अश्यांपैकी. त्यामुळे ही बातमी पचवताच येत नाहीये. Sad

आत्ताच एक सीनीअर म्हणवून घेणार्‍या पत्रकाराची प्रतिक्रिया वाचली. संताप झाला. बाळासाहेबांविषयी दुसरं काही बोलायचं सोडून हिटलवरच बोलायला लागला तो महाभाग. असो.

बाळासाहेबांचं वक्तृत्त्व, कलासक्तता, एकहाती एवढी मोठी संघटना चालवण्याचे कौशल्य हे वादातीत होते. त्यांना विनम्र श्रद्धांजली... Sad

बाळासाहेबांना भावपुर्ण श्रद्धांजली .
असं असामान्य व्यक्तीमत्व , नेतृत्वं , राजकारणात खुपचं क्वचित बघायला मिळतं.

शिवसेनेचा खराखुरा ओरीजीनल वाघ आणि एक अत्यंत कुशल व प्रचंड प्रभावी खराखुरा नेता गेला.
बाळासाहेबांची कारकीर्द जितकी तेजोमय होती तितकीच त्यांची भाषणे प्रखर, जाज्वल्य अभिमान, व सर्वसामान्यांच्या काळजाला हात घालणारी असत.

असा अभ्यासू, चाणाक्ष, कलाकार, रोखठोक, आणि खर्‍या अर्थाने अनेक मराठी लोकांचा "हृदयसम्राट" नेता पुन्हा होणे नाही.

विनम्र श्रद्धांजली.

मराठी भाषा रोजच्या व्यवहारात व राज्यकारभारात वापरताना कचरणार्‍या मंडळीला तीच भाषा वापरताना अभिमान वाटायला लावणं, ही मला वाटतं साहेबांची सर्वात मोठी व दूरगामी कामगिरी असावी.
एक जातीवंत व्यंगचित्रकार म्हणून तर त्याना माझा सदैव मुजरा असतोच !!
बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली !!

महाराष्ट्रात असा नेता जन्माला येणे हे महाराष्ट्राचे भाग्यच समजावयाला हवे.
बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली !!

स्मशान शांतता पसरलीय मुंबईत,जिचं केंद्र आहे वांद्र्यात अन परीघ महाराष्ट्रीय हृदय जिथे जिथे श्वसतंय तेथपर्यंतच्या परिसरात..
ईश्वर त्यांना शांती देवो अन महाराष्ट्राला पुनः ज्वलंत अन कर्तंसवरतं नेतृत्व..

Pages