ध्यान प्रयोग

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 16 November, 2012 - 04:34

सकाळी उठून
करतो ध्यान
जमेना पण ..काही केल्या
नाका लागे धार
शिकाही अपार
प्राणाला आधार ... तो ही मिळेना
घेतला सुंदर
चहा आलेदार
त्याने ही फार ...फरक पडेना
मग स्मरणी
काढली शोधुनी
आणि रेटूनी ...घेतले नाम
परी ते अळणी
उगाच होऊनी
उतरेना मनी ...काही केल्या
वदलो भजन
अति आळवून
सोडिले शब्दान... परी भाव
उदास होऊन
काढिले लिहून
ते हे भजन .. माझे आता
अहो नारायण
कृष्ण भगवान
यावे धावून ... दत्तात्रेया
हाताला धरून
कृपेच्या बळान
न्यावे चालवून ... अवगुण्या या

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदरच.

हाताला धरून
कृपेच्या बळान
न्यावे चालवून ... अवगुण्या या >>> अशी प्रार्थना मनापासून घडली की झाले आपलं काम, बाकी सारं तो बघून घेईलच.