'आयना का बायना' - चारोळी स्पर्धा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 15 November, 2012 - 22:58

’ढाई अक्षर प्रेम के’ म्हणतात, पण प्रेम व्यक्त करायला त्यापेक्षा जास्त अक्षरं लागत असतील तर?
अहो, मग चारोळी लिहा की.
अट एकच, तुमच्या प्रेमाच्या आरोळीत, सॉरी सॉरी, तुमच्या प्रेमाच्या चारोळीत 'आयना का बायना' हे शब्द आलेच पाहिजेत - सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटी.

म्हणजे बघा हं....

आयना का बायना
घेतल्याशिवाय जाईना
***च्या गालावरची खळी
माझ्या मनातून जाईना

किंवा अजून एक....

आयना का बायना
पाहिल्याशिवाय जाईना
*** चे घारे डोळे
माझ्यासाठी आईना

किंवा......

अरेच्चा! सगळ्या चारोळ्या आम्हीच लिहिल्या तर तुम्ही काय लिहिणार? चला तर मग, आपापली पेनं, पेन्सिली काढा बाहेर, ओढा तो कीबोर्ड समोर आणि पाडून टाका चारोळ्या. हाय काय अन्‌ नाय काय...

हां, अजून एक. ही स्पर्धा आहे, आणि स्पर्धेसाठी गुणांकन करतील वाचक.

या स्पर्धेच्या पहिल्या दोन विजेत्यांना मिळतील ’आयना का बायना’ या चित्रपटाच्या ३० नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबई / पुणे इथे होणार्‍या प्रीमियर खेळाची प्रत्येकी दोन तिकिटं..

पण तेवढे ते परवलीचे शब्द मात्र विसरू नका हं - आयना का बायना...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयना का बायना
काय करु समजेना
***राजा माझा
फराळ काही खाईना

ही सत्यचारोळी आहे Proud

कोकणात होळीमधे खेळे ( विशेषत: कोळी लोक) वेगवेगळे मुखवटे घालून दारोदार येतात आणि हे गाणे म्हणतात - 
आयना की बायना
घेतल्याबिगर जायना
कोल्याची आय (आई) 
कोलसे खाय
माल्यावर पैशे सोधते हाय
हू sssss र हू .......

*लग्नाआधी*
आयना का बायना
राणी माझी घारी गोरी,
नाक चाफेकळी, बांधा कसा शेलाटा
बघून माझ्या राणीला, प्रेमात पडलो पुरता.

आयना का बायना
राणी जशी जंगलची मैना
लाल लाल वट डाळींबावानी
मी तिचा दिवाना, ती माझी दिवानी

*लग्नानंतर २ वर्षाने*

आयना का बायना
राणीने केला सैपाक
वरणात टाकले जरा वाईच मीठ
घास काही गिळवेना!

*लग्नानंतर ५ वर्षाने*
आयना का बायना
राणी पडली घोरत, सकाळची काही उठेना
चहा बनवा आपलाच आपण
आधी करा(चहा) राणीला अर्पण!

Proud

आयना का बायना
जिंकल्याविना येई ना
स्वागताला डोळे लावून
राणी उभी आहे ना!

(ही चारोळी लढाईवर गेलेल्या सैनिकांच्या, स्पर्धेसाठी गेलेल्या खेळाडूंच्या, निवडणूक उमेदवारांच्या पत्नींना समर्पित)

आयना का बायना
तूच माझा दागिना
मेड इन चायना हिरा द्यायची
टुकार आहे कल्पना

-----

सुक्या, गंमत म्हणून लिहिलंय रे सवाल जबाबासारखं. दिवा घेशीलच Happy

आयना का बायना
त्याचं काय हाय ना
तुजं माजं पटेना
अन तुज्यावाचून करमेना.

>>आयना का बायनाचा नक्की अर्थ काय आहे? माझं आपलं अर्थ न कळताच चारोळ्या जुळवणं चाललंय >> +१ Happy

आयना का बायना
हे काय आहे समजेना
कविंचे पीक फुटले राना
चारोळ्या येती दणादणा

ह्या सगळ्या चारोळ्या जोडून कै च्या कै मधे महाकाव्य होईल ना!! आपला खारीचा वाटा असावा!! Wink

Pages