विसरणेही तुझ्या लक्षात नाही (तरही)

Submitted by इस्रो on 12 November, 2012 - 09:05

कधी हारायचे रक्तात नाही
विसरणेही तुझ्या लक्षात नाही

कुठे आहे, कुणी ऐसा इथे जो
बुडालेला कधी कर्जात नाही

दया-प्रीती, क्षमा-शांती, अहिंसा
कुणाच्याही अता कर्मात नाही

''किती खड्डे! किती हा घाण रस्ता!"
मुळी हा दोष त्या रस्त्यात नाही

यशामागे निराळे गुपित नाही
लबाडी माझिया तत्वात नाही

सुरक्षित काल ती बाहेर नव्हती
अता सुखरुप ती गर्भात नाही

गझल मज भेटते अन बोलतेही
खरे मी सांगतो, स्वप्नात नाही

-नाहिद नालबंद
[nahidnalband@gmail.com]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरक्षित काल ती बाहेर नव्हती
अता सुखरुप ती गर्भात नाही

व्वा!!

यावरून माझ्या काही जुन्या शेरांची आठवण झाली...

गर्भात फोडला मी टाहो पुन्हा पुन्हा रे..
अन शांत जगत झाले विझवून वात माझी

आणि

मिळविताना दीप वंशाला तुझ्या...
तूच बघ रे विझविल्या वाती किती..!

नाहिदजी!
सुरक्षित काल ती बाहेर नव्हती
अता सुखरुप ती गर्भात नाही

गझल मज भेटते अन बोलतेही
खरे मी सांगतो, स्वप्नात नाही
<<<<<<सुंदर शेर आहेत हे! अभिनंदन!
पण, उर्वरीत शेरांवर जर काही मी सुचवले तर आपणास चालेल का? आपली मर्जी असेल तर काही लिहू इच्छितो, पर्याय देवू शकतो, अन्यथा नाही!
......................................................................................................................................................
अ.अ. जोशींसाठी.....
गर्भात फोडला मी टाहो पुन्हा पुन्हा रे..
अन शांत जगत झाले विझवून वात माझी

आणि

मिळविताना दीप वंशाला तुझ्या...
तूच बघ रे विझविल्या वाती किती..!

जोशीजी! काय सुंदर शेर आहेत हे! अलौकिक! आम्ही तर प्रेमात पडलो त्यांच्या! काळजावर कोरून ठेवावे असे हे शेर आहेत! आमच्या काळजास चटका लावून गेले हे तुमचे शेर! अभिनंदन! परमेश्वर तुमच्या लेखणीस अशीच वैभवशाली वाणी देवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना!
एक विनंती...... गझल पूर्ण करा. प्रत्येक शेर याच ताकदीचा लिहाल अशी खात्री आहे,लगबग करू नका !
.............प्रा.सतीश देवपूरकर

सुरक्षित काल ती बाहेर नव्हती
अता सुखरुप ती गर्भात नाही

सुंदर शेर !

अजय जोशींचे शेर खासच.

आर्त किंकाळी कळीची आजही मी ऐकली
वंशवेलीने किती घ्यावे बळी अजुनी असे?

मलाही आठवलाच!

सुरक्षित काल ती बाहेर नव्हती
अता सुखरुप ती गर्भात नाही

आर्त किंकाळी कळीची आजही मी ऐकली
वंशवेलीने किती घ्यावे बळी अजुनी असे?

गर्भात फोडला मी टाहो पुन्हा पुन्हा रे..
अन शांत जगत झाले विझवून वात माझी

आणि

मिळविताना दीप वंशाला तुझ्या...
तूच बघ रे विझविल्या वाती किती..!

या कवितेच्या ओळी फार आवडल्या.
अप्रतिम .
शब्द्च नाहित.