पोळले काळीज तेव्हा नितळली माझी गझल!

Submitted by सतीश देवपूरकर on 11 November, 2012 - 21:52

गझल
पोळले काळीज तेव्हा नितळली माझी गझल!
दाटला काळोख तेव्हा उजळली माझी गझल!!

पाहिला जवळून मी एकांत ओलेता तिचा;
चिंब कायेतून अलगद निथळली माझी गझल!

याचसाठी मैफिलींनी टाळले बहुधा मला....
मोडुनी संकेत सारे उसळली माझी गझल!

वेचले जातील माझे शब्दही सुमनांपरी!
एवढी रंगात माझ्या मिसळली माझी गझल!!

ती गझल माझीच होती, वाटले नाही मला;
गात तो होता असे की, विव्हळली माझी गझल!

ओसरे कल्लोळ जेव्हा स्पंदनांचा अंतरी;
त्याचवेळी जाणतो मी...निवळली माझी गझल!

शायराचा पिंड माझा, श्वास आहे शायरी....
मात्र मी वेड्याप्रमाणे उधळली माझी गझल!

वाटतो माझाच मजला आज हेवा केवढा!
माझियामागे तिनेही कवळली माझी गझल!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

याचसाठी मैफिलींनी टाळले बहुधा मला....
मोडुनी संकेत सारे उसळली माझी गझल!

हा शेर आवडला...

बाकी बहुतेक गझल वैयक्तिक स्वरूपाचीच वाटली. मला फार नाही आवडली. मात्र हाताळणी अतिशय सहज वाटली. त्याबद्दल अभिनंदन..!!

ती गझल माझीच होती, वाटले नाही मला;
गात तो होता असे की, विव्हळली माझी गझल!

ही द्विपदी बहुदा माझ्यासाठीच असावी. Proud

धन्यवाद आनंदयात्रीजी! असाच लोभ असू द्या! दीपावलीच्या शुभेच्छा! तुमच्या गझललेखनास आमच्या हार्दिक शुभेच्छा!

सर एक शंका आहे.... हे शेर कालगंगेच्या साच्यात आहेत.

याचसाठी मैफिलींनी टाळले बहुधा मला....
मोडुनी संकेत सारे उसळली माझी गझल!

पहिल्या ओळीत गालगा शेवटी आला आहे.. दुसर्‍या ओळीत मात्र गाललल असे घेतले आहे.... मराठी भाषेत शेवटचे अक्षर लघू मानता येते का?? शेवटचे अक्षर लघु असेल तर ते लघु मानावे की गुरु, आपले काय मत आहे? इथे लघुला लघूच मानले तर गझल ठेक्यात बसते.

आंबाजी! प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
शेवटी गालगा असे आहे बरोबर!
दुस-या ओळीत शेवटी गाललल आहे हेही बरोबर!
गाललल यांच्या मात्रा गालगा अशाही मोजता येतात, म्हणून इथे वृत्तभंग वा लयभंग होत नाही!
म्हणजेच दोन लघुंचा एक गुरू मोजता येतो. लयीत कुठेही भंग जाणवत नाही, पहा गुणगुणून!
..........प्रा.सतीश देवपूरकर
आंबाजी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या गझललेखनासही हार्दिक शुभेच्छा!

आणखी एक्शंका..

मतल्यामधील दोन्ही ओळीत एकच काफिया वापरता येतो का?

आपल्याच शेरावर मी तरही केली होती.

काळ नाही वेळ नाही वाट नुसती पाहतो
जिंदगी सरली तरी कबरीत अश्रू ढाळतो.

मला आता यात एक बदल सुचला..
काळ नाही वेळ नाही वाट नुसती पाहतो
जिंदगी सरली तरी कबरीत स्वप्ने पाहतो.

असे केले तर चालते का? मतल्याच्या दोन्ही ओळीत एकच काफिया घेतला तर चालते का?

( आणखी थोड्या वेळाने आणखी एक बदल सुचला, मी आता तेच फायनल केले आहे, तरीही आपण वरच्या शंकेचे उत्तर द्यावे. फायनल असे केले आहे..

काळ नाही वेळ नाही वाट नुसती चालतो
जिंदगी सरली तरी कबरीत स्वप्ने पाहतो. )

आंबाजी!
काळ नाही वेळ नाही वाट नुसती चालतो
जिंदगी सरली तरी कबरीत स्वप्ने पाहतो.

हा मतला सुंदर आहे. ही एक गैरमुरद्दफ गझल होईल, म्हणजे या गझलेत रदीफ नाही, फक्त काफिये असतील!
काफियातील न बदलणारे अक्षर आहे 'तो'. त्याच्या आधीच्या अक्षरात आहे अकारांती स्वर, म्हणजे अलामत आहे अकारांती!
काफिये भरपूर ,सोपे व रोजच्या वापरातील आहेत. कितीही शेर करता येतील या जमिनीवर!
पण सावधान अशासाठी, की काफिये जेव्हा सोपे असतात, तेव्हा सपाट, वर्णनात्मक शेर होण्याचा संभव जास्त असतो. प्रत्येक शेर काटेकोरपणे व खयालांतील काव्य व सौंदर्य जोपासूनच लिहावा लागतो, अन्यथा नुसतेच भरतीचे शेर होण्याचा संभवच जास्त असतो!
................प्रा. सतीश देवपूरकर..
टीप: मतल्यातल्या दोन्ही ओळींमधे रदीफाचा शब्द तोच असतो, बदलतो तो फक्त काफियांचा शब्द, त्यातील अलामत भंग न करता ! -हस्व अलामत असेल तर मतल्यातच अलामत बदल संकेतानुसार क्षम्य मानले जाते व पुढील शेरांत मतल्यातली कोणतीही अलामत सातत्याने वापरता येते!
...................प्रा.सतीश देवपूरकर

ती गझल माझीच होती, वाटले नाही मला;
गात तो होता असे की, विव्हळली माझी गझल!<<<<<<<<

ही द्विपदी बहुदा माझ्यासाठीच असावी. <<<<<<
असे का हो म्हणता प्रमोदजी?

भूषणरव, काहीच वदला नाहीत?

भूषणराव, काहीच वदला नाहीत?>>>>>>>>>>>>>>>

तुम्ही दुसर्‍या एका गझलेत बेफिकिर हे त्यान्चे तखल्लुस वापरले आहे एखद्या गझलेत इतर शायराने जेन्व्हा बेफीजीन्चे तखल्लुस 'वापरले' असते तेन्व्हा त्याच्या गझलेबद्दल ते सहसा बोलणे टाळतात असा माझा अनुभव आहे Wink ........(बेफीजी गम्मत करतोय रागावू नका :))

मी कोण? पाहिले ना, बेफिकीर तो इतका की;
मी यार! अन् मला तो फसवून मोकळा झाला!