पुस्तक प्रकाशनाबद्दल माहिती हवी आहे

Submitted by लालशाह on 9 November, 2012 - 07:02

नमस्कार माबोकरानो,
माझ्या सौ. नी प्रवास वर्णनावर एक दोनशे पानी(अंदाजे) पुस्तक लिहले आहे. काही प्रकाशकाना भेटून स्क्रिप्ट दाखविली पण प्रकाशकांकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाहिये.

आता मात्र ते पुस्तक आम्ही स्वतःच प्रकाशित व वितरीत करण्याचे ठरविले आहे.
काही ठिकाणी चौकशी केल्यावर असे कळले की किमान १००० पुस्तकाची आवृत्ती छापावी लागेल. आमची तय्यारी आहे. पण त्या आधी म्ह्टलं माबोवरुन काही माहिती मिळते का ते पहावे.
माबोकरांचे मोलाचे मार्गदर्शन हवे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users