दिसावयाला हरेक माणूस संत आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 8 November, 2012 - 23:14

गझल
दिसावयाला हरेक माणूस संत आहे!
दिलास तू हात त्यामुळे मी जिवंत आहे!!

सुपूर्त एकेक स्वप्न केले तुझ्याकडे मी;
हरेक मर्जी तुझी मलाही पसंत आहे!

चहूकडे पाहतो सडा मी तुझ्या फुलांचा....
मलाच आले न वेचता हीच खंत आहे!

न एकटा मी तुझ्या सुधेचा तहानलेला;
तुझ्या सुगंधात नाहला आसमंत आहे!

सुरात त्यांनी पुन्हा सुरू कावकाव केली....
कसे म्हणू कोकिळे तुझा हा वसंत आहे?

मला पुन्हा घ्यायची न शोभा करून माझी;
तुझा खुलासा भले जरी शोभिवंत आहे!

पुन्हा पुन्हा मी गुन्हा करावा जगावयाचा!
अखेर माणूस एक मी जातिवंत आहे!!

विचार आता मला, तुझ्या जे मनात आहे...
निवांत आहेस तू, मलाही उसंत आहे!

लहान माझ्या मुलात माझाच भास होतो!
जणू पुन्हा मीच जन्मलो मूर्तिमंत आहे!!

म्हणून हा वेदने, लळा चांगला न माझा...
चिरंजिवी तू, शरीर हे नाशिवंत आहे!

.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चहूकडे पाहतो सडा मी तुझ्या फुलांचा....
मलाच आले न वेचता हीच खंत आहे!>>

मला पुन्हा घ्यायची न शोभा करून माझी;
तुझा खुलासा भले जरी शोभिवंत आहे!>>

हे आवडले. Happy

चहूकडे पाहतो सडा मी तुझ्या फुलांचा....
मलाच आले न वेचता हीच खंत आहे!

न एकटा मी तुझ्या सुधेचा तहानलेला;
तुझ्या सुगंधात नाहला आसमंत आहे!

मला पुन्हा घ्यायची न शोभा करून माझी;
तुझा खुलासा भले जरी शोभिवंत आहे!

पुन्हा पुन्हा मी गुन्हा करावा जगावयाचा!
अखेर माणूस एक मी जातिवंत आहे!!

विचार आता मला, तुझ्या जे मनात आहे...
निवांत आहेस तू, मलाही उसंत आहे!

लहान माझ्या मुलात माझाच भास होतो!
जणू पुन्हा मीच जन्मलो मूर्तिमंत आहे!!

म्हणून हा वेदने, लळा चांगला न माझा...
चिरंजिवी तू, शरीर हे नाशिवंत आहे!

हे सर्वच शेर विशेष आवडले..
वेदनेचा शेर तर भलताच. कारण, मीही लिहितो बर्‍याचवेळा वेदनेवर...

चहूकडे पाहतो सडा मी तुझ्या फुलांचा....
मलाच आले न वेचता हीच खंत आहे!

न एकटा मी तुझ्या सुधेचा तहानलेला;
तुझ्या सुगंधात नाहला आसमंत आहे!

मला पुन्हा घ्यायची न शोभा करून माझी;
तुझा खुलासा भले जरी शोभिवंत आहे!

पुन्हा पुन्हा मी गुन्हा करावा जगावयाचा!
अखेर माणूस एक मी जातिवंत आहे!!

विचार आता मला, तुझ्या जे मनात आहे...
निवांत आहेस तू, मलाही उसंत आहे!

लहान माझ्या मुलात माझाच भास होतो!
जणू पुन्हा मीच जन्मलो मूर्तिमंत आहे!!

म्हणून हा वेदने, लळा चांगला न माझा...
चिरंजिवी तू, शरीर हे नाशिवंत आहे!

हे सर्वच शेर विशेष आवडले..
वेदनेचा शेर तर भलताच. कारण, मीही लिहितो बर्‍याचवेळा वेदनेवर...

आंबा१
तुमच्या भावना समजल्या. पण त्या वरील वृत्तात मांडता आल्या असत्या की!

बघू कुठे मी नवीन विषयांस सांग माबो...?
चहूकडे शेररूप वळवळत जंत आहे..!
(आंबा१ यांच्यावतीने...)

नासलेला आंबा खात जाऊ नका, अशाने जंत होऊ शकतात.

नासलेलाच कशाला, न धुता चांगला पेरुही खाल्लात तरी जंत होतात.

>>नासलेलाच कशाला, न धुता चांगला पेरुही खाल्लात तरी जंत होतात.
ठीक आहे, मग चांगला पेरू धुवून खात जा !

आंबा१,
तुम्ही म्हणता ते खरे आहे. विशेषतः पावसाळ्यात चांगल्या पिकलेल्या पेरूमध्येही जंत निर्माण करण्याची क्षमता असते. कच्या पेरूबाबत मला माहित नाही.
जंतांबद्दलची थोडी माहिती इथे मिळेल.
http://www.arogyavidya.net/arogyavi/index.php?option=com_content&view=ca...

विचार आता मला, तुझ्या जे मनात आहे...
निवांत आहेस तू, मलाही उसंत आहे!<<< वा

अनेक ओळी आवडल्या.

(नाशवंतही चालावे)

महेश | 9 November, 2012 - 11:56 नवीन
नासलेला आंबा खात जाऊ नका, अशाने जंत होऊ शकतात.
***
कर्रेक्ट!
महेश हे माबोचे नवे विचारजंत आहेत Wink

इब्लिस महाशय, नवे नाही जुने म्हणा हवे तर.
तुमच्या वयात जेवढे आठवडे आहेत तेवढ्या वर्षांचा आयडी आहे माझा आणि तो सुद्धा कोणतीही लपवाछपवी नसलेला.
आणि मी विचारजंत आहे की दुसरे कोणी हे इकडे माहिती आहे अनेक नियमित आणि खर्‍या आयड्यांना.
शुभेच्छा ! Happy

महेश,
मोठे व्हा.
चष्मे बदला. नेटवरी आयडी किती जुनी, ते माझे वय नव्हे. अन तुमच्या लपवाछपव्यांशी मला शष्प कर्तव्य नाही. माझ्या विपूमधे जा, तिथे एक प्रश्न लिहिला आहे, त्याचे उत्तर लिहा. पुढचे तिथेच बोलू.

बाकी नुसत्या विचारांचे नव्हेत, बरेच जंत झालेत तुम्हाला. डी-वर्मिंग करून घ्या. अन माझ्या नादी लागणे सोडा. प्रत्येक वेळी तुमचे पूर्णविराम पहातो आहे मी. आधी बर्‍याचदां समजून घेण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला. ठीक?

रच्याकने, माझा आयडी एक वर्षापेक्षा जास्त जुना आहे. एका वर्षांत ५२ अठवडे. माबो १६ वर्षे जुनी. अंकगणित शिकलात का शाळेत?

डी-वर्मिंग करून घ्या. >>>> जातिवंत डॉक्टर आहात इब्लिसराव !! वा ....आय लाईक्ड इट

शष्प म्हणजे काय ????? पुष्प महीत आहे !!

चाचा, हिक्डं पैल्वान लोकं गजला लिव्तात, आन सोता गज्लंत्लं काय सम्जंना म्हंन्नारे हमसू हमसू पर्तिसाद लिव्तात. मं आखाडा नाय तं काय मंडई हुईल का बाफ ची?

इब्लिस् राव !!....मला माहीत आहे तो अर्थ ; पण इथे बॅन्-ड आहे हे तुम्हाला माहीत आहे का हे पहायला म्हणून मुद्दाम विचारले

सान्गायचे तात्पर्य ; की शब्द अश्लील वाटत नाही म्हणून काय झाले ? अर्थ बदलत नाही कि नै! अश्लील ते अश्लीलच आहे ;ते आपणास टाळता आले असते असे मला वाटते
असो!
आता काय केले पाहिजे हे मी सुचवणार नाही. आपण नक्कीच तितके प्रगल्भ असाल यावर माझा विश्वास आहे
Happy

वैवकु,
जैसे गजल 'कही' जाती है,
शिवी ही 'हासडली'च पाहिजे.
अन संताप व्यक्त करण्यासाठी त्यासारखा दुसरा मार्ग नाही. असो..
***
आता काय केले पाहिजे हे मी सुचवणार नाही.<<
उपयोग नाही सुचवून. त्याचं काये, इतर एका ठिकाणी मी नास्तिकतेबद्दल लिहिलं आहे. नास्तिक असण्याचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे, जे काही आपण करतो, बोलतो, वागतो, त्याची जबाबदारी स्वतः घ्यावी लागते. जे बोललो, टंकलो, त्याची जबाबदारी माझी, अन परिणाम झेलण्याची ताकतही माझीच. हो की नाही?

नास्तिक आहात म्हणजे प्रगल्भ असालच !!
आपण करत आहात ते बरोबरच असणार !!

धन्यवाद

माझा एक शेर आठवला तुम्हाला उद्देशून लागू होत आहे ..................

मी तितकाही बुद्धू नाही बरका मित्रा
हीच हुशारी तुला शहाणा म्हणणे म्हणजे

Light 1

आपणास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..पणती नसल्याने दिवा देत आहे असे समजू नका !!

ह्म्म्म माझा अंदाज खरा ठरला. वार बराच वर्मी लागलेला दिसतोय. खरेतर इरादा नव्हता पण सुरूवात तुम्ही केलीत मला जंत वगैरे म्हणुन.
असो, वयाचे गणित एवढे अवघड करण्याची गरज नव्हती. १ वर्षे ११ आठवडे यामधले फक्त आठवडे सांगायचे होते.
>>अन माझ्या नादी लागणे सोडा. प्रत्येक वेळी तुमचे पूर्णविराम पहातो आहे मी. आधी बर्‍याचदां समजून घेण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला. ठीक?
जिथे वाद निर्माण होईल असे वाटते तिथे येऊन पुर्णविराम देण्याचा प्रयत्न नक्की करणार. तुम्ही असा नाही तर आणखी कोणी.
बादवे, तुम्ही सतविचारांच्या नादी लागून विभाजनवादापेक्षा एकजूट बरी हे समजून घेण्याचा प्रयत्न केलात तरी खुप झाले. अर्थात आग्रह नाहीये.
राहिला प्रश्न कळत नसताना गझलेवर प्रतिसाद देण्याबाबत... ते तर तुम्ही पण देताय (फडतूस, इ.)
(दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा :दिवा:)

इति लेखनसीमा !