मसुरचे खाट्टं

Submitted by अवल on 7 November, 2012 - 23:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मसूर १ वाटी
हळद, तिखट, मीठ चवीप्रमाणे
चिंचेचा कोळ २ चमचे
लसूण ७-८ पाकळ्या
तेल ३ चमचे
कोथिंबीर एक मूठ

क्रमवार पाककृती: 

आयत्या वेळेस करावयाचा पदार्थ
जाड बुडाच्या भांड्यात मसूर घ्यावेत. मध्यम आचेवर कोरडे भाजावेत. त्यांचा रंग लाल ऐवजी वाळूच्या रंगाचा होईल इतपतच भाजावेत. आच बंद करून मसूर धूवून घ्यावेत.
आता त्यात मसूर बुडतील अन त्यावर थोडे वर येईल इतके पाणी घालून उकळवत ठेवावे. उकळी आली की दहा मिनिटं झाकण ठेऊन शिजवावे. भाजलेले असल्याने दहा मिनिटात मसूर शिजतात.
आता त्यात हळद, तिखट, मीठ, चिंचेचा कोळ टाका. चिरलेली किथिंबीर घाला. कोथिंबीर मात्र भरपूर हवी.
दुसरीकडे लहान कढईत तेल घ्या. त्यात लसणाच्या पाकळ्या चेचून घाला. लसूण खरपूस लाल झाला की ही फोडणी उकळत्या मसूरात घाला. झाकण ठेऊन २ मिनिटं उकळवा. तयार आहे मसूराचे खाट्टं..
1352346647923.jpg

वाढणी/प्रमाण: 
चौघांसाठी पुरेसे.
अधिक टिपा: 

हे खाट्टं तांदळाच्या भाकरी बरोबर छान लागतं. आमच्याकडे नॉनव्हेज केल्या नंतर दुस-या दिवशी हे करतात.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक सी. के. पी. पदार्थ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल छान रेसिपि आहे आणि सोपि पण
अवल तु सी. के.पी पध्दतिचे नॉनवेज प्रकार पण टाकशिल का.
एकदा टीव्हि वर मेजवानि मध्ये पापलेट पाहिले होते .

Pages