मसुरचे खाट्टं

Submitted by अवल on 7 November, 2012 - 23:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मसूर १ वाटी
हळद, तिखट, मीठ चवीप्रमाणे
चिंचेचा कोळ २ चमचे
लसूण ७-८ पाकळ्या
तेल ३ चमचे
कोथिंबीर एक मूठ

क्रमवार पाककृती: 

आयत्या वेळेस करावयाचा पदार्थ
जाड बुडाच्या भांड्यात मसूर घ्यावेत. मध्यम आचेवर कोरडे भाजावेत. त्यांचा रंग लाल ऐवजी वाळूच्या रंगाचा होईल इतपतच भाजावेत. आच बंद करून मसूर धूवून घ्यावेत.
आता त्यात मसूर बुडतील अन त्यावर थोडे वर येईल इतके पाणी घालून उकळवत ठेवावे. उकळी आली की दहा मिनिटं झाकण ठेऊन शिजवावे. भाजलेले असल्याने दहा मिनिटात मसूर शिजतात.
आता त्यात हळद, तिखट, मीठ, चिंचेचा कोळ टाका. चिरलेली किथिंबीर घाला. कोथिंबीर मात्र भरपूर हवी.
दुसरीकडे लहान कढईत तेल घ्या. त्यात लसणाच्या पाकळ्या चेचून घाला. लसूण खरपूस लाल झाला की ही फोडणी उकळत्या मसूरात घाला. झाकण ठेऊन २ मिनिटं उकळवा. तयार आहे मसूराचे खाट्टं..
1352346647923.jpg

वाढणी/प्रमाण: 
चौघांसाठी पुरेसे.
अधिक टिपा: 

हे खाट्टं तांदळाच्या भाकरी बरोबर छान लागतं. आमच्याकडे नॉनव्हेज केल्या नंतर दुस-या दिवशी हे करतात.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक सी. के. पी. पदार्थ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मसूर भिजवायचे, मोड आणायचे हे काही नसल्याने खुप सोपा अन सुटसुटीत अन आयत्या वेळेस करता येणारा पदार्थ आहे हा Happy
असंच मूगाचेही खाट्टं करतो आम्ही. फक्त शिजण्याचा वेळ जरा जास्ती. पण तेही मस्त लागतं. पौष्टिक, लसणाची खमंग फोडणी अन सढळहस्ते कोथिंबीर ही या खाट्ट्यांची खासियत.

छान आहेच..

आमच्याकडे नॉनव्हेज केल्या नंतर दुस-या दिवशी हे करतात.>>>> हे काय आवडलं नाय.. Wink

>>आमच्याकडे नॉनव्हेज केल्या नंतर दुस-या दिवशी हे करतात.

काल तुमच्याकडे सोड्याची खिचडी होती ते ठाऊक आहे बरं आम्हाला Wink (अवांतर -- होपफुली पचली असेल :P)

वेक्स, तुला आणि शागंला मी 'सोड्याच्या खिचडीची' लिंक देणार होते. तुमच्या दोघांच्या आवडीचा विषय आहे ना. Happy

आरती, छान रेसिपी आहे, पण नाव मात्रं आवडलं नाही. खाट्टं? आणि वर्षाचं मेदगं? मसुराची उसळ आम्हाला आवडते, पण अशी नावं सांगितली तर घरचे खायचे नाहीत. Wink Happy

आमच्याकडे नॉनव्हेज केल्या नंतर दुस-या दिवशी हे करतात. >>> काय लॉजिक? काही स्पेसिफिक कारण आहे का? मला फारच उत्सुकता ! Happy

>> काय लॉजिक? काही स्पेसिफिक कारण आहे का? >>>>> मला वाटतं नॉनव्हेजच जड जेवण झाल्यावर हे पचायला हलकं जात असेल अन कमी वेळात होतं म्हणुन असेल..

अरे व्वा!!! मस्त रेसिपी आहे. झटपट होणारी आणि चविष्ट. Happy

मसूर सीकेप्यांच्या विशेष आवडीचे असतात काय? एक मैत्रिण आठवड्यातून तीनदा तरी डब्यात आणते. अगदी चविष्ट आणि विशेष म्हणजे ती कधीच भिजत घालत नाही असं म्हणते. त्याचं गुपीत आज कळलं Happy

मि मसुर कांदा आणि टोमेटो कापेपर्यंत भिजवते आणि कुकर मध्ये कांदा आणि टोमेटो,ल्सुन व इतर मसाले टाकुन तिन ते चार शिट्या घेते
चांगले शिजते आणि आयत्या वेळेवर पटकन होणारि कृति Happy Happy

पण नाव मात्रं आवडलं नाही. खाट्टं? आणि वर्षाचं मेदगं? >>> माझ्या साबा पाठारे प्रभू आहेत. त्यांच्या पदार्थांची नावे पण अशीच असतात - भूजणं, खडखडलं, आटलं, गोडं

मस्त आहे ही पाकृ. नक्की करुन बघणार.
चवळी भाजून उसळ नेहेमी करतात आमच्याकडे पण हेच लॉजिक मसूर आणि मुगाला लावता येईल हे सुचलं नव्हतं Happy

मूग भाजून अशी आयत्या वेळेला उसळ बर्‍याचदा करते. मसूराची कधी केली नव्हती. प्रेशर पॅनला लावलं तर अगदी तीन चार मिनिटामधे शिजतील ना?

व्वा! हे बरे आहे. मसूर पटकन शिजत नाहीत, आणी कुकरमध्ये शिजवले तर गाळ होतात, त्यापेक्षा हे भाजुन घेण्याची आयडीया मस्तच. धन्यवाद अवल.

कित्ती कित्ती दिवसानंतर मेदगं हा शब्द ऐकला. हे असे शब्द हरवून गेले आहेत भाषेतून. आमच्याकडे घट्ट गोळ्याला मेदगं म्हणतात. म्हणजे दह्यातील गोळा असला की मेदगं. भरीत मधला गोळा असला की मेदगं.

माहेरी आईच्या हातची मसूरीची आमटी/उसळ कधी आवडली नाही.
आता साबा मात्र फक्क्ड बनवतात. पण मसूरीच्या उसळीचा बेत २ दिवस अगोदर पासून ठरवतो
ही आयत्या वेळेची सांगून बघते त्यांना

एक मैत्रिण आठवड्यातून तीनदा तरी डब्यात आणते.>>म्हणजे तिच्याकडे उरलेले ४ दिवस नॉनव्हेज असणार हेच ते गुपित Happy

अख्ख्या मसुरांची आमटी आवडते म्हणजे हे ही आवडेल असं वाटतय >>> +१०
अख्ख्या मसुरांचा फ्राईड राईस पण मस्त लागतो........
हे तर फारच छान्....

Pages