भोवती अंधार वारेमाप आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 6 November, 2012 - 22:22

गझल
भोवती अंधार वारेमाप आहे!
चालण्याचा पावलांना शाप आहे!!

रोज जगण्याची लढाई....रोज मृत्यू!
जीवनाचा काय थोडा व्याप आहे?

ते चवीने वेदना चघळीत होते;
चाखली कोणी सुखाची खाप आहे?

वेगळा ठेका, निराळा ताल माझा!
मी मृदंगाची चुकीची थाप आहे!!

मोठमोठ्यांना खटकलो त्यामुळे मी....
चहुकडे माझाच वार्तालाप आहे!

पाहुणा समजून केली सरबराई;
चावला तेव्हा कळाले साप आहे!

तेवढी खडतर हवी तुमची तपस्या;
कोणताही शाप घ्या.... उ:शाप आहे!

भोगली शिक्षा..न केलेल्या गुन्ह्याची...
आज ते म्हणतात...मी निष्पाप आहे!

टाळते दुनिया अशा का माणसाला?
नेमका जात्याच जो अश्राप आहे!

उंच मी आहे नसे हा दोष माझा!
मी जगाला लागलेली धाप आहे!!

अंगवळणी मी कधी पडलोच नाही!
काय मी इतके चुकीचे माप आहे?

.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोज जगण्याची लढाई....रोज मृत्यू!
जीवनाचा काय थोडा व्याप आहे?

व्वा!

चहुकडे माझाच वार्तालाप आहे!

भोगली शिक्षा..न केलेल्या गुन्ह्याची...

मी जगाला लागलेली धाप आहे!!

या ओळी आवडल्या...!

उंच मी आहे नसे हा दोष माझा!
मी जगाला लागलेली धाप आहे!!

रोज जगण्याची लढाई....रोज मृत्यू!
जीवनाचा काय थोडा व्याप आहे?

<< वाह !

छान.

भूषणराव,
छंदात लीलया बांधलेली/साधलेली असे म्हणायचे आहे त्यांना बहुतेक!
छंदात कोंबलेली नव्हे!

उंच मी आहे नसे हा दोष माझा!
मी जगाला लागलेली धाप आहे!!<<<

असंबद्ध, काफियाव्याकुळतेतून आलेला नवजात बालकासारखा असंस्कारीत व तुरटी फिरवल्यासारखा शेर!

अश्या शेरांच्या मालिकांना गझल म्हणावे की नाही हाच विषय आता चर्चेसाठी उरलेला आहे.

कळावे.

गंभीर समीक्षक

ते चवीने वेदना चघळीत होते;
चाखली कोणी सुखाची खाप आहे?

Rofl
मी या गझलकाराशी फोनवर बोललो होतो त्यावेळेस नॉर्मल वाटला होता मला....... Sad

तुरटी फिरवल्यासारखा शेर!>>>> वा !! गं.स.जी अत्यंत सहीसही समीक्षा करता तुम्ही वा वा !!

मी या गझलकाराशी फोनवर बोललो होतो त्यावेळेस नॉर्मल वाटला होता मला....... >>>> अतीशय जहाल प्रक्षोभक वक्तव्य!!!
असो !!
बच्चनजी मीही फोनवर बोललो आहे त्यांच्याशी फरक इतकाच की ते नॉर्मल नसल्याचे मला आधीच समजले होते!!(म्हणून तर फोन केला होता मी विचार्पूस करायला म्हणून !!! ;))

वैवकु माझा पट्टशिष्य असून गझलेचे प्राथमिक धडे माझ्ह्याकडेच गिरवल्याचे म्हणत होते ते.....अजूनही त्याला माझ्यासारखी सारगर्भीत गझल जमत नसल्याची खंत बोलून दाखवली त्यांनी.....

गझलेचे प्राथमिक धडे माझ्ह्याकडेच गिरवल्याचे>>>>> तुम्ही नीट ऐकले नसेल .........गझलेचे नाही... पर्यायी गझलेचे धडे असे म्हणाले असतील ते !! Happy

देवसर स्वतः गझलेचे एक विद्यार्थी आहेत असे ते मला म्हणाले त्यामुळे ते दुसर्‍यास गझल शिकवू शकत नाहीत असे ते मला म्हणाले मग मी हट्टच धरला ( म्हणून हट्टशिष्य असे म्हणाले असतील ते तुम्ही पट्टशिष्य असे चुकून ऐकले असेल :))

मी म्हणालो निदान गेलाबाजार पर्यायीतरी शिकवाच तरी तेही मुलखाचे हट्टी निघाले मग मी एकलव्यासारखा त्यान्च्या पर्यायी गझलेचा शिष्य झालो

मी दोन ओरीजनल शेरही केले होते सरांच्या व पर्यायी गझलेच्या स्तुतीत .........

गझल फडतूस असते रे तिची सोडून दे इच्छा
गुरू कर देवसर!!... सुचतिल तुलाही शेर पर्यायी

विजा घेवून येणार्‍या पिढ्यांचे स्वप्न सरणावर
चतेची राख करण्यास्तव पडा की देवसर खाली

पण ही ईकारांत स्वरकाफियाची गझल असल्याने सर इतके चिडले की त्यांनी वैभवा ..वैभवा अशी माझ्या तखल्लुसाची रदीफ करून एक एकटाकी गझल पाडली !!!!!!

असो
असे अनेक किस्से आहेत बच्चनजी भेटू कधीतरी मग बोलूच !!!!..मग तुम्हाला समजेलच की आम्ही अमिताब्बच्च्चन नसलो तरी बोलबच्चन नक्कीच आहोत !! Wink

वा योगजी
हबा 'लक्षवेधी' असे म्हणाले नव्हते 'लक्षणीय' म्हणाले होते त्याचा किती खोलवर विरोधाभास/उपहास पकडलात अन त्या प्रतिसादाचा एक सुन्दर अर्थ उलगडून दाखवलात

वा छान !!
ह.बा. म्हणाले ते आता नव्या अर्थानुसार पाहता पटले आहे

धिक्कार!!! धिक्कार!!!! धिक्कार!!!!

असल्या गझलेचा अन् असल्या गझलकारांचा धिक्कार !!!!

एक शेर अर्ज करता हू ।......

भट मराठी गझलचे मातृत्व करती
देव गुरुजी .....स्वयम-घोषित बाप आहे

देव गुरुजी ......स्वयम-घोषित बाप आहे

आता स्मईली दाखवा हिम्मत असेल तर !!!!

>>खोलवर विरोधाभास/उपहास पकडलात अन त्या प्रतिसादाचा एक सुन्दर अर्थ उलगडून दाखवलात
धन्स! वारेमाप मध्ये माझी थोडीशी भर... बाकी नाही काही..

सर्व नावाजणा-या व धिक्कारणा-या मायबोलीकरांचे आभार!