सुज्ञपणाचा बुरखा मजला कधी न आला पांघरता!

Submitted by सतीश देवपूरकर on 6 November, 2012 - 10:19

गझल
सुज्ञपणाचा बुरखा मजला कधी न आला पांघरता!
तुझ्याप्रमाणे मला न आला तोल स्वत:चा सावरता!

वादळ आले क्षण काही पण, विसकटलो मी हाय किती!
युगे लोटली तरी न आला मला पसारा आवरता!!

काय फुलांच्या निमंत्रणाची वाट पाहतो भ्रमर कधी?
गुंजारव तो करू लागतो, बागबगीचे मोहरता !

अशाच एका रम्य सकाळी सुगंध झालो मीच स्वत:;
वा-यासंगे रानफुलांच्या वस्तीमध्ये वावरता!

उभ्या उभ्या ती मला भेटली, बहरत गेला जन्म उभा!
फुलावयाला एक लाघवी स्पर्श पुरेसा ओझरता!!

कणाकणावर दिसू लागली चैतन्याची छाप मला!
तुझ्या अलौकिक लावण्याने डोळे माझे मंतरता

धार तळपत्या तलवारीची जरी माझिया जगण्याला;
तुझे रेशमी पाश तरीही मला न आले कातरता!

चालत आले शब्द शेवटी थेट मनाच्या गाभारी,
हृदयामधल्या भावफुलांच्या पायघड्या मी अंथरता!

स्फुरू लागल्या गझला ऐशा, जसा झरावा चंद्रमणी....
तुझ्या रुपाचे शरदचांदणे उरात माझ्या पाझरता!

.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उभ्या उभ्या ती मला भेटली, बहरत गेला जन्म उभा!
फुलावयाला एक लाघवी स्पर्श पुरेसा ओझरता!!<<<

गायनॅकॉलॉजिस्टांच्या पोटावर पाय!

उर्वरीत गझलेवर उद्या प्रतिसाद देतोच.

गझल छान
काफिये सुन्दर

अ. अ. जोशी साहेबान्शी सहमत ...(इतक्या दिवसात प्रथमच ;))

चावट कुठले!>>>>>>माबोकरानो पाहून घ्या देवसरान्चा इतका छोटा प्रतिसाद ...दोनच शब्द!! ... पुन्हा कधी पहायला मिळेल 'देव' जाणे !! Lol

जोशीजी!
धन्यवाद प्रतिसादाबद्दल!

यात कवितापण जास्त वाटतंय....<<<<<<<
गझलेच्या प्रत्येक शेरात कवितापण नव्हे कविताच असायला हवी, ही प्रथम अट असते गझलेची!
............प्रा.सतीश देवपूरकर

>>यात कवितापण जास्त वाटतंय....<<<<<<<
>>गझलेच्या प्रत्येक शेरात कवितापण नव्हे कविताच असायला हवी, ही प्रथम अट असते गझलेची!
असेच "कवितेचे लाड" करत जा Happy

सतीशजी,

यात गझलीयत की काय म्हणतात ती फार वाटतच नाहिये.

फुलावयाला एक लाघवी स्पर्श पुरेसा ओझरता!!
हे एक आवडले.

**** केवळ वर्णनामध्येही काही विचार देऊ शकतो.

जोशीजी!
अद्याप आम्हास गझलीयत म्हणजे नेमके काय हे उलगडलेही नाही व पटलेही नाही.
गझल आहे किंवा नाही या दोनच गोष्टी असू शकतात.
कवितांचे आम्ही दोनच प्रकारात वर्गीकरण करतो.....
१) गझल कविता
२) अगझल कविता

जरा चावटच उदाहरण द्यायचे झाले तर असे म्हणता येईल की, एखादी माउली pregnant आहे किंवा pregnant नाही. तिसरी गोष्टच संभवत नाही.
गझल आहे पण गझलीयत कमी/जास्त/थोडी असे काही नसते.
अर्थात कामयाब गझल होण्यासाठी काही गोष्टींची नितांत गरज असते, ज्यावर परत कधी तरी सवडीने विस्तारपूर्वक प्रकाश टाकू!
टीप: एका गझलेतील, मग ती कुणाची का असेना, प्रत्येक शेर कामयाब असेलच असे नाही.
प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते.
समजा एका गझलेत ८ शेर असतील तर त्या ८ भिन्न कविता असतात.
आता एकाच कवीच्या ८ कविता काय एकाच दर्जाच्या असतील काय?
थांबतो,

.............प्रा.सतीश देवपूरकर
....................................................................