झाकल्या पताका

Submitted by अज्ञात on 4 October, 2008 - 03:17

सखी आंसवे ही
फुलांचीच गावे
भृंगास ना ठावे
कांही अजूनही,..
दंवाचा वानोळा
काळजात गोळा
पापणीस जाळे
पाणी असूनही

झुळ झुळ आता
खळखळे जळ
मेघ विरघळे
नभ जिंकूनही,..
मोराचा पिसारा
झाकल्या पताका
ऊर पहातसे
डोळे मिटूनही

.................अज्ञात
१३८२,नाशिक

गुलमोहर: 

खुप गहन लिहितोयस. सगळ्यांना कदाचित कळायला जड जाईल. ऍब्स्ट्रॅक्ट पेंटींगची गम्मत आणलीस मित्रा....मंद रंगछटा असताना मोराचा पिसाराचा स्ट्रोक अन अखेर ऊर पहातसे डोळे मिटूनही च्या ओळितुन लाल बाण.........

पल्ले,
खरंच तू ह्याचं; म्हटलय तसं पेंटिंग करून टाक मायबोलीला ह्याच कवितेसोबत !!कशी आहे कल्पना ?? ( नुसती कल्पना म्हणून नाही, प्रत्यक्क्षात आणण्यासाठी म्हणतोय !! Happy ) मजा येईल. लोकांपर्यंत अर्थही पोहचेल पुष्कळसा. Happy वाट पहातो पेंटिंगची.

ह्या कवितांमध्ये एक वेगळीच, काळोख्या डोहासारखी खोली अनुभवायला मिळतेय. डोकाऊन पहायची उत्सुकता वाटते, पण त्या काळोख्या, काहीश्या अनाकलनीय विश्वाची भीती पण वाटतेय.
अतिशय सुंदर!

चाऊ,
अरे भिती वाटण्यासारखं कांही नाही. डोकाऊन तर पहा. तुझ्या अंतरातले रंग त्यात तुला दिसले तर ते खरे मला पावले. मला जे म्हणायचं आहे तेच तुला वाटलं पाहिजे असं काही नाही.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.