दिवाळीत किल्ला का करतात?

Submitted by Prajakta C. Kulkarni on 5 November, 2012 - 08:00

दिवाळीत किल्ला का करतात याबद्द्ल जर कोणाला महिती असेल तर सांगा.किंवा दिवाळीचे आणि गड -किल्ल्यांचे काय संबंध असावा ,तशी काही परंपरा / कथा आहे का ? आणखी एक एखाद्या किल्ल्याच्य चित्रावरुन
जर त्याची प्रतिक्रुती करायची असेल तर कशी करावी?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणखी एक एखाद्या किल्ल्याच्य चित्रावरुन जर त्याची प्रतिक्रुती करायची असेल तर कशी करावी?
<<
<<
या विषयावर लोकसत्तातील एक लेख...
**********************************************************
डोंगरांनो का उभे? सांगाल का काही मला?
तीनशे वर्षांचिया जो मागला तो मामला
कुणी फिरस्ता हिंडता वनी,
वदला ऐशी आर्जववाणी।
ऐकून त्याची आर्त याचना,
आली येथल्या जडा चेतना।।
मला विचारा मीच सांगतो,
आधी या माझ्याकडे, सरसावत एकेक पुढे,
हात उभारूनि घुमू लागले, डोंगर किल्ले बुरूज कडे ।।
कवी यशवंत यांनी सहय़ाद्रीच्या अंगाखांद्यावर उभ्या असलेल्या गडकोटांबद्दल लिहून ठेवलेले हे सुंदर काव्य. गडकोटांमध्ये रमणाऱ्यांना ते अनेकदा आत्मगानच वाटते. या काव्याचे स्मरण होण्याचे कारण म्हणजे दिवाळी आलीय आणि दिवाळी म्हटले की आपल्या सर्वाना ओढ लागते ती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची! दिवाळी म्हटले की, जसे फराळ, फटाके, पणत्या, आकाशकंदील डोळय़ांपुढे येतात, तसेच अंगणातील किल्लाही आठवतो. लहानांच्या विश्वातला आणि मोठय़ांच्या आठवणीतला असा हा दिवाळीचा किल्ला! पुढे वाचा

ऑफिसात किल्ले करायची स्पर्धा आहे. कालच जेवताना एकानी हा प्रश्ण विचारला पण कोणाला (खरे) उत्तर माहिती नव्हते. (वरच्यासारखे विनोद अनेकांनी केले).
लिंबूटिंबूनी काही कारणं दिली आहेत. ही प्रथा केंव्हापासुन चालू आहे याबद्दल काही माहीती आहे का?

पुण्यात संभाजी पार्क मध्ये किल्ले बनचण्याची स्पर्धा असते. लेक भाग घेणार आहे. नावनोंदणी कोठे करायची हे कोणाला माहीत आहे का?

ते गवळण, शिवाजी महाराज, मावळे अजून मिळतात का? ठाणे परिसरात? पुणयात आमच्या घरासमोर विकत असत रस्त्यावर. अजून त्या गवळणींच्या साड्यांना चंदेरी जर असते का? एक शिवाजी पुतळा, दोन मावळे, दोन गवळ्णी हे बजेट असे. हिंगाच्या डबीला मातीत रुपवून मग त्यात पाणी भरले की तळे. मग बाजूने अळीव तर हवेच. किल्ल्यात दोन फुलबाज्या रुपवून एकदम पेटविल्या कि एकदम शानदार. Happy ऐश, Happy

http://articles.timesofindia.indiatimes.com/2010-10-29/pune/28232881_1_f...
"Historian Ninad Bedekar reiterates, "The tradition of making mud forts can be traced back to 300 years. Aurangzeb, who had put an end to the Adil Shahi and Kutub Shahi dynasties in Maharashtra, could never conquer the Marathi kingdom. It was all because of Shivaji's 260 fortresses, the defence lines of which were set from Salher to Gingee in Tamil Nadu. This could be one of the reasons why children build mud forts during Diwali. It is an act of pure reverence.""

वरती लिंब्स यांनी दिलेले स्पष्टीकरण तर चांगलेच आहे.
मला असे वाटते की शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या सहाय्याने स्वराज्य उभे केले आणि तमाम महाराष्ट्राला दिवाळी साजरी करता येऊ लागली याची आठवण म्हणुन दिवाळीत किल्ला करण्याची प्रथा चालू झाली असावी.
असो, या निमित्ताने का होईना लोक किल्ल्यांची आठवण ठेवतात, हे ही नसे थोडके.

उदयन.. | 6 November, 2012 - 05:16
दिवाळीत किल्ला का करतात?>> गणपती मधे करत नाहीत म्हणून>>>>गणपतीमध्ये किल्ला का करत नाहीत. Wink

उदयन.. | 6 November, 2012 - 05:16
दिवाळीत किल्ला का करतात?>> गणपती मधे करत नाहीत म्हणून>>>>गणपतीमध्ये किल्ला का करत नाहीत. Wink

उदयन.. | 6 November, 2012 - 05:35 नवीन
गणपतीमध्ये किल्ला का करत नाहीत. >>>>>> कारण दिवाळीतकरतात>>>> दिवाळीत किल्ला का करतात Biggrin

महेश,
>>> मला असे वाटते की शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या सहाय्याने स्वराज्य उभे केले <<<
Lol

मला वाटले होते कि, शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या सहाय्याने स्वराज्य उभे केले.

माझे मत ******

जुन्या काळी असे गावागावात आणि घराघरात दिवाळी साजरी करण्याची प्रथा नसावी बहुधा. कारण, फटाके ही स्फोटके प्रत्येकाकडे नसणार. अशा पद्धतीची काही स्फोटके किल्ल्यांवरच असतील. आणि म्हणून किल्ल्यांवरच आतशबाजी वगैरे होत असेल. आता सगळ्यांना सगळे मिळते, किल्ले सोडून. त्यामुळे एक प्रतिक म्हणून किंवा हौस म्हणून किल्ला करायचा आणि बसायचे फटाके फोडत.

तिकडे, राजू शेट्टी उसाला दर मिळावा म्हणून झगडताहेत, अण्णा भ्रष्टाचाराशी सामना करू पाहताहेत, मेधा पाटकर गरिबांना न्याय मिळावा म्हणून उपोषणे करताहेत, काही लोक साथीने मरताहेत तर काही आत्महत्येने किंवा अत्याचाराने मरताहेत. आपण बसलोय खोटेखोटे किल्ले करीत आणि फटाके फोडत.

असो, ज्यांना जे करायचे आहे ते करू देत म्हणा....

नमस्कार, विषय वाचुनच खुप बरं वाटल, मी मात्र या सगळ्याकदे एका वेगळ्या नजरेने पाहयच प्रयत्न करतो, किल्ला हा आजचा तसा कालबाह्य प्र्कार , पण आजही काही ठीकाणी बनवला जातो. लहानपणी खुप मेहेनतकरुन दगड विटा जमवणे , कुम्भर वाड्यतुन नकाशा,मातीची चित्र आणणे, आणि किल्ल्ला बनवणे यासाठी खुप मजा, उत्साह असायचा.आताशा, मुलांना किल्ला याविषयी फारच कमी माहीती असते , उत्साह असतो, मग मीही त्यांच्यातच सामील होतो, तट, बुरुज,दरवाजे, चोरवाटा, अशी सगळी रचनाकरत किल्ला बनतो, आणि मग होणार्या स्पर्धेचा फोर्म भरायचा.
सहज जाणवलेल्या काही गोष्टी: आज इतिहास्/संस्कृती , माहीती हे फक्त, मार्क मिळवण्या पुरतं शिल्ल्क राहेलय.बरेचदा, किल्ले पाहीलेलेच नसतात, मग केवळ बनतात ते दगडविटा,मातीचे डोंगर.
आता मात्र गेली ५ वर्ष सलग या मुलांबरोबर किल्ला बनवुन देताना फार मजा येते. त्याना नवीन माहीती सांगत किल्ला केला जातो,

घारूअण्णा,
अभिनंदन. चांगला उपक्रम.
आजकालही टीव्ही/काँप्युटर्/मोबाईल सोडून अशा गोष्टी करत मातीत हात घालून वेळ 'वाया' घालवण्यासाठी मुलं अन 'संस्कारवर्गात' न घालता त्यांना तशी परवानगी देणारे त्यांचे मायबाप तुम्हाला भेटतात हे आपले सगळ्यांचेच सद्भाग्य!

अरे हो, घारुआण्णा नुसता किल्लाच करत नाहीत. त्यात गुप्तधनही पुरतात अस कळलय मला... Happy