अन्नपुर्णेश्वरी

Submitted by -शाम on 5 November, 2012 - 03:55

अन्नपुर्णेश्वरी तुझी आरती गातो
घास मुखी घेताना तुझे नाम मी घेतो ||धृ||

व्याकुळलेली सृष्टी जेंव्हा निजदृष्टी दिसली
काशी तिर्थावरी तेंव्हा गौरी प्रगटली ||१||

चराचरावर आई तुझे कोटी उपकार
विन्मुख दिसता कोणी सत्वर होशी साकार ||२||

भुकेजल्या जीवांच्या मुखी भरवीशी घास
तुझ्या कारणे चाले अवघ्या अवनीचा श्वास ||३||

तू मायेचा सागर अवघे चैतन्य तूचि
शाम विनवितो आता सकळा सुख वैभव देशी ||४||

.......................................................................................

आज तिसर्‍यांदा आणखी एक आरती रेकॉर्ड करण्याचं भाग्य, ईश्वर कृपेने आणि तुमच्या सदिच्छा/ आशीर्वादाने मिळत आहे. हा आनंद वाटून घेण्यासाठी हा लेखन प्रपंच.
......................................................................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा ! छान आणि नवीनच ..पहिल्यानेच अन्नपूर्णेश्वरीची आरती वाचली. अभिनंदन आणि धन्यवाद.

अभिनंदन Happy