'मी आणि कंपनी'

Submitted by जयन्ता५२ on 4 November, 2012 - 08:08

'मी आणि कंपनी'

'मी आणि कंपनी'च्या मिटींग्जमध्ये
काही वाद ठरलेले आहेत.
उदा.
...काळजाला पसंत नसतात
मेंदूची ती सुबक,स्मार्ट 'पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन्स'
आणि मेंदूला अजिबात आवडत नाही
काळजाचा 'अनप्रोफेशनल परफॉर्मन्स'!
*
मेंदूची 'स्ट्रॅटेजी' ठरलेली असते
की नेक्स्ट मुकाबला कोणाशी ते
आणि काळजाला कोणाशीच लढाई नको असते.
*
मेंदूची 'यिअरली टार्गेटस्' सदैव रेडी असतात
तर काळजाची टार्गेटस सदैव बदलत असतात.....
*
आणि यामुळे शेवटी परिणाम असा की सध्या
'मी आणि कंपनी'चा 'बॅलन्स' व 'बॅलन्सशीट'
दोन्ही गोत्यात आहे!

------------------------------ जयन्ता५२

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नानुभाऊ व डॉक्टरांशी सहमत! व्वा!

फार आवडली कविता. (मला माहीत नाही, बहुधा 'इअरली' / 'इयरली' असे लिहिलेले शोभेल की काय!)

व्यावसायिक पातळीवर मेंदू आणि हृदयाच्या लढाईत माणसाचा होणारा घोळघोटाळा फार थेट आला या कवितेत.

खासच Happy