मरणाच्या छायेमध्ये बागडणे सोपे नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 1 November, 2012 - 23:17

गझल
मरणाच्या छायेमध्ये बागडणे सोपे नाही!
फासावर चढता चढता गुणगुणणे सोपे नाही!!

आजन्म राहिली माझ्या पायात मुलायम बेडी;
रेशीमगाठ प्रेमाची सोडवणे सोपे नाही!

लागेल थांगही कोणा त्या अथांग अवकाशाचा;
आकाश तुझ्या डोळ्यांचे उलगडणे सोपे नाही!

हिंडती चोरपायांनी बगळ्यांच्या नजरा जेथे;
नादात आपल्या तेथे वावरणे सोपे नाही!

आयुष्य वेचले अवघे शिंपले वेचण्यासाठी....
लाखात एकही मोती सापडणे सोपे नाही!

छेडली तार त्याने अन् धडधडू लागली हृदये...
मैफलीस इतक्या सहजी मंतरणे सोपे नाही!

लावली चूड हातांनी, पाहिली राख डोळ्यांनी!
आपलीच स्वप्ने आपण सावडणे सोपे नाही!!

.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

..............................................................................................
टीप: प्रतिसादाची आचारसंहिता........
१) कोणतीही विशिष्ट आचारसंहिता नाही.

२) कोणत्याही शेरास पर्यायी शेर देवू शकता.

३)संपूर्ण गझलेस पर्यायी गझल खुशाल देवू शकता.

४) तरही लिहू शकता.

५) विडंबनात्मक/विटंबनात्मक लिहू शकता.

६) रसाळ/रटाळ/साहित्यिक/असाहित्यिक कसलीही चर्चा करू शकता.

७) आपापल्या पिंडानुसार सात्विक/राजस/तामस शैलीत लिहू शकता.


८)फारच उबगला असाल तर मुद्रात्मक चिन्हेही उमटवू शकता.

९) इतर कोणत्याही/कोणाच्याही गझलांशी तुलना करू शकता.

१०) चुकांचा पाढा लिहू शकता. जमल्यास व इच्छा असल्यास चुकांची दुरुस्ती करू शकता.

.............प्रा.सतीश देवपूरकर
..................................................................................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसाद देण्याच्या मानसिकतेने आलो होतो पण ........

असो

गझलेबद्दल मला जे सान्गायचेय ते 'विपू'त पहा देवसर!

वाचकाना विनन्ती
देवसरानी इथे जो फालतूपणा केलाय त्याबद्दल त्यान्च्या वतीने मी आपली माफी मागतो

देवसरानी इथे जो फालतूपणा केलाय त्याबद्दल त्यान्च्या वतीने मी आपली माफी मागतो<<<<

WTH?

फालतूपणा?
काय संबंध?
अन आतापर्यंत त्यांच्या प्रत्येक कवितेचे जे वाभाडे तुम्ही सगळ्या तथाकथित मायबोलीकर गझलसम्राट लोकांनी काढलेत ते?
"वाण" नाही, गुण लागलाय त्यांना तुमचाच.

What he is trying to say, is "DO NOT REPLY"
गझल वाचायची तर वाचा. अभिप्राय मनात ठेवा. अन द्यायचाच असेल, तर तुमची मर्जी. त्यांना डिफेण्ड करायला भाग पाडू नका.

बाकी चालू द्या!

What he is trying to say, is "DO NOT REPLY">>>>>

यालाच ध्वन्यार्थ असं म्हणतात की काय??...

तुम्हाला त्यान्च्या म्हणण्याचा जो अर्थ लागलाय तो मला लगलेल्या अर्थापेक्षा अच्छा असू शकतो पण सच्चा मात्र नक्कीच नाहीये इब्लिसराव !!

अजून एक .......मी फलतू आहे .....मला फलतूपणाच शोभतो देवसर तसे नाहीत (ऐकीव माहीती!!) म्हणून त्याना तो शोभत नाही असे मला म्हणायचे आहे ...हा माझ्या वरील प्रतिसादाच्या टिपेचा ध्वन्यार्थ की काय तो आहे !!

त्यांना डिफेण्ड करायला भाग पाडू नका.>>>>

<<<< प्रतिसादाची आचारसंहिता देवून त्याना विनाकारण आक्रमक व्हायला मी नव्हते सान्गीतले !!
हल्ले ज्याच्यावर चढवायचे त्याला डायरेक्ट टार्गेट करावे या मताचा मी आहे. त्या आचारसंहितेत त्यानी कुणाला अन का टार्गेट केलेय हे तुम्हाला समजले का (मला नाही बरका केले ...गै. न.)

सर्वात महत्त्वाचे :
इब्लिस हे सदस्य नाम घेवून खरी ओळख लपवून काहीतरी लिहिणे/आगी लावणे असले उपद्व्याप मी इथे येण्यापूर्वीच सोडून दिलेत त्यामुळे आपण एका खर्‍याखुर्‍या व इथे दिसतो तसाच प्रत्यक्षात असलेल्या वैभव वसंतराव कुलकर्णी नावाच्या माणसाशी बोलत आहात हे विसरू नये

यापुढे बोलणार असाल तर ९०२८५८८८४१ वर सम्पर्क साधा हा माझा मोबाईल नम्बर आहे प्रत्यक्षच बोलू आपण !!

धन्यवाद

@ वैभव वसंतराव कुलकर्णी
महोदय,
'आगी लावण्यासाठी' अन 'काहीतरीच लिहिणे' असे उपद्व्याप करण्यासाठी 'इब्लिस' हे सदस्यनामच घ्यावे लागते असे कुठे आहे? त्यांच्या उद्विग्न बोलण्याला 'फालतूपणा' म्हणून त्यांच्या वतीने माफी वगैरे मागून आपण इथे चंदन-केशराचा शीतल सडा शिंपला आहे असे वाटते काय आपणास??

असो.

गझलेबद्दल सोडून फुटकळ शब्दच कसे चुकीचे आहेत, अन त्यांचा अर्थच कसा वेगळा निघतो, इ. चर्चा पान पान भरून वाचून आत्तापर्यंत बरीच करमणूक झालिये माझी. त्यापायीच एकदा एका शब्दार्थावरून तुमच्याशी बोललोही होतो. तिथे तुमचाही रिस्पॉन्स प्रा.साहेब जसे त्यांचे शब्द 'डिफेण्ड' करतात, तसाच होता, याची नम्रपणे आठवण करून देतो. गझल हा माझा प्रांत नव्हे, फक्त ही निरर्थक भांडणे थांबावीत असे वाटते, म्हणून इथे इब्लिसपणे तोंड घातले.

(नको तिथे मोबाईल नं लिहीण्याचा अट्टाहास न करणारा, व स्वतःची प्रायव्हसी प्रिय असणारा)
प्रसिद्धी-पराङ्मुख इब्लिस

असो हाकानाका जाऊद्या इब्लिसराव !!

जाताजाता :<<<तुमचाही रिस्पॉन्स प्रा.साहेब जसे त्यांचे शब्द 'डिफेण्ड' करतात, तसाच होता>>>..................
>>>>>>>>.निव्वळ गैरसमज आहे हा तुमचा !! ती म्हण मी जशी वापरली होती त्याच अर्थाने मी लहानपणापासून व माझ्या गावातले लोक मी त्याना ओळखतसल्यापासून ;आम्ही ऐकत व वापरत आलो आहोत अशी माहीती मी पुरवली होती ...हेच मी म्हणत होतो...हे सत्य असून डिफेन्स नाही आहे
मी पुढे प्रतिसाद का नाही दिला ते याचसाठी की मी काय तुम्ही काय ;जे जे अर्थ वाण या शब्दचे लावले ते ते सर्व लावून त्या मिसर्‍याचा एक निश्चित व सुन्दर अर्थ प्रत्येकवेळी लावता येत होता व शेरही त्या अर्थमुळे पूर्ण होत होता बस् इतकेच

शेर कितीही केल्यावरही विठ्ठल उरतो उरात मझ्या
वाण लागला आहे त्याचा मी कनवाळू झालो आहे

जातो आता!.........नन्तर बोलू !! Happy

लागेल थांगही कोणा त्या अथांग अवकाशाचा;
आकाश तुझ्या डोळ्यांचे उलगडणे सोपे नाही!

हा शेर फार छान आहे...

आकाश तुझ्या डोळ्यांचे उलगडणे सोपे नाही!
व्वा!!

****** गझल सोडून बाकीचे मला समजले नाही.

लागेल थांगही कोणा त्या अथांग अवकाशाचा;
आकाश तुझ्या डोळ्यांचे उलगडणे सोपे नाही!
>>> मस्तच

आपलीच स्वप्ने आपण सावडणे सोपे नाही!!
>> थेट भिडला

हे वरच सगळ अस वाचल्यावरती एका सुंदर काव्याला अभिप्राय द्यायचा मुड अगदी निघून जातो. असो. पण ग़झल आवडली देवपूरकर सर.

हॅ