सरत्या अशा या सांजवेळी...

Submitted by जाह्नवीके on 30 October, 2012 - 12:03

काही दिवसांपूर्वी बेफिकीर यांची २०३, डिस्को..... ही कथामालिका वाचली......प्रत्येक भाग वाचताना अंगावर काटा येत होता..काय आयुष्य असेल तिथल्या मुलींचं.....रोज होणारा शारीरिक, मानसिक त्रास म्हणजे सहनशक्तीची परिसीमा......आपण फक्त शब्दातच मांडू शकतो.......कदाचित तेही अपुरेच आहे...... "सत्यमेव जयते" या आमीर खान च्या कार्यक्रमातही हाच मुद्दा चर्चेला आला होता.......हे सगळं वाचून आणि बघून सुरेश भटांच गाणं आठवलं, "त्या कोवळ्या फुलांचा बाजार पहिला मी"...... आणि माझ्या मनात आलं की एखादी संवेदना जागृत असलेली किंवा तशा भयानक परिस्थितीत जागृत ठेवू शकलेली एखादी "ललिता" जर तिचं दुःख शब्दात मांडेल तर........हा एक प्रयत्न......

सरत्या अशा या सांजवेळी
का करावे आकलेना
आठवांचा नाद घेऊन
आसवे ही ओघळेना ............................. ||धृ||

खिडकीतुनी त्या सावल्यांचा
रंगलेला खेळ बघताना
का इथे आले कशी मी
दिवस रातीला भेटताना...........................||१||

मन उसासे टाकते अन
धीरही सुटला कसा
मैफिलीने रंग भरला
वेदना या सांगता............................... ||२||

सूर केव्हा हरवले अन
ताल हा ढळला कधी
शब्दही परकेच झाले
गीत माझे गुंफताना................................||३||

मूक झाल्या भावनाही
स्पर्शही भांबावता
शीण पूर्वेच्या स्वरांचा
अन निशाही संपता.................................||४||

उमलते प्राची तरीही
सूर दबले लावता
का कसे केव्हा कुणाला
गीत स्फुरले ते कळेना.............................||५||

Group content visibility: 
Public - accessible to all site users