स्पिरीट ऑफ गेम... गेम ऑफ क्रिकेट... !!

Submitted by अंड्या on 28 October, 2012 - 05:17

दोन-चार दिवसांपूर्वीच हे लिहिणार होतो पण इथे मायबोलीवर असे चर्चेचे विषय कुठे मांडायचे ते शोधूनही न सापडल्याने इथेच टाकतोय.
बहुधा चालत असावे, कारण विषय निवडताना त्यात क्रिडा, क्रिकेट अश्या कॅटेगरीही सापडल्या.
पण जर इथे चालत नसेल तर कुठे हे कोणीतरी मला प्रतिसादात सांगा.

-------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------

क्रिकेट या खेळाला पूर्वापार काळापासून जंटलमन लोकांचा गेम म्हणून ओळखले जाते.. का ते माहीत नाही, कदाचित ब्रिटींशांचा आहे हेच एकमेव कारण असेल.. गोर्‍यांचे सारेच गोरे असते ना... असो, पण म्हणूनच या खेळात स्पोर्टसमन स्पिरीटलाही खूप महत्व दिले जाते.

यात मैदानावर शिवीगाळ करण्याला बंधन असते, अंपायरच्या निर्णयाला विरोध दर्शवणे अलाऊड नसते, सचिन-गिल्ली सारखे खेळाडू बाद झाले की अंपायरच्या निर्णयाची वाट न बघता स्वताहून परत जातात, समोरच्या टीमचा खेळाडू दुर्दैवीरीत्या बाद झाला किंवा चुकीचा बाद झाला की समोरच्या टीमचा कर्णधार त्याला परत बोलावतो.
वगैरे वगैरे बरीच लिस्ट आहे.. सांगायचा मुद्दा हा की प्रत्येक वेळी योग्य स्पिरीट उभयतांकडून राखले जाईल हे बघितले जाते.

पण नुकतीच एक वेगळी घटना घडली आहे जी नक्की या स्पिरीटच्या अंतर्गत येते की नाही हे समजत नाहिये.

लवकरच ईंग्लंड टीम भारताच्या दौर्‍यावर येत आहे.... हो, ही तीच ईंग्लंडची टीम आहे जिने सचिन-द्रविड-लक्ष्मण सारखे दिग्गज असताना आपल्याला त्यांच्या मायभूमीवर धूळ चाटवली..

त्यामुळे कोणी कबूल करो न करो, ही मालिका बदल्याची असणार.. आणि बदला घेण्यासाठी भारतीय संघच नाही तर निवड समिती सुद्धा सज्ज झाली आहे असे दिसतेय..

नुकताच त्यांनी सराव सामन्यांसाठी संघ घोषित केला... आणि त्यात आश्चर्यकारकरीत्या एकही स्पिनर निवडला नाही... चारही वेगवान गोलंदाज खेळवत आहेत, जेणे करून ईंग्लंडच्या संघाला स्पिन गोलंदाजी खेळायचा जराही सराव मिळणार नाही.... हाह..!! अर्थ काय राहिला मग आता ईंग्लंडच्या दृष्टीने या सराव सामन्यांना... नक्की कशाशी आता ते जुळवून घेणार.. भारतातील वातावरणाशी की वरणभाताशी... ??

भारतीय संघ जेव्हा स्वता परदेश दौर्‍यावर जातो तेव्हा त्यालाही पुरेश्या सराव सामन्यांची गरज असते. पण आपले क्रिकेट मंडळ स्वताच जास्तीचे सराव सामने खेळण्यास उत्सुकता दर्शवत नाही कारण त्यांना आंतरराष्ट्रीय सामने, २०-२० चे सामने, आयपीएल खेळण्यात जास्त स्वारस्य असते. सराव सामन्यांत दमायचे नसते. भले त्याचा फटका का बसेना..

या उलट इतर संघ जेव्हा सराव सामन्यांची आस बाळगतो तेव्हा भारताने असे वागणे कितपत योग्य ??

मला तरी एक क्रिकेटचा चाहता म्हणून ही कूटनिती पटली नाही... आपले काय मत आहे..???

- आनंद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि त्यात आश्चर्यकारकरीत्या एकही स्पिनर निवडला नाही.. >>>>>>>> काय वाईट आहे....... आपल्याला सुध्दा निर्जिव खेळपट्टी दिलेली सराव सामन्यात....नंतर कसोटी मधे हिरवीगार खेळपट्टी होती.... आणि जर आपल्याला जलद गोलंदाजी काय दर्जाची आहे कोण कसे गोलंदाजी करतो हे बघायचे असेल तर सराव सामन्यात त्यांना आजमावुन पाहिले तर काय चुकीचे........स्पिनर्स म्हणुन ओझा, अश्विन , हरभजन यांना संघात स्थान आहेच... फक्त प्रश्न जलद गती गोलंदाजांचा.......ऐन कसोटी मधे यांच्या बाबतीत चांस घेण्यापेक्षा सराव सामन्यात चांस द्यावा.....

.
.उद्या म्हणतील ..." सरावसामन्यात अश्विन , हरभजन हवेत... जेणे करुन पाहुण्या संघाला त्यांच्या गोलंदाजीचा सराव व्हावा..........व्वा..व्वा."...:हाहा:

उदयन,
हे जर तर आजवर कधी घडले नव्हते.
मुख्य संघातील स्पिनर वगळता भारतात दर रणजी संघात स्पिनर आहेतच, त्यामुळे हरभजन, ओझा, आश्विनच खेळवावेत असे ना मी म्हणालो ना आपण म्हणू शकता.
खेळपट्टी सराव सामन्यात निर्जिव देणे आणि नंतर आपल्या गोलंदाजांना सहाय्यक असे आजवर घडले असेल, घडतच असेल.. पण अश्या प्रकारे संघनिवड करणे हा नवीन ट्रेंड झाला, आजवर असे कधी घडल्याचे माझ्या माहीतीत नाही.

मुळात हे आताच का?
तर यामागे डेस्परेशन आहे... जिंकायचे डेस्परेशन.. आणि ते का आहे.. कारण भारतीय संघ जो सध्या आयपीएलच्या नादात वाताहात झालीय हे खोडून टाकायचे आहे..

@ बूमरँग,
कसले विराट कोहलीचे स्टेटमेंट... शोधतो मी.. जमल्यास लिंक मिळेल का..

हा बराच कॉमन ट्रेण्ड असावा - निदान भारतीय संघाच्या बाबतीत पूर्वीही असे केले गेले आहे. आपल्या खेळाडूंच्या मुलाखतींत्/पुस्तकांत याचे उल्लेख आहेत. आता बीसीसीआय कडे बरीच पॉवर असल्याने हे सगळे ते भारताला सोयीचे पडेल अशा पद्धतीने करू शकतात - जर लक्ष घातले तर.

फारएण्ड,
आपण म्हणता तर असू शकते, आपला अनुभव नक्कीच माझ्यापेक्षा जास्त असणार, मी जेव्हा पासून क्रिकेट फॉलो करतो ऐकीवात आले नाही..
बाकी आपण म्हणता तसे बीसीसीआयला पॉवर तर खूप आलीय हे खरे, पण याच पॉवरची किंमत भारतीय संघाला चुकवावी लागणार आहे. मुळात कसोटीत नंबर १ बनायच्या पात्रतेचा हा संघ कधीच नव्हता, आणि आता ते उघड झालेय तर हा लपवाछपवीचा खेळ.. असो.. आपण चुकीच्या दिशेने जातोय एवढे मात्र नक्की.. Sad