वागलो इतका न काटेकोर मी!

Submitted by सतीश देवपूरकर on 23 October, 2012 - 13:59

गझल
वागलो इतका न काटेकोर मी!
त्यामुळे जगलो असा बिनघोर मी!!

वेष साधूचा न मी केला कधी;
त्यामुळे ठरलो अखेरी चोर मी!

काय शंकेचीच आहे पाल मी?
वाटतो दुनियेस शंकेखोर मी!

व्हायची तुलना न माझी अन् तुझी;
जेवढा तू थोर तितका पोर मी!

टाक तू विश्वास, दे भारे शिरी...
व्हायचो नाही कधी शिरजोर मी!

लागल्या माझ्याच पागोळ्या पडू....
पावसाची सर जणू घनघोर मी!

वीज तू आहेस आकाशातली!
अन् धरेवरचा असे मनमोर मी!!

मी ठरवतो ईद आहे की, नसे;
होय, चंद्राचीच आहे कोर मी!

वाटला गेलो जगाला केवढा!
राहिलो आता पहा चतकोर मी!!

चीड येते, राग येतो या जगा...
काय आहे एवढा चिडखोर मी?

माजती तंटेबखेडे चौंकडे...
सांग इतका काय तंटेखोर मी?

------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कावळा,
गझलेत फारच “मी”पण आहे.<<<<<<<<<
खरे आहे आपले म्हणणे कावळेराव!
या गझलेचा रदीफच मुळी आहे “मी”!
गझलेत “रदीफ”पण निभवायचा असतो म्हणतात!
या गझलेतला रदीफ म्हणजे प्रा.देवपूरकरच आहेत काय?
त्यात तू आहेस, तो आहे, ते आहेत, परमेश्वर आहे, इत्यादी.
बाकी मर्जी आपली!
...........प्रा.सतीश देवपूरकर

गझलेत फारच ''मी'' पणा आहे.<<<

गझलेत “रदीफ”पण निभवायचा असतो म्हणतात!
या गझलेतला रदीफ म्हणजे प्रा.देवपूरकरच आहेत काय?
त्यात तू आहेस, तो आहे, ते आहेत, परमेश्वर आहे, इत्यादी.<<<

Lol

आपल्या विस्मयकारक हास्यमुद्रेवरून साधारणपणे अंदाज आला होताच!