खिरापतीला काय गं

Submitted by Prajakta C. Kulkarni on 23 October, 2012 - 05:04

श्री
खिरापतीला काय गं

काल आमच्या घरी भोंड्ला झाला.पाटावर खडुने हत्ती काढ्ला ,त्याची पुजा केली.,मग मुलींनी ,बायकांनी फेर धरला आणि भोंड्ल्याच्या गाण्यांचा आवाज घुमु लागला.यात पाच वर्षाच्या मुलीपासुन पासष्टीच्या बायका सुदधा सामिल झाल्या होत्या. स्री चे भावविश्व या गाण्यामधुन व्यक्त होत आले आहे, किवां तिच्या वर झालेले संस्कार ,तिला निभवावी लागणारी नातीगोती ही गाणी सांगतात.

" अक्कण माती चिक्कणमाती अश्शी माती सुरेख बाई खड्डा तो खणावा,
अस्सा खड्डा सुरेख बाई जाते ते रोवावे,

मग त्या खड्ड्यात जातं रोवावे ,त्यात सपीटी द्ळावी ,त्याच्या करंज्या कराव्यात.त्या तबकात ठेवाव्यात.ते तबक शेल्याने झाकावे .आणि मग तो शेला पालखी ठेवावा
अश्शी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्से माहेर सुरेख बाई खेळाया मिळ्ते"
"अस्से सासर द्वाड बाई कोंडुन मारते"

ह्या ओळी म्हणताना सासु-सुना ह्ळुच एकमेकीकडे ह्सुन बघतात आता ती परिस्थीती नाही तरी सुदधा या दोघी जणी ह्सतात. या गाण्यात माती पासुन ते शेवटी माहेरापर्यंत कौतुक आहे.

"श्रीकांता कमलकांता असे कसे झाले असे कसे झाले माझ्या नशिबी आले
वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंज्या ,
तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले
होड्या होड्या म्हणुन त्याने पाण्या त सोड्ल्या"

हे गाणं सुरु झाले की वेड्या च्या करामती पाहुन हसायला येते.पण शेवटी मात्र वाईट वाट्ते ते वेड्याचया बायकोसाठी आणि पुन्हा आपण म्हण्तोच असे कसे झाले असे कसे झाले माझ्या नशिबी आले.खरंच आज कितीतरी
स्रिया नशिबी आलं म्हणुन सह्न करतात.

"वेड्याची बायको झोपली होती
तिकडुन आला वेडा त्याने डोकावुन पाहिले
मेली मेली म्हणुन त्याने जाळुन टाकली"
"श्रीकांता कमलकांता असे कसे झाले असे कसे झाले माझ्या नशिबी आले".

मग सासु-सुनेचे नातं उलगड्णारे गाणं
"कारल्याचा वेल लाव ग सुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा"
कारल्याचा वेल लावला हो सासुबाई ,आता तरी जाऊ का माहेरी माहेरी"

या गाण्यात कारल्या वेल लावण्यापासुन ते त्याला फुल येवुन ,मग कारली येणार.त्या कारल्याची भाजी खाऊन झाले की आपले उष्टे काढुन सुन बाई माहेरी जाणार.
आपले उष्टे काढ ग सुने काढ ग सुने
आपले उष्टे काढ्ले हो सासुबाई हो सासुबाई ,
आता तरी जाऊ का माहेरी माहेरी

आणा फणी घाला वेणी
जाऊदया राणी माहेरा
आणली फणी घातली वेणी
गेली राणी माहेरा माहेरा

ही गाणी नुसतीच यमकाला यमक जुळ्वुन तयार झाली नाहीत तर त्या गाण्यानां अर्थ आहे.

"सासरच्या वाटे कुचु कुचु काटे
आज कोण पाहुणा येणार ग ,येणार ग
आज येणार सासु ग बाई सासु ग बाई
सासु ने काय आणले ग बाई
सासु ने आणले तोडे ग बाई
तोडे मी घेत नाही
सांगा मी येत नाही
झिप्र्या कुत्र्याला सोडा गं बाई सोडा गं बाई
चारी दरवाजे लावा ग बाई लावा ग बाई "

या गाण्या त सासु पासुन दिर, जाऊ,नणंद सगळे एकेक दागिणा घेउन येतात ,पण सुन काही जात नाही शेवटी नवरा येतो मंग्ळ्सुत्र घेऊन, तशा गाण्याच्या ओळी बद्लतात.

" मंग्ळ्सुत्र मी घेते
सांगा मी येते
झिप्र्या कुत्र्याला बांधा गं बाई बांधा गं बाई
चारी दरवाजे उघडा ग बाई उघडा ग बाई "

सग्ळ्यात शेवटी खिरापत ओळ्खण्यासाठीचे हे गाणं

आड बाई आडोणी आडाचे पाणी काडोणी
आडात पड्ली सुपारी
आमचा भोंडला दुपारी
आड बाई आडोणी आडाचे पाणी काडोणी
आडात पड्ली कात्री
आमचा भोंडला रात्री
आड बाई आडोणी आडाचे पाणी काडोणी
आडात पड्ली शिंपला
आमचा भोंडला संपला
आड बाई आडोणी आडाचे पाणी काडोणी
आडात पड्ली कोय गं
खिरापतीला काय गं

आता खिरापत ओळ्खण्याचा कार्यक्रम म्ह्ण्जे पदार्थाची चव सांगायची आणि तो ओळ्खायचा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भोंडला प्रकार माझ्या camera ने टिपावा अशी फार दिवसांची इच्छा पुन्हा एकदा साद उचंबळून आलेली आहे...मस्त आहे...मज्जा वाटली Lol

मस्त मजा आली प्राजक्ता ..लहानपणी बहीणीन्बरोबर मी ही जायचो भोंडला असेल तिथे खूप मजा असते नै !!
भोंडला हा एकूण काय प्रकार असतो ? कसा असतो ? का असतो ?अशी माहिती संपादित करून हाच लेख अजून उपयुक्त करता आला असता
धन्यवाद ह्या लेखासाठी

भोंड्ला हा कार्यक्रम ह्स्त नक्षत्रात होतो म्ह्णुन ह्त्तीची पुजा केली जाते. आणि नवरात्र ते कोजागिरी पौर्णीमे पर्यंत
भोंड्ला साजरा केला जातो.
आम्ही परवाचा भोडंला CAMERA मध्ये टिपुन ठेवला आहे. खुप मजा आली.

Happy

वा ..प्राजू खुपच सुंदर ..
मला पण माझ्या लहान पणीच्या भोंडल्याची.आठवण झाली ..
आम्ही तर मुलींची शाळा असल्यामुळे शाळेत पण भोंडला खेळत असू ..
रोज पाच सहा खिरापती असत ..
खूप मज्जा येत असे !!
खिरापत ओळखणे ..हे खूप थ्रिल्लिंग वाटत असे ..
भोंडल्याची गाणी व खिरापती ..दिवसागणिक वाढत असत
सोळाव्या दिवशी ..सोळा गाणी .व खिरापती असत ..
त्या दिवसांची आठवण ..दिलीस बरे वाटले ....

मी लग्न झाल्याच्या वर्षी पुण्यात होती आमच्यात आसे कार्यक्रम होत नाहित पण सोसायटीतल्या बायकांनी गच्ची वर केला तेव्हा आमत्रण होते वरील सगळी गाणी होती त्यात,
मज्जा म्हणुन गेलेले ५० रु कॉन्ट्री होते
भेळ गुलाब जामुन समोसा खायला आणि ही हत्ते भोवतीची गाणी
मग इन्ट्रो झाले मी माझे नाव सौ पासुन सुरु केले तर सगळ्यानां आश्र्च र्य वाटले [मी सगळ्यात लहान होते अन त्या बायाका बहुतेक मॉड टाईप होत्या म्हणुन की काय
नंतर नंतर गाणे एकुन म्हणुताना एकदम डोळ्यातुन पाणी आलेले एक स्री [सासु] दुसर्या स्री [सुनेबरोबर] अशीकशी वागु शकते करल्याचे उष्टे माष्टे काढेपर्यंत पाठवले नाही म्हणजे कमाले

ह्या वेळेस बिल्डींग मधल्या ५-६ जणींनी ठरवले कि रोज एकीच्या घरी भोंडला करायचा. पहिल्या दिवशी माझ्याकडे केला.खूप मजा आली. पाटावर रांगोळी ने हत्ती काढून पुजा केली, गाणी म्हटली, खिरापत ओळखली.
पण दुसर्या दिवशी पासून रोज एकीची कारणे सुरु झाली.. मला काम आहे, माझे मामा येणार आहेत. मला बरे वाटत नाहीये वगैरे,वगैर,.