पुस्तकाच्या भाषांतरा संबंधी

Submitted by जाह्नवीके on 20 October, 2012 - 08:37

नमस्कार मंडळी,

काही चांगली इंग्लिश पुस्तके वाचनात आली. मराठीत भाषांतर करून सर्व मराठी वाचकांना ती उपलब्ध करून द्यावीत असं वाटलं....
परंतू याबद्दल चे नियम, अटी, आवश्यक उपचार, कायदेशीर बाबी याबद्दल काहीच माहिती नाही. प्रकाशन खूपच पुढची गोष्ट आहे पण माहिती असावीच लागेल.
कृपया याबद्दल काही माहित असल्यास इथे सांगा.....

जाह्नवी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूळ पुस्तकाचे प्रताधिकार ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडून भाषांतराची परवानगी मिळवावी. हे व्यक्तीशः करता येते किंवा एखादा प्रकाशक (उदा. मेहता - हे मोठया संख्येने भाषांतरे प्रसिद्ध करतात) गाठून त्यांच्यामार्फत करता येते.
शक्यतो मूळ लेखकालाही पूर्वकल्पना द्यावी आणि संपर्कात रहावे. भाषांतर करतांनाही लेखकाशी संवाद ठेवणे उत्तम. याने चुकीच्या भाषांतराची शक्यता कमी होते.

एव्ह्स्ढे सगळे कष्ट उपसण्याआधी त्याचे आधीच कुणी मराठी अनुवाद करुन ठेवले नाहियेत ना हे चेक करा.... एक आगाऊ सल्ला Wink

bumrang....

नक्केच केले नसावे कारण पुस्तक सिंगापूर बद्दल आहे आणि त्याचे मराठीत भाषांतर झालेले असणे जरा अवघड वाटते..पण तरी मी चौकशी नक्की करेन.. Happy

गौरी...

जे पुस्तक डोक्यात ठेवून हा प्रश्न विचारला त्यासाठी मला भारताबाहेरच्या (सिंगापूर) प्रकाशकांचे आणि लेखकांचे हक्क व संपर्क घ्यावे लागतील.
त्याबद्दल कदाचित नियम वेगळे असतील किंवा कसे याबद्दल माहिती देता येईल का? मी मूळ पुस्तकावरून बघून इ-मेल करेनच...

पुस्तकाच्या संबंधी कॉपीराइट व्हायोलेशन झाले तर करायच्या खटल्याची ज्युरिस्डिक्षन लिहिलेली असेल. प्रकाशकच सांगू शकतील. ही पीडीएफ आहे. तुम्ही भाषांतराचे काम करता का?

www.copyright.org.au/admin/cms.../12175306884f389f7b95bf2.pdf

पुस्तक सिंगापूर बद्दल असले तरी प्रकाशक कुठला आहे?

जान्हवी, पुस्तकावर / पुस्तकाच्या / प्रकाशकांच्या / लेखकाच्या वेबसाईटवर संपर्काचा इमेल आयडी बहुधा सापडतो. मेलमधून चौकशी केली तर साधारणपणे उत्तर मिळू शकते. मराठी भाषांतरासाठी प्रताधिकार कुणी मिळवले असतील / प्रक्रिया चालू असेल तर तेही ते कळवू शकतात. यामुळे दुसरे भाषांतर होत असताना आपण भाषांतराचे कष्ट घेण्याचं वाचतं. त्यामुळे काम सुरू करण्यापूर्वी ही माहिती घेतलेली चांगली.

प्रताधिकार कायद्याचे स्वरूप देशाप्रमाणे बदलते.

अश्विनीमामी,
सर्वप्रथम, मला अहो-जाहो करू नका प्लीज... Happy

हो.. मी काही ओळखीच्या लोकांसाठी भाषांतराचे काम केले आहे यापूर्वी..ते पैसे घेऊनच केले असले तरी अजून मी हून कुणाला सांगितलेले नाही. कारण त्यासाठी लागत असेल तर.....आवश्यक असलेले शिक्षण काही मी घेतलेले नाही.....प्रकाशकही सिंगापूर्चाच आहे कारण सिंगापूरच्या जडण-घडणी बद्दल चे पुस्तक असल्याने स्थानिक माणसानेच लिहिलेले आहे.

लिंक साठी धन्स...मी बघते....

प्रकाशनाचे सर्व हक्क लेखकाकडे असले तरी पेंग्विन, हार्पर कोलिन्स, ट्राँकेबार यांसारखे प्रकाशक ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी आग्रही असतात. मराठी प्रकाशक जर अनुवाद छापणार असतील तर अनुवादकाला, लेखकाला आणि मूळ प्रकाशकाला प्रत्येकी ५% अशी रॉयल्टी मिळते. पेंग्विनसारखे मोठे प्रकाशक अनेकदा १०% रॉयल्टीची मागणी करतात.

मी आजपर्यंत जवळ जवळ ८ पुस्तके अनुवादित केली आहेत, प्रकाशक वेगवेगळे होते/आहेत, प्रसिध्द आहेत
सर्वप्रथम प्रकाशक मूळ प्रकाशकाकडून अथवा लेखकाकडून भाषातरासाठी हक्क घेतो.काही वेळा मूळ लेखक/ प्रकाशक अनुवादकाची प्राविण्याबद्दल एक एजन्सी नेमून चाचणी घेतो. मग कालबाध्य रूपात अनुवादाची अनुमती मिळते व दर निश्चित होतात. ते बहुधा एकहाती किंवा प्रति छापील पान असतात. भाषांतरानंतर एकदा प्रूफ रीडिंगला येते. अनुवादकाला सामान्यतः रॉयल्टी दिली जात नाही.
३०० पानांचे पेपरबॅकचा रेट साधारण रु. २०००० असतो व रोज ३ तास काम केल्यास ५० दिवसात ते काम संपवता येते.
मी सर्व काम कंप्युटरवर करतो व टाईप्ड रूपात देतो
स्वत: राईट्स घेवून अनुवाद करून मग प्रकाशित करणे वैयक्तिक पातळीवर कठीण जाते कारण वितरण व छपाई ही विशिष्ट व वेगळी क्षेत्रे आहेत.
अर्थात हे सर्व माझ्या अनुभवावर आधारित आहे.

धन्यवाद रेव्यु,
मी अत्ता पर्यन्त केलेली सर्व काम ही छोट्या प्रमाणावरील होती आणि मैत्रीखातर केलेली होती. अख्खे पुस्तक भाषान्तरित करायची ही पहिलीच वेळ असेल.......तुमच्या सूचना नक्कीच उपयोगी पडतील.

जान्हवी, इथे रेव्ह्यू यांना यातला खूप अनुभव आहे, त्यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरेल ही सगळ्यात महत्त्वाची माहितीच वर लिहायची राहिली ... अर्थात त्यांनी इथे सांगितलं आहेच Happy

रेव्यु यांना विचारा हेच लिहायला आले होते! पण त्यांनी योग्य ते मार्गदर्श्न केले आहेच.
शिवाय चिवा या आयडीला संपर्क्/विपु केल्यास त्याही माहिती देऊ शकतील. त्यांनीही काही पुस्तकांचे अनुवाद केले आहेत.
पुस्तकाचे नांव दिल्यास त्याचे भाषांतर झाले आहे की नाही हे इथेच समजेल. बरेच मायबोलीकर चोखंदळ वाचकही आहेत आणि मराठीतील नवीन्/भाषांतरीत पुस्तकांची माहिती इथे देत असतात!
शुभेच्छा!

चिवा आहेच. शर्मिला फडके यांनी पण भाषांतराची बरीच कामे केलेली आहेत. करत असतातही.
त्यांनाही विचारायला हरकत नाही.

अरे वा.....इथे बरीच माणसे अनुभवी आहेत........मला चान्गली माहिती मिळेल यात आता शन्काच नाही......
मला ज्या पुस्तकाच भाषान्तर करायच आहे त्याच नाव- फ्रॉम थर्ड वर्ल्ड टु फर्स्ट- सिन्गापोर स्टोरी १९६५-२००० मेमरीज ऑफ ली कुआन यू, लेखक- ली कुआन यू