दाखव डहाळ्या हालवत माझे जुने वैभव मला

Submitted by बेफ़िकीर on 19 October, 2012 - 07:56

दाखव डहाळ्या हालवत माझे जुने वैभव मला
एकांत माझ्या भोवतीचा वेचुनी हासव मला

सीमेवरी ठेवून तू हसतोस कसला ईश्वरा
अपुला तरी कर वा पुन्हा अपुल्यांमधे पाठव मला

नि:श्वास घाले साकडे प्रत्येक श्वासाला जणू
निर्दोष कैदी ओरडे मारू नको वाचव मला

रोमांच देहाचे तुझ्या माझ्यात असते गुंतले
थोडी तरी होती हवी या काळजावर लव मला

सार्‍या दिशांचे वावडे सार्‍या ऋतुंशी वाकडे
कंटाळलो आहे जवळ घे थोपटत जोजव मला

कवितेमधे इतके तिला निर्भीड मी रेखाटले
की ती म्हणाली शेवटी की एकदा लाजव मला

शाळेपुढे अद्यापही तो चिंचवाला थांबतो
अद्यापही भंडावते गाभूळलेली चव मला

नात्यास या मोडून जाताना नशीबाने पहा
केली विसंगत वाटणी, स्वप्ने तुला वास्तव मला

रस्ता असावा कोणता मुक्काम कुठला आपला
कोणास सांगावे कळेना हात दे चालव मला

पाने पहाटे गुंगली फितुरीत अंधारासवे
माध्यान्ह झाल्यावर कुठे असते कळाले दव मला

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दाखव डहाळ्या हालवत माझे जुने वैभव मला
एकांत माझ्या भोवतीचा वेचुनी हासव मला......... ठीक ठाक

सीमेवरी ठेवून तू हसतोस कसला ईश्वरा
अपुला तरी कर वा पुन्हा अपुल्यांमधे पाठव मला..... बहोत खूब. क्या बात है !!

नि:श्वास घाले साकडे प्रत्येक श्वासाला जणू
निर्दोष कैदी ओरडे मारू नको वाचव मला.... ठीक

रोमांच देहाचे तुझ्या माझ्यात असते गुंतले
थोडी तरी होती हवी या काळजावर लव मला........... क्या ब्बात है... जबरदस्त शेर.

सार्‍या दिशांचे वावडे सार्‍या ऋतुंशी वाकडे
कंटाळलो आहे जवळ घे थोपटत जोजव मला...ठीक

कवितेमधे इतके तिला निर्भीड मी रेखाटले
की ती म्हणाली शेवटी की एकदा लाजव मला..... Happy

शाळेपुढे अद्यापही तो चिंचवाला थांबतो
अद्यापही भंडावते गाभूळलेली चव मला..... Happy

नात्यास या मोडून जाताना नशीबाने पहा
केली विसंगत वाटणी, स्वप्ने तुला वास्तव मला......... वाह

रस्ता असावा कोणता मुक्काम कुठला आपला
कोणास सांगावे कळेना हात दे चालव मला............. Happy

पाने पहाटे गुंगली फितुरीत अंधारासवे
माध्यान्ह झाल्यावर कुठे असते कळाले दव मला........ छान

एकंदर चांगली गझल

सार्‍या दिशांचे वावडे सार्‍या ऋतुंशी वाकडे
कंटाळलो आहे जवळ घे थोपटत जोजव मला

कवितेमधे इतके तिला निर्भीड मी रेखाटले
की ती म्हणाली शेवटी की एकदा लाजव मला

हे दोन आवडले!

मस्तच गझल.

मतल्यातला खयाल छानच आहे. फक्त 'हासव' हा काफिया फार परीणामकारक वाटला नाही. एकांत वेचून नुसते हासवण्याऐवजी अजून काहीतरी सॉल्लीड करायची इच्छा प्रदर्शित झाली असती तर मजा आली असती.

सीमेवरी ठेवून तू हसतोस कसला ईश्वरा
अपुला तरी कर वा पुन्हा अपुल्यांमधे पाठव मला >>. व्वा

रोमांच देहाचे तुझ्या माझ्यात असते गुंतले
थोडी तरी होती हवी या काळजावर लव मला>>> व्वाव्वा

नात्यास या मोडून जाताना नशीबाने पहा
केली विसंगत वाटणी, स्वप्ने तुला वास्तव मला>>> सुंदर

पाने पहाटे गुंगली फितुरीत अंधारासवे
माध्यान्ह झाल्यावर कुठे असते कळाले दव मला>> बढिया.

धन्यवाद!

नात्यास या मोडून जाताना नशीबाने पहा
केली विसंगत वाटणी, स्वप्ने तुला वास्तव मला

हाही सुरेख!

बेफिकीरजी!
मतल्यातील पहिली ओळ सुंदर!

डहाळ्या हालवत..........प्रतिमा आवडली.
दुसरी ओळ पहिलीला तोलते का असे वाटून गेले.
डहाळ्या हालवत माझे वैभव मला दाखव.........हे आवडले/पटले, पण दुस-या ओळीतील भोवतीचा एकांत वेचून मला हासव याचे पहिल्या ओळीशी नाते कळले नाही.
हालवणे म्हणजे सरकविणे, गती देणे, धामधूम करणे, चेतविणे, जागृत करणे.
हालवून जागा करणे म्हणजे उठवणे, चेतना आणणे वगैरे.
म्हणून दुस-या ओळीत मला जागृती/चेतना आण असे काही तरी हवे.
दुसरी ओळ आम्हास अशी सुचली...........
निश्चेतना भलतीच आली, एकदा चेतव मला!
......................................................................................................
अपुला......आपुला/आपला असे हवे.
अपुल्यांमध्ये..........आपुल्यांमध्ये/आपल्यांमध्ये असे हवे.
......................................................................................................
काळजावरील लव........हृद्य नाही वाटले
रोमांच देहावरच येतात.
तुझ्या देहाचे रोमांच माझ्यात गुंतले असते म्हणणे व पुढे काळजावर थोडीतरी लव असायला हवी होती असे म्हणणे, या दोहोंमध्ये नाते कृत्रीम वाटले.
........................................................................................................
‘की’ची द्विरुक्ती टाळता आली असती तर बरे झाले असते.
नशीबाने.........नशिबाने असे हवे.
नशीब शब्दात दीर्घ इकार आहे, पण प्रत्यय लागल्यावर नशिबाने असे होते
.......................................................................................................
सार्या. दिशांचे वावडे सार्या. ऋतुंशी वाकडे
कंटाळलो आहे जवळ घे थोपटत जोजव मला
छान!
.....................................................................................शाळेपुढे अद्यापही तो चिंचवाला थांबतो
अद्यापही भंडावते गाभूळलेली चव मला<<<<सुंदर गाभूळलेला शेर!
केली विसंगत वाटणी, स्वप्ने तुला वास्तव मला
<<<<<सुंदर मिसरा!

शेवटचा शेर दुर्बोध वाटला...........वै.म.
.............प्रा.सतीश देवपूरकर
................................................................................................

नात्यास या मोडून जाताना नशीबाने पहा
केली विसंगत वाटणी, स्वप्ने तुला वास्तव मला>>>>>>>>>>>> क्लास....

वेलकम बेफी Happy

सीमेवरी ठेवून तू हसतोस कसला ईश्वरा
अपुला तरी कर वा पुन्हा अपुल्यांमधे पाठव मला

नात्यास या मोडून जाताना नशीबाने पहा
केली विसंगत वाटणी, स्वप्ने तुला वास्तव मला

रस्ता असावा कोणता मुक्काम कुठला आपला
कोणास सांगावे कळेना हात दे चालव मला

दमदार पुनरागमन बेफिकीर, अनेक प्रातिभ शुभेच्छा.

सीमेवरी ठेवून तू हसतोस कसला ईश्वरा
अपुला तरी कर वा पुन्हा अपुल्यांमधे पाठव मला.......व्व्व्व्व्वा ! क्या बात!

सार्‍या दिशांचे वावडे सार्‍या ऋतुंशी वाकडे............मस्त मस्त मिसरा
कंटाळलो आहे जवळ घे थोपटत जोजव मला

शाळेपुढे अद्यापही तो चिंचवाला थांबतो
अद्यापही भंडावते गाभूळलेली चव मला....येस्स्स!

नात्यास या मोडून जाताना नशीबाने पहा
केली विसंगत वाटणी, स्वप्ने तुला वास्तव मला...सलाम!

पुनरागमनाबद्दल धन्स बेफिजी .

सीमेवरी ठेवून तू हसतोस कसला ईश्वरा
अपुला तरी कर वा पुन्हा अपुल्यांमधे पाठव मला

नि:श्वास घाले साकडे प्रत्येक श्वासाला जणू
निर्दोष कैदी ओरडे मारू नको वाचव मला

रोमांच देहाचे तुझ्या माझ्यात असते गुंतले
थोडी तरी होती हवी या काळजावर लव मला.

व्वा...अप्रतिम शेर..

नात्यास या मोडून जाताना नशीबाने पहा
केली विसंगत वाटणी, स्वप्ने तुला वास्तव मला
सुंदर..

सुरेख गझल..शुभेच्छा..

नात्यास या मोडून जाताना नशीबाने पहा
केली विसंगत वाटणी, स्वप्ने तुला वास्तव मला

कवितेमधे इतके तिला निर्भीड मी रेखाटले
की ती म्हणाली शेवटी की एकदा लाजव मला

<< क्या बात !!

नात्यास या मोडून जाताना नशीबाने पहा
केली विसंगत वाटणी, स्वप्ने तुला वास्तव मला >> लाजवाब!

सीमेवरी ठेवून तू हसतोस कसला ईश्वरा
अपुला तरी कर वा पुन्हा अपुल्यांमधे पाठव मला

रोमांच देहाचे तुझ्या माझ्यात असते गुंतले
थोडी तरी होती हवी या काळजावर लव मला

सार्‍या दिशांचे वावडे सार्‍या ऋतुंशी वाकडे
कंटाळलो आहे जवळ घे थोपटत जोजव मला

कवितेमधे इतके तिला निर्भीड मी रेखाटले
की ती म्हणाली शेवटी की एकदा लाजव मला

नात्यास या मोडून जाताना नशीबाने पहा
केली विसंगत वाटणी, स्वप्ने तुला वास्तव मला

>>>>> अफाट शेर......... !! लव, जोजव आणि वास्तव हे तर आरपार गेले.........!

Chan

रोमांच देहाचे तुझ्या माझ्यात असते गुंतले
थोडी तरी होती हवी या काळजावर लव मला

नात्यास या मोडून जाताना नशीबाने पहा
केली विसंगत वाटणी, स्वप्ने तुला वास्तव मला

हे दोन्ही शेर फार अप्रतिम जमून आले आहेत. अत्युत्कृष्ट !!
सुंदर गझल!

बेफिकीर,
चांगली गझल...!
डहाळ्या हलल्या आहेतच... मी आणखी काय सांगू ? Happy